Breaking News

Pravin Gaikar

पनवेलकरांनी अनुभवली वाद्यांची मैफल

खारघर : प्रतिनिधी : श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर पनवेलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मी आणि आमची वाद्ये या वाद्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी येथील फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी पनवेलकरांनी वाद्यांच्या मैफलीचा आनंद घेतला. सारेगम फेम म्युझिकल टीमने सादर केलेल्या विविध वाद्यांच्या संगीत मैफलींनी पनवेलकर या वेळी मंत्रमुग्ध …

Read More »

‘अरबन नेशन’च्या दुसर्या शाखेचे उद्घाटन

उलवे : रामप्रहर वृत्त : उलवे नोड परिसरात वाढते नागरीकरण लक्षात घेता या परिसरात नवनवीन उद्योगांना चालना मिळत आहे. त्याअंतर्गत सेक्टर 9 येथे ‘अरबन नेशन’ या जिमची दुसरी शाखा सुरू करण्यात आली. अरबन नेशन या जिमच्या दुसर्‍या शाखेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. उलवे नोड …

Read More »

भूखंडाच्या अमिषाने एक कोटी 68 लाखांची फसवणूक

पनवेल : बातमीदार : भूखंड देतो असे सांगून पनवेल येथील एका व्यापार्‍याची तब्बल एक कोटी 68 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्यात भाग्यलक्ष्मी बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे प्रो.प्रा. राजेंद्र दर्यावसिंग राजपूत यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल प्रदीपकुमार भटनागर (40 वर्षे) यांचा पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट, …

Read More »

पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना नो एंट्रीच?

खारघर : प्रतिनिधी : नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मुंबई उपनगर ते कल्याण, ठाणे, तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. वनविभागाने अधिकृतरीत्या याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला नसला, तरी या वर्षी देखील …

Read More »

अतिक्रमणामुळे वन्यजीवांची नागरी वस्त्यांकडे धाव

उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये मागील कालखंडात कधीतरी आढळून येणारे विविध प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप मोठमोठे अजगर अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. भक्ष्याच्या शोधात आलेले साप, अजगर नागरी वस्तीत आढळू लागले आहेत. तालुकातील वने आणि मोठमोठे डोंगर, दर्‍या नष्ट होत चालल्याने आणि वन्यजीवांच्या आश्रयस्थानावर मानवाने …

Read More »

नऊवारी लुगडं

’लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ’पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल. मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते. वास्तविक नव्वार किंवा नऊवार हे …

Read More »

संघाची निष्ठा, चिकाटी आणि पवार !

स्वाध्याय चळवळीचे अध्वर्यू आणि महाराष्ट्र-गुजरातमधील जनतेला पूज्यस्थानी असलेले थोर संत पांडुरंगशास्त्री आठवले नेहमी म्हणत असत की हे सरकार आपले आहे, अशी आत्मीयता रुजविण्यात स्वतंत्र भारतातील राज्यकर्ते फार कमी पडले आणि त्यामुळे लोकांच्यात क्षमता असूनही भारताचा भौतिक विकास अपेक्षित उंची गाठू शकला नाही. काका गाडगिळांनीही राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी जे करणे आवश्यक …

Read More »

दासगाव तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभिकरण करणार -आ. प्रवीण दरेकर

महाड ः प्रतिनिधी :  महाड तालुक्यातील विरेश्वर तलावाच्या धर्तीवर दासगाव तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभिकरण करणार असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी तलावाची पाहणी करताना सांगितले. या गाळ उपसणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. महाड तालुक्यातील पाणीटंचाई भागाच्या दौर्‍यावर असलेले भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी …

Read More »

ग्रामीण रुग्णालय कशेळेकडून रुग्णांची लूटमार सुरूच

केसपेपरसाठी प्रत्येकी पन्नास रुपयांची मागणी कर्जत : प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचे आणि त्यातही आदिवासी लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उभारलेले कशेळे ग्रामीण रुग्णालय रुग्णांना सेवा देण्याऐवजी नाहक त्रास देतांना दिसत आहे. रुग्ण तपासणी करण्यासाठी आल्यानंतर यांच्याकडून 10 रुपये आकारून केसपेपर बनवला जातो, पण कशेळे ग्रामीण रुग्णालय रुग्णांकडून चक्क 50 …

Read More »

रायगडात प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा

रायगड हा औद्योगिक जिल्हा म्हणून सध्या ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठमोठाले प्रकल्प येत आहेत. परंतु या जिल्ह्यात प्रथमिक शिक्षणाच्या नावाने बोंब आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. शाळांच्या समायोजनाचा प्रश्न आहे.  प्राथमिक शाळांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कोलमडून पडली …

Read More »