तीन कोटींचा कलमार जळाला उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणार्या अमेया यार्डमधील कलमारला आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 29) सकाळच्या सुमारास घडली आहे. या आगीत तीन कोटी रुपये किमतीचा कलमार जळून नष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जेएनपीए बंदरातून देश परदेशात …
Read More »सोनसाखळी चोरांपासून सावध राहा
पनवेल शहर पोलिसांकडून जनजागृती फलक पनवेल : वार्ताहर सणासुदीचे दिवस…खरेदीची लगबग…अन् महिलांची दागिणे घालून बाहेर पडण्याची हौस…सारे काही चोरांच्या पथ्यावर पडणारे…म्हणून महिलांनो, घराबाहेर पडताना सावध राहा…गळ्यातील दागिणे, हातातील बॅग, मोबाइल सांभाळा व होणार्या अप्रिय घटना टाळत मालमत्तांचे स्वसंरक्षण करून चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पनवेल शहर पोलिसांनी केले …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वाणिज्य व शिक्षण व्यवस्थापन संघटनांचे उद्घाटन
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 23) वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण विभाग संघटनांचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनासाठी संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षच्या …
Read More »स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनहित संवर्धक मंडळ, कच्छ युवक संघ, युवानाद, रुधिरसेतू, सन्मित्र मंडळ व श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळ यांच्या सहकार्याने व लोंढे व ओझे कुटुंबीयांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या …
Read More »खारघरमधील चेंबरची दुरूस्ती करण्याची मागणी
भाजप नेते प्रभाकर घरत यांचे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर-3 बेलपाडा गावाच्या बाजूला लागून असलेल्या चेंबरची दुरुस्ती करण्याबाबत भाजप नेते प्रभाकर कमलाकर घरत यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंता (खारघर-1) यांना निवेदन दिले आहे. खारघर सेक्टर-3 येथील बेलपाडा गावाच्या बाजूला लागून असलेल्या चेंबरमधून रस्त्यावर घाणीचे पाणी वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी …
Read More »नवीन पनवेलच्या काही भागात अपुरा पाणीपुरवठा
माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांचे सिडकोला निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 12,13 व 18 या विभागात काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »जेएनपीएत अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त
एका कंटेनरमध्ये आढळला 3030 किलोंचा साठा उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीए बंदरा सीमाशुल्कच्या विभागाने केलेल्या कारवाईत एका कंटेनर मधून तब्बल 3030 किलो रक्तचंदनाचा साठा शनिवारी (दि. 17) जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रक्तचंदनाची किंमत अडीच कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली. सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकार्यांना एका कंटेनरमध्ये रक्तचंदन असल्याची …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशनबाहेरील महिला हत्येचे गुढ उकलले
पती व त्याच्या प्रेयसीनेच दिली सुपारी; मारेकर्यांचा शोध सुरू पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गत गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियंका रावत या 29 वर्षीय महिलेच्या प्रकरणाचा छडा लावण्यात खान्देश्वर पोलिसांना यश आले आहे, ही हत्या प्रियंकाचा पती व त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन घडवून आणल्याचे तासात …
Read More »दै. राम प्रहर अर्थसाक्षर सदरातील प्रश्नमंजुषा
माणगावजवळ होंडा एक्सेडची दुचाकीला धडक; अपघातात एक जखमी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील घोटवळ (ता. माणगाव) फाट्याजवळ मंगळवारी (दि. 13) होंडा एक्सेडची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. होंडा एक्सेड (एमएच-04,एचएन-9989) ही गाडी मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे येत होती. त्याचवेळी अतिश चंद्रकांत म्हस्के (रा. भुवन, ता. माणगाव) हे आपली दुचाकी (एमएच-06,सीजी-2424) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper