पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात गांधीनगर ः एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताच्या निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात, तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केला आहे. गुजरातच्या गांधीनगर येथे असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचा …
Read More »श्रीलंका सहलीच्या निमित्ताने पनवेलकरांची फसवणूक
पनवेल : सहलीनिमित्त पनवेलवरून श्रीलंकेसाठी रवाना झालेल्या शेकडो पर्यटकांची एका ट्रॅव्हल्स एजन्सीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल तालुक्यातील 350 पर्यटक पनवेलवरून चेन्नई या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांची पुढील प्रवासाची श्रीलंकेची तिकिटे रद्द झाल्याचे कळल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामुळे शेकडो पर्यटकांना विमानतळावर 24 तास ताटकळत थांबावे लागले.भारतयात्रा ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत …
Read More »अलिबागचा सफेद कांदा उरण बाजारात
उरण :अलिबाग तालुक्यातील गुणकारी सफेद कांदा उरण शहरात दाखल झाला असून कांद्याला मागणी वाढली आहे. उरणवासीय कांदा खरेदी करताना दिसत आहेत.भातशेतीची कापणी झाल्यानंतर काहीच दिवसांनी सफेद कांद्याची लागवड केली जाते. डिसेंबर महिन्यात कांद्याचे पीक येते. डिसेंबर महिन्याच्या शेवटी अलिबाग, पेण, वडखळ नाका आदी ठिकाणी सफेद कांद्याच्या माळा विकावयास आलेल्या दिसतात. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
खारघर : खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मॉडल मेकिंग स्पर्धा, वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. विज्ञान विभागातर्फे विज्ञानावर आधारित मासिकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, प्राचार्य डॉ. एस.टी. गडदे तसेच विभागप्रमुख …
Read More »सोनारीचे जागृत फदलेश्वर शंकर मंदिर
उरण : महाशिवरात्री सोमवारी (दि. 4)असल्याने उरण तालुक्यातील सोनारी गावाजवळील स्पीडी सीएफएससमोर उंचावर सुंदर फदलेश्वर शंकर मंदिर असून सोनारी गावचे कृष्णा हरी तांडेल, महादेव हरी तांडेल व शंकरशेठ हरी तांडेल यांनी ते बांधले आहे. गेली 25 वर्षांपासून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सात दिवस अगोदर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर मंदिर हे …
Read More »आज घुमणार ‘हर हर महादेव’चा जयघोष
उरणच्या शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जेएनपीटी : उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, कळंबुसरे, पिरकोण, आवरे, खोपटा, शेवा, देऊळवाडी (उरण शहर), केगाव, कोटगाव (रेल्वे स्टेशन), घारापुरी, करळ या गावांतील बारा शिवमंदिरे सध्या भाविकांची श्रध्दास्थान बनली आहेत. यावर्षी महाशिवरात्र उत्सव हा सोमवारी (दि. 4) येत असल्याने तालुक्यातील ही शिवमंदिरे महाशिवरात्र …
Read More »विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी -न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी
पेण : मराठी भाषेला संत महात्म्यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी संतांचे साहित्य वाचकांनी वाचले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मराठी वाचन व लेखन संस्कृती जोपासावी, असे आवाहन पेण न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी यांनी येथे केले. पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी …
Read More »करवाढ नसलेला खोपोली पालिकेचा अर्थसंकल्प
खोपोली : कोणतीही करवाढ नसलेल्या खोपोली नगर पालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला बुधवारी (दि. 27) मंजुरी देण्यात आली. खोपोली नगर पालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. या सभेत सन 2019-20चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात आरंभीच्या शिलकेसह 131 कोटी 23 लाख 47 हजार रु. उत्पन्न, तर अपेक्षित …
Read More »अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देणार -डॉ. एस. एफ. डिसूजा
कर्जतमध्ये भात संशोधन सभा कर्जत : भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळ्या संशोधन पद्धतीची गरज असून अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अणू विज्ञान संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. डिसूजा यांनी कर्जत येथे केले. महाराष्ट्र राज्य भात गटाच्या भात संशोधनावरील 53व्या सभेचे …
Read More »प्रलंबित महाड-मढेघाट-पुणे मार्गाला हिरवा कंदील
आ. प्रवीण दरेकरांमुळे स्वप्न होणार साकार महाड : महाडकरांसाठी दिवास्वप्न ठरलेल्या पुण्यासाठी जवळचा असलेला महाड-मढेघाट-पुणे या मार्गाच्या प्रलंबित प्रस्तावाला तत्काळ मान्यता देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. आ. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या मागणीनुसार गडकिल्ल्यांना जोडणार्या या मार्गाला पर्यटन मार्ग म्हणून विकसित करण्याबाबत सूचना मुख्य सचिवांना देण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper