मुंबई ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे पत्रकारितेकडे ओढा असलेल्या बारावी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता विद्यानगरी कालिना येथील गरवारे व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या प्रेक्षागारात एक विनाशुल्क पत्रकारिता तोंडओळख कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत संस्थेच्या पत्रकारिता वर्गाचे माजी विद्यार्थी आणि नामवंत पत्रकार मार्गदर्शन करतील. …
Read More »Monthly Archives: July 2019
भाजप सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्यपदी राजेंद्र कदम
खोपोली ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सहसंयोजक व कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) राहुल जाधव यांनी राजेंद्र कदम यांची भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तिपत्र राजेंद्र कदम यांना खोपोली मंडळ अध्यक्ष श्रीकांत पुरी व खालापूर मंडळ अध्यक्ष बापू घारे यांच्या हस्ते भाजप खोपोली …
Read More »मायावतींच्या भावावर कारवाई; 400 कोटींचा प्लॉट जप्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बसपाप्रमुख मायावती यांचा भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुरुवारी (दि. 18) आयकर विभागाने मोठी कारवाई केली. आयकर विभागाने आनंद कुमार यांचा एक निनावी प्लॉट ताब्यात घेतला आहे. हा प्लॉट नोएडा येथे असून त्याची किंमत 400 कोटी आहे. आयकर विभागाने आज आनंद …
Read More »शिव छत्रपती पुरस्कार विजेते देवेंद्र चौगुले काळाच्या पडद्याआड
अलिबाग ः वार्ताहर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे शिव छत्रपती पुरस्कार विजेते व तालुक्यातील सारळ माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक देवेंद्र चौगुले यांचे गुरुवारी (दि. 18) मुंबईत रुग्णालयात उपचारासमयी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार …
Read More »सुटकेसाठी लढा सुरूच राहणार ; परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही; कुलभूषण जाधव अटक प्रकरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी मागणी करतानाच जाधव यांच्यासाठी सरकारचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. संपूर्ण देश हा कुलभूषण जाधव …
Read More »’चांद्रयान-2’चे सोमवारी प्रक्षेपण; ’इस्रो’ची माहिती
श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था तांत्रिक कारणामुळे ऐनवेळी उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाचा दिवस आणि वेळ अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती ’इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली. चंद्रावर उतरणार्या पहिल्या भारतीय यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रीहरिकोटाच्या सतीश …
Read More »पनवेलमध्ये वर्षावास प्रारंभ
पनवेल ः तथागत बुद्धानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक व बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माला पुनर्जीवित केले. ‘असे प्रतिपादन बौद्ध धम्माचे अभ्यासक व सुप्रसिद्ध धम्मप्रवचनकार कल्पेश कांबळे गुरुजी यांनी केले. ते बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार व भारतीय बौद्ध महासभा, विभाग क्र. 14 यांच्या वतीने आम्रपाली बुद्धविहार, सेक्टर 9, बिनेदार …
Read More »चांग्याचापाडा रयत शिक्षण संस्थेच्या शाखेवर अकरावी, बारावीपर्यंत वर्ग करण्याची मागणी
पनवेल : शहापूर तालुक्यातील चांग्याचापाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेवर अकरावी आणि बारावीपर्यंत वर्ग सुरू करावे, या मागणीसंदर्भातील निवेदन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकेनेते रामशेठ ठाकूर यांना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य बबन हरणे यांनी गुरुवारी दिले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भरतशेठ तेलंगे, …
Read More »सीकेटी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर महाविद्यालयामध्ये डॉ. सी. डी. देशमुख सेंटर फॉर अॅडमिनिस्ट्रेटीव सर्व्हिसेस व अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन गुरुवारी (दि. 18) करण्यात आले होते. हे सेमिनार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. खांदा कॉलनीमधील सीकेटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या …
Read More »टॅक्सीचालकांनी मानले आ. प्रशांत ठाकूर यांचे आभार
पनवेल : वार्ताहर खारघर येथे टॅक्सी स्टॅण्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या भागातील टॅक्सीचालकांनी व सभासदांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर टॅक्सी स्टॅण्ड हायवे सेक्टर 2 लिटील मॉलसमोर हायवेलगत टॅक्सी स्टॅण्ड मंजूर करून दिला. त्याबद्दल शिवसेना माजी पनवेल उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील, तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper