Breaking News

Pravin Gaikar

पनवेल तालुक्यात 210 जण पॉझिटिव्ह

सात जणांचा मृत्यू; 237 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी   (दि. 30) कोरोनाचे 210 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 237 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 164 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे …

Read More »

काळानुरूप सुयोग्य धोरण

केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या नव्या शिक्षण धोरणाचे देशभरातील शिक्षणतज्ज्ञ तसेच संस्था-संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. तीन ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांना शिक्षणहक्क कायद्याच्या कक्षेत आणणारे, बोर्डाच्या परीक्षांचा अवाजवी ताण हलका करणारे आणि कौशल्य विकासावर अधिक भर देणारे हे शैक्षणिक धोरण समाजाच्या विविध स्तरावरून करण्यात आलेल्या असंख्य मागण्यांची पूर्तता …

Read More »

ऑनलाइन काव्यसंमेलनाचा दशकपूर्ती सोहळा

मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी माणगाव : प्रतिनिधी – कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट या समुहातर्फे नुकतेच ऑनलाइन कविसंमेलन पर्वाचा दशकपूर्ती सोहळा राज्यातील मान्यवर कवींच्या सादरीकरणाने समृद्ध झाला. या कविसंमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्ष अशोक ठाकूर, विशेष निमंत्रित कार्याध्यक्ष नमिता …

Read More »

श्रीवर्धन आगारातून लांब पल्ल्याच्या बस सुरू करण्याची मागणी

श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन परिवहन आगारातून 1 ऑगस्टपासून लांब पल्ल्याच्या सर्व बसफेर्‍या सुरू करण्यात याव्या, अशी मागणी प्रवासीवर्गामधून होऊ लागली आहे. अनेक नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे लोक बसगाड्या केव्हा सुरू होतील याची वाट पाहत आहेत. श्रीवर्धन आगारातून दररोज मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, …

Read More »

माथेरानच्या जंगलात रात्रीची गस्त

शिकार्‍यांना पकडण्यासाठी वन विभाग सतर्क कर्जत : बातमीदार – माथेरानच्या जंगलात आणि डोंगरपट्ट्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क झाला असून, शिकार्‍यांना पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे. माथेरान येथील जंगल …

Read More »

विमनस्क वृद्धावर वैद्यकीय उपचार

पोलादपूर पोलीस, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचार्‍यांची मानवसेवा पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे गेल्या महिनाभरापासून विमनस्क अवस्थेत फिरणार्‍या वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर पोलादपूर पोलीस आणि लोहारे ग्रामस्थांनी त्याला खासगी टेम्पोमधून ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. कोरोना शब्द माहिती नसलेल्या या वृद्धाबाबत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी थोड्याशा कटूतेनंतरही …

Read More »

गणेशमूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका

पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अनेक मंडळांनी दीड ते पाच दिवसांच्या व लहान गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आर्थिक फटका गणेश मूर्तिकारांना बसणार आहे. गणेशमूर्तीची उंची हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेवढी मूर्ती मोठी, तेवढी जास्त प्रसिद्धी …

Read More »

कळंबोली, रोहा भाजप युवा मोर्चाकडून श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना

पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 27) कळंबोली मंडळ युवा मोर्चा तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले 1000 पत्रके पोस्टाद्वारे त्यांच्या मुंबईच्या निवास्थानी पाठवण्यात आले आहेत. …

Read More »

पनवेल तालुक्यात 198 जण पॉझिटिव्ह

एकाचा मृत्यू; 168 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 27) कोरोनाचे 198 नवीन रुग्ण आढळले असून 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …

Read More »

गूढ कायम

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येला महिनाभराहून अधिक काळ लोटला आहे. या काळात त्याच्या मृत्यूसंदर्भात अनेक उलटसुलट दावे-प्रतिदावे केले गेले असून तपासाचे गुर्‍हाळ सुरुच आहे. या प्रकरणी 36 जणांचे जाब-जबाब नोंदवण्यात आल्याचे स्वत: गृहमंत्र्यांनी रविवारी सांगितले. मात्र अद्यापही या प्रकरणी ठोस अशी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. गृहमंत्री …

Read More »