Breaking News

Monthly Archives: December 2019

उल्हास नदी संवर्धनाचा प्रयत्न

बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही, तर नद्यांमधील जीवांचे आयुष्यदेखील प्रदूषित पाण्यात असल्याने कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हास नदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदीमध्ये होतो आणि ही नदी अनेक …

Read More »

पारा घसरला

ऋतुचक्र बदलत असते, परंतु निसर्गाची परिक्रमा ही ठरलेलीच असते. अलीकडच्या काळात मात्र त्यात प्रचंड बदल झालेला आहे. हल्ली कधीही पाऊस पडतो. यंदा तर वरुणराजाने धो धो बरसून सर्वांना अक्षरश: झोडपले. तरीही अधेमधे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उकाडा जाणवत होता. अखेर थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. तीदेखील हुडहुडी भरविणारी. तशी थंडीची …

Read More »

अलिबाग ः सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती समुद्रकिनारे असते. त्यामुळे वीकेण्डला जोडून आलेली ही पर्वणी साधण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. (छाया : जितू शिगवण)

Read More »

‘आध्यात्मिक साधना सर्व शारीरिक व्याधींपासून दूर ठेवते’

मुरूड ः प्रतिनिधी मुरूडजवळील डोंगरी गावात श्री स्वामी समर्थ मठ गेली अनेक वर्षे उत्तमरीत्या काम करीत आहे. निसर्गरम्य डोंगरी गावात समुद्रासमोर विशाल अशा मठात हजारो भक्त रोज दर्शनासाठी येतात व स्वामीभक्त त्रिशाताई भक्तांशी संवाद साधतात. त्या स्ववादातून हजारो भक्तांची गार्‍हाणी ही शारीरिक व्याधींची असतात. म्हणूनच त्रिशाताई यांनी मुरूड शहरात माली …

Read More »

सिद्धगडावर बलिदान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा

कर्जत ः प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हुतात्मा झालेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी 1 आणि 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगडावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार …

Read More »

‘वीज बिल वसुलीसोबतच ग्राहकसेवेला प्राधान्य द्या’

पेण ः प्रतिनिधी थकबाकी वसुली व वीजचोरांविरूद्ध मोहीम राबवण्यासोबत सर्वोत्तम ग्राहकसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. पेण, अलिबाग आणि पनवेल ग्रामीण येथे उपविभागीय अभियंता ते शाखा अभियंत्यांपर्यंतच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी पेण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, …

Read More »

मुंबई-मांडवा जलवाहतुकीच्या फेर्‍यांमध्ये वाढ

अलिबाग ः प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच उगवत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागकडे येण्यास सुरुवात झाली आहे. गेट वे येथून जलवाहतुकीने आरामदायी प्रवास करीत पर्यटक मांडवा बंदरात दाखल होत आहेत. मुंबईकडून अलिबागकडे जलवाहतुकीने येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या पाहून पुढील चार दिवस बोटींच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. दररोज साधारणपणे …

Read More »

जांभूळपाडा अंगणवाडी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

सुधागड ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावामध्ये असलेल्या अंगणवाडीची इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जांभूळपाडा येथील अंगणवाडी बांधून 36 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे इमारत मोडकळीला आली आहे. पावसाळ्याच्या दिवासात तर अनेक ठिकाणी पाणीगळती होते. काही ठिकाणी भिंती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे  अंगणवाडीसेविका आणि मदतनीसांना मुलांसाठी आणलेला पोषण आहार …

Read More »

मोरबे धरणपात्रातील वाळूउपसा थांबवा, बोरगाव ग्रामस्थांचे तहसीलदारांना साकडे

खोपोली ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या मोरबे धरणपात्रात जाणार्‍या धावरी नदी परिसरात वाळूमाफियांनी धुडगूस घातला असून, या माफियांना वेळीच आवरा, अशा आशयाचे लेखी निवेदन बोरगाव खुर्द आणि सोंडेवाडी ग्रामस्थांनी खालापूर तहसील कार्यालयात दिले आहे. माथेरानच्या पायथ्याशी मोरबे धरण आहे. या धरणालगत असलेली गावे, वाड्या बफर झोनमध्ये येत …

Read More »

नकली दागिने विकून फसवणूक करणारे दोन जण जेरबंद

पनवेल : वार्ताहर खांदेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये एका व्यक्तीला नकली सोन्याचे दागिने विकून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पकडून पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नकली सोन्याचे दागिने विकून फसवणूक करणार्‍या टोळीचे प्रमाण वाढीस लागले होते. पाच …

Read More »