Breaking News

Pravin Gaikar

नागोठण्यात आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने सर्व कामधंदे ठप्प झाले आहेत. आदिवासी बांधवांना सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने पेण-सुधागड मतदारसंघाचे भाजपचे स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने विभागातील चिकणी आदिवासीवाडी, वासगाव, धनगरवाडी, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, कातळवाडी, पायरवाडी, एकलघर, भपक्याची वाडी या आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात …

Read More »

कोतवालवाडी स्थापनादिनी 3000 मास्कची निर्मिती

महिला विकास केंद्राचा उपक्रम कर्जत ः बातमीदार – देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी नेरळ-ममदापूर भागातील 50 एकर जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मृतींना चालना देण्यासाठी कोतवालवाडी ट्रस्टची स्थापना केली. त्या कोतवालवाडी ट्रस्टचा 10 एप्रिल हा स्थापना दिवस होता आणि या दिवशी तेथील महिला …

Read More »

रोह्यात बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

रोहे : प्रतिनिधी – देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गाड्या रस्त्यावर उतरवण्यास बंदी घालण्यात आली. तरीही रोहा शहरात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अवैधरीत्या नागरिकांनी रस्त्यावर उतरवल्यामुळे रोहा वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 29 मार्च ते …

Read More »

कोळी समाजाला शेतकर्यांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी

कोळी बांधवांची मागणी; शेकडो बोटी किनार्‍याला मुरूड ः प्रतिनिधी – अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याचा कोळी समाज मेटाकुटीस आला आहे. ऐन मासेमारी हंगाम सुरू असतानाच कोरोनामुळे सर्व होड्या किनार्‍याला लागल्या आहेत. मुंबईतील प्रमुख बाजार आणि मासळी मार्केटही बंद असल्यामुळे सर्व कोळी बांधव घरी बसून …

Read More »

माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाकडून गरिबांना अन्नदान

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली माँ वैष्णोदेवी मित्र मंडळ उरण यांच्या वतीने  उरण तालुक्यातील नवघर, पागोटे जवळील झोपडपट्टीतील सुमारे 300 गरीब गरजूंना बुधवारी (दि. 8) अन्नदान करण्यात आले, अशी माहिती माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाचे सेक्रेटरी दिनेश सिंह यांनी सांगितले. माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाचे …

Read More »

वेश्वी ग्रामपंचायतीकडून सॅनिटायझरची फवारणी

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 9) ग्रुप ग्रामपंचायत वेश्वी, वेश्वी कातकरीवाडी, दादरपाडा येथे सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. गावकर्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या वेळी उरण पंचायत समितीच्या सदस्या दिशा प्रसाद पाटील, वेश्वी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र शंकर मुंबईकर, ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

अत्यावश्यक सेवा देणार्यांना मास्कचे वाटप

कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी यंदाची आंबेडकर जयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेची सेवा करताना आपला जीव धोक्यात घालणार्‍या आरोग्य रक्षक, सफाई कामगार, पोलीस यांना मास्कचे वाटप केले आहे. खांदा …

Read More »

बेकायदा मद्यविक्री करणारे ताब्यात

तळोजा पोलिसांची नावडे फाटा येथील हॉटेलवर कारवाई पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री करण्यास बंदी असताना, छुप्या पद्धतीने मद्यविक्री करून नियमभंग करणार्‍या तळोजा नावडे फाटा येथील जय मातादी रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बारवर तळोजा पोलिसांनी छापा मारून हजारो रुपये किंमतीचा मद्याचा साठा जप्त केला. तसेच बेकायदा मद्यविक्री करणार्‍या चौघांवर गुन्हा …

Read More »

‘रिलायन्स’कडून आदिवासी वाड्यांत धान्यवाटप

पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत रिलायन्स नागोठणे कंपनीने सीएसआर उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपून बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसह 22 आदिवासी वाड्यांत मोठ्या प्रमाणावर धान्याचे वाटप केले. त्यामुळे गोरगरीब जनतेतून रिलायन्सने नेमकी गरज ओळखून मदतीचा हात दिल्याबद्दल कंपनी प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीची घोषणा …

Read More »

श्रीवर्धन पोलिसांचे पथसंचलन

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन श्रीवर्धन ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलिसांकडून गुरुवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता संपूर्ण शहरात पथसंचलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, असे आवाहन पोलीस करीत होते. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्यासह श्रीवर्धन …

Read More »