Breaking News

Pravin Gaikar

तिघाडी काम बिघाडी

राज्यातील तीन चाकी महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद एव्हाना पुरेसे चव्हाट्यावर आले आहेत. जुन्या खाटांचे कुरकुरणे सरकारमधील भागीदार पक्षानेच जगजाहीर केले. अखेर बर्‍याच कुरकुरण्यानंतर नाराज काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक गुरुवारी पार पडली असली तरी तिघाडी काम बिघाडी हेच अखेर खरे ठरणार! सत्तेच्या लोभातून कुटिल डावपेच खेळून जनाधार नसतानाही सत्ता काबीज केल्यानंतर …

Read More »

पनवेलमध्ये 68 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 68 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला. तर 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 51 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा  मृत्यू झाला आहे. तर 32 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 17 नवीन …

Read More »

रोह्यात पावसाची जोरदार हजेरी; विजपुरवठा खंडीत

रोहे : प्रतिनिधी  – रोह्यात गुरुवारी (दि. 18) सकाळपासुनच रिमझिम पाऊस पडत होता. परंतु 5.45 पासुन रोह्यात ढगांच्या कड कडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे. संपुर्ण वातावरण पाउसमय व काळोखमय झाले होते. रोह्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली ढगांचा कडकडाट सह जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तासभर पावसाचा जोर …

Read More »

नागोठण्यात शुकशुकाट

नागोठणे : प्रतिनिधी – मंगळवारी रात्री उशिरा शहरातील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त कळल्यावर बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारपासून रविवारपर्यंत शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्युला गरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी औषधांची दुकाने वगळता 100 टक्के दुकाने बंद …

Read More »

चक्रीवादळात राजिपचे 150 कोटींचे नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळामुळे खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) सुमारे 150 कोटी  रुपयांचे नुकसान झाले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या 52  पैकी  45  प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे. नांदवी, शिरवली, निजामपूर , मेंदडी, बोर्लीपंचतन, आगरदांडा, खामगाव, बोर्लीमांडला  …

Read More »

जुम्मापट्टी आणि माथेरान घाटात पर्यटकांची गर्दी; आदिवासींची पोलिसांत तक्रार

कर्जत : बातमीदार  – लॉकडाऊनमधून सूट देऊन जनतेला मुभा देण्यात आली आहे, मात्र त्याचा गैरफायदा उठवला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील असंख्य पर्यटक सध्या नेरळ-माथेरान घाटात आणि जुम्मापट्टी येथे येत आहेत. या अनपेक्षित पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासी लोकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे सावट पसरले आहे.दरम्यान, स्थानिक आदिवासींनी नेरळ पोलीस ठाण्याच्या निवेदन देऊन त्या …

Read More »

माणगावमध्ये भात भिजला; शेतकरी संकटात

माणगाव : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने संबंध दक्षिण रायगड उद्ध्वस्त केला असून माणगाव तालुकादेखील त्याला अपवाद राहिला नाही. शेतात रात्रंदिवस राबून कष्टाने पिकविलेला भात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडे महाराष्ट्र राज्य मार्केट फेडरेशनच्या शासकीय भात खरेदी केंद्रामध्ये शासनाची हमीभाव किंमत मिळविण्याकरिता दिलेला होता. हा भात वादळी पावसात भिजला आहे. …

Read More »

पनवेलमध्ये 51 नवीन रुग्ण; तिघांचा मृत्यू

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 41  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 36 …

Read More »

गोंधळाचा नवा अंक

चार भिंतींच्या वर्गातील औपचारिक शिक्षणाला ऑनलाइन शिक्षण पर्याय ठरू शकते असा दावा अनेकांकडून गेली काही वर्षे विविध स्तरांवर केला जातो आहे. काही विशिष्ट शैक्षणिक शाखा वा विशिष्ट स्तरावरील विद्यार्थ्यांच्या संदर्भात ते खरेही असेल. परंतु सरसकट प्राथमिक व एकंदर शाळा-कॉलेजांतील शिक्षणाला एका झटक्यात ऑनग्राउंडवरून ऑनलाइन करणे वाटते तितके सोपे काम अजिबातच …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याबद्दल महेश साळुंखे यांनी दिले धन्यवाद!

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनामुळे लागू लॉकडाऊनच्या काळात केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी हार्दिक धन्यवाद दिले आहेत. या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात साळुंखे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणीही व्यक्ती …

Read More »