Breaking News

Pravin Gaikar

किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादनाचे आज आयोजन

महाड : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम शुक्रवार (दि. 19)  किल्ले रायगडवर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने चैत्र पौर्णिमा शुक्रवारी …

Read More »

ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ

मुरूड : प्रतिनिधी : मुरूडचे ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून, हे मंदिर सजवण्यात आले आहे. या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, कल्याण व डोंबिवली भागातील असंख्य भक्तगण आल्याने मुरूडमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. मुरूड समुद्रात कासा किल्ल्यात शिवाजीराजांनी भवानी मातेची स्थापना केली आहे. कोट म्हणजे किल्ला आणि किल्ल्यातील …

Read More »

लौजी प्राथमिक शाळेत भुरट्या चोरांचा हैदोस

खोपोली : प्रतिनिधी : नगरपालिका शिक्षण मंडळाच्या लौजी येथील वासुदेव बळवंत फडके या शाळेत बुधवारी (दि. 17) रात्री भुरट्या चोरांनी हैदोस घातला. चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत सर्व वर्गखोल्यांचेही कुलूप तोडले. व सामान अस्ताव्यस्त केले. शाळेच्या बालवाडी वर्गातील लहान मुलांची खेळणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आणलेले गणवेश चोरट्यांनी लंपास केले. …

Read More »

मुरूड नांदगावमध्ये नारळाचे झाड पडून तीन जखमी

मुरूड : प्रतिनिधी : तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुरुवारी (दि. 18) दुपारी नारळाचे झाड बाजूच्या एका घरावर आणि रस्त्यावर कोसळले. त्यामुळे घरातील तीन व्यक्ती जखमी झाल्या, तर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील अब्दुलसत्तार म्हसलाई यांच्या बागायत जमिनीमधील एक नारळाचे झाड जोरदार वार्‍यामुळे मुळासकट …

Read More »

परळीत विदेशी दारू साठा जप्त

भरारी पथकाची कारवाई, दोन आरोपी अटकेत पाली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भरारी पथकाने परळी (ता. सुधागड) येथे एका कारमधून विदेशी दारू साठा जप्त केला असून, या प्रकरणी दोघांना अटक केली. पाली-खोपोली राज्य महामार्गवरील वाकण, पाली, पेडली, परळी या मुख्य नाक्यावर भरारी पथकांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. …

Read More »

उंबरवाडी, शेंडेवाडीत पाण्यासाठी पायपीट

कर्जत : बातमीदार : तालुक्यातील पोशीर आणि दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील  उंबरवाडी आणि शेंडेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वाढली आहे. नळपाणी योजनेचे पाणी कधी तरी येत असल्याने महिलांना पायपीट करून खाजगी बोअरवेलवर जावे लागत आहे. दरम्यान, पाणीटंचाई तीव्र असलेल्या या दोन्ही वाड्यात ट्रँकरचे पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे. दहिवली ग्रामपंचायतीमध्ये …

Read More »

राज्यात आतापर्यंत 118 कोटींचे घबाड जप्त

आचारसंहिताभंगाचे 15 हजार गुन्हे; तीन हजारांवर तक्रारी मुंबई ः प्रतिनिधी :  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपच्या माध्यमातून  नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत 3 हजार 211 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, तर आचारसंहिता भंगाचे 15 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकही सजगतेने भाग घेत आहेत, …

Read More »

चाकूने फोडले मित्राचे डोळे; क्रिकेटवरून वाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सहा महिन्यांपूर्वी क्रिकेटवरून झालेल्या वादातून सहा जणांनी त्यांच्या 22 वर्षांच्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीच्या नेब सराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली. मित्राची हत्या करताना सहाही आरोपींनी क्रूरपणाचा कळस गाठला. हत्या करण्यापूर्वी तरुणाचे चाकूने डोळे फोडले. …

Read More »

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ठाणे ः प्रतिनिधी :अवघा देश निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार परिसरात इयत्ता 9वीत शिकणार्‍या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही 15 वर्षीय पीडित मुलगी घटना घडली तेव्हा आपल्या मित्रासोबत होती. दोघे निर्जन स्थळी पोहचल्याचे हेरून दोन लोकांनी तिच्या मित्रासह मुलीला झाडाला बांधले आणि …

Read More »

आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या नक्षलीचा खात्मा

छत्तीसगड ः वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली. दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलींनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. काही वेळाने नक्षली जंगलात …

Read More »