Breaking News

Monthly Archives: July 2019

पावसाळ्यातील कडक उन्हाने म्हसळाकरांसह रायगडकर तापले

म्हसळा ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील भातशेतीची बहुतांश लावणी पूर्ण झाली आहे. मंगळवार दि.16 जुलैपासून आज शुक्रवार दि. 19पर्यंत जिल्ह्यात पावसाने पाठ फीरवल्याने भात पिके पिवळी पडण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त व उकाड्याने हैराण झाल्याने नागरीक बेजार झाले आहेत. जिल्ह्यांत आजपर्यंत सरासरी 1588.75 मि.मी. पर्जन्यमान आहे. मागील वर्षी पेक्षा 53.35. मि.मी.ने पेक्षाही …

Read More »

सरकारच्या कामांची माहिती घराघरात पोहोचवा

कर्जत येथील महिला मेळाव्यात अश्विनी पाटील यांचे आवाहन कर्जत : बातमीदार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती द्यावी आणि महिलांना आपलेसे करावे, असे आवाहन भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघ संयोजिका अश्विनी पाटील यांनी कर्जत येथे केले. कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला मोर्चा पदाधिकार्‍यांची बैठक …

Read More »

आयआरबीचे कंत्राटी कामगार संपावर

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आयआरबी कंपनीच्या विविध विभागात काम करणार्‍या 179 कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या 18 वर्षांपासून काम करणारे हे कामगार विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. भूमिपुत्रांना टोल सुरू असेपर्यंत कामाची हमी, 1 एप्रिल 2019पासून प्रलंबित असलेली वेतनवाढ मिळावी, आयआरबीला …

Read More »

दोन वर्षांपासून आपटवणे शाळा दुर्लक्षित

मंदिरामध्ये भरतात वर्ग; तहसीलदारांकडून पाहणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आपटवणे येथील प्राथमिक शाळेचे छप्पर व भिंत सुमारे दोन वर्षांपूर्वी कोसळली. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहचू नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील काळभैरव मंदिरात शाळा भरविली जात आहे, मात्र आजतागायत शाळेच्या इमारत दुरुस्तीकडे रायगड जिल्हा …

Read More »

माथेरानच्या जलवाहिनीला गळती

नेरळच्या हुतात्मा चौकात पाण्याचा कालवा; जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष कर्जत : बातमीदार नेरळजवळील उल्हास नदीमधील पाणी उचलून जलवाहिनीद्वारे माथेरान या पर्यटनस्थळी नेले जाते. ती जलवाहिनी गेल्या 15 दिवसांपासून फुटली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळे नेरळच्या हुतात्मा चौकातून कालव्यासारखे पाणी वाहत आहे. त्यामुळे नेरळमधील हुतात्मा चौकातील बागेची मातीदेखील वाहून जात आहे. दरम्यान, …

Read More »

विंडीजविरुद्ध रोहितकडे धुरा?

भारतीय युवा खेळाडूंना संधी मिळणार मुंबई : प्रतिनिधी विश्वचषकानंतर आता भारताचा संघ वेस्ट इंडिजबरोबर दोन हात करणार आहे. भारत आणि विंडीज यांच्यामध्ये दोन कसोटी सामने आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय व ट्वेन्टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी संघ निवडताना युवा खेळाडूंना जास्त संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या …

Read More »

‘हॉल ऑफ फेम’मध्ये सचिनचा समावेश

लंडन : वृत्तसंस्था क्रिकेट जगतातील माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू कॅथरिन यांनाही हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सचिन, डोनाल्ड, कॅथरिनसह तिघांचा आयसीसी …

Read More »

महाविद्यालयांत गुरुपौर्णिमा साजरी

खारघर : प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य डॉ. डी. जी. डोंगरगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कळंबोली येथील एसएमडीएल महाविद्यालयातदेखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. एनएसएस विभाग व डीसीबी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपण

उरण : बातमीदार टायगर ग्रुपच्या वतीने मोठी जुई येथील हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून या वेळी आंबा, काजू, कोकम अशी कलमे लावण्यात आली. या कार्यक्रमास टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव, मावळ अध्यक्ष अनिकेत घुळे, मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे, रायगड अध्यक्ष निलेश चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय …

Read More »

वर्षासहल व काव्यवर्षा कार्यक्रम उत्साहात

चिरनेर : प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोल्ही कोपर (पनवेल) येथील डोंगरावर असलेल्या श्री शंकर व श्री दत्तगुरु मंदिराच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य विकास मंडळाने वर्षासहल व काव्यवर्षा हा कार्यक्रम आयोजित केला होता. सलग तीन वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, महाप्रसादही असतो. या कार्यक्रमासाठी आर. सी. घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव …

Read More »