Breaking News

Pravin Gaikar

देश सेवेसाठी पंतप्रधानांची सोबत…

सर्जिकल स्ट्राईक असो वा एअर स्ट्राईक…देशाच्या प्रत्येक शत्रूला त्याची जागा दाखवून देणे हे प्रत्येक भारतीय देशभक्ताचे काम आहे. मग ते स्ट्राईक सीमेपलीकडे असो, सीमेवर असो वा सीमेदरम्यान असो. सीमेवर आपले सैन्य ही कामगीरी चोख बजावत आहे, मात्र देशांतर्गत निर्माण होणारे शत्रू आणि त्यांच्या आक्रमणांना आपल्यालाच प्रत्युत्तर द्यायचे आहे. यासाठी कोणाला …

Read More »

पारदर्शकतेचा उत्सव

यंदाच्या निवडणुकीत भारतीय लोकशाही स्वतःचेच काही विक्रम मोडीत काढणार आहे. तब्बल 90 कोटी नोंदणीकृत मतदार या वेळी आपला मतदानाचा अधिकार बजावतील. ही आजवरची सर्वोच्च मतदारसंख्या आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिका आणि युरोपातील जनसंख्येपेक्षाही हा आकडा मोठा आहे. यापैकी सुमारे साडेआठ कोटी मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. संपूर्ण देशाला ज्याची …

Read More »

लोकसभा निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील या महत्त्वपूर्ण निवडणुकीचा बिगूल कधी वाजणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राजकीय पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सर्वांच्या प्रतीक्षेला पुढील आठवड्यात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून यंदा लोकसभा निवडणूक …

Read More »

महिला बचत गटांसाठी अस्मिता बाजार योजना

मुंबई : प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची आता अस्मिता अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करता येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणार्‍या आवश्यक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या अ‍ॅपच्या सहाय्याने बचत गटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे. जागतिक महिला दिनी राज्याच्या …

Read More »

महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना नारीशक्ती पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशभरातील 44 माहिलांना नारीशक्ती पुरस्काराने …

Read More »

झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार

रांची : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रांचीजवळच्या कुजू घाटात डम्पर आणि इनोव्हा कार यांच्यात हा अपघात झाला. रांचीच्या हटिया येथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबीय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. या वेळी कुजू …

Read More »

कंत्राटी कर्मचार्यांना वेतनप्राप्तीची हमी

मुंबई : प्रतिनिधी : कंत्राटी कर्मचार्‍यांना कंत्राटदारांसमवेत केलेल्या करारानुसार आणि विविध कामगार कायद्यानुसार वेतन प्रदान करण्यासंदर्भात समान कार्यपद्धती लागू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक होते. या संदर्भात  उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार कंत्राटी कर्मचार्‍यांना कंत्राटदारांमार्फत वेतन अदा करताना समान कार्यपद्धती अवलंबिण्यात …

Read More »

‘मालमत्तेच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करा’

पनवेल : वार्ताहर : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या मालमत्तेचे रक्षण करणे हे महत्त्वाचे असून अनेक वेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळे घरफोड्या व चोर्‍या होतात. हे टाळण्यासाठी नागरिकांनी आत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी व सोल्युशनचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई अंतर्गत पनवेल …

Read More »

पळस्पे विद्यालय जागतिक महिला दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. रिया पाटील, अंजली चव्हाण, कविता मुंडे या विद्यार्थिनींनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी आई माझी मायेचा सागर, अनमोल जन्म दिला ग आई, …

Read More »

नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी नेरे येथील शांतीवनात जाऊन कुष्ठरुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप केले. या वेळी भाजप कार्यकर्ते अशोक …

Read More »