पनवेल ः आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास पनवेलमधील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिरापासून सुरुवात झाली. या सोहळ्यास मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला ठाकूर उपस्थित होत्या. या सोहळ्यास छाया म्हात्रे, रूपा कांडपिळे, प्रतिभा दळवी, सुमेधा गुरुजी, अश्विनी खेडकर, अलका जैतपाल, संध्या दांडेकर, रेखा जोशी, हेमलता …
Read More »Yearly Archives: 2019
नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचा सत्कार
पनवेल ः श्री श्री जगन्नाथ संस्कृतिक सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आपली भारतीय संस्कृती जपत कालिकामाता मंदिरापासून रथयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या रथयात्रेनिमत्त प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. रथयात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन अॅड. भुजबळ यांनी सेवा केली. महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील …
Read More »पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाची सभा
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाची सभा बुधवारी (दि.10) संघाच्या सभागृहात अध्यक्ष नंदकुमार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सचिव जयवंत गुर्जर, बी. एन, खेडेकर, जगन्नाथ जोशी यांनी कामकाजात सहाय्य केले. अनुप्रिता काळण यांनी गतवर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सचिवांनी 2018-19 सालात संघाच्या …
Read More »उरण नगरपरिषद येथे राजेंद्र म्हात्रे यांचा सत्कार
पनवेल ः वार्ताहर एनआय हायस्कूल उरणचे शिक्षक राजेंद्र काशिनाथ म्हात्रे हे नुकतेच प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांना उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करुन निरोप देण्यात आला. राजेंद्र काशिनाथ म्हात्रे यांनी अलिबाग येथील चोंढी शाळेत 10 वर्षे सेवा केली. त्याचप्रमाणे एनआयहायस्कूल येथे 28 वर्षे सहाय्यक शिक्षक या …
Read More »रोडपालीच्या गावठाण विस्ताराची मोजणी
पनवेल ः बातमीदार गावठाणाच्या हद्दीत 200 मीटर अंतरावर नैसर्गिक गरजेपोटी वाढलेली घरे नियमित करण्याचे परिपत्रक काढण्यात आले असले तरी सिडकोकडून स्थानिकांनी आकार वाढवलेल्या घरांवर कारवाई केली जाते. ही कारवाई योग्य आहे का, हे निश्चित करण्यासाठी रोडपाली गावच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने खासगी एजन्सी नेमून गावठाण मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »निवडणूक भत्ता लांबणीवर
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार पनवेल ः बातमीदार नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा भत्तादेखील शासकीय कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार आहे. राज्य सरकारने निवडणूक भत्ता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्याचे आदेश दिल्यामुळे 2019चा निवडणूक भत्ता मिळण्याची प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून पनवेल मतदारसंघाची नोंद …
Read More »इंडिया स्टील कंपनी रहिवाशांच्या मुळावर
5 जुलै 2013ची रात्र. खोपोलीतील विहारी, सिद्धार्थनगर, मोहनवाडी, प्रकाशनगर, विहारी ठाकूरवाडीतील रहिवासी रात्रीचे जेवण केल्याने काही झोपण्याच्या तयारीत तर काही दिवसभर काबाडकष्ट करून दमलेभागल्याने अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी गेलेले, तर काही जागे असूनही झोपलेले, काही दुसर्या पाळीतील कामगार घरी येणार असल्याने वाट पाहत घरातील गुजगोष्टीत मग्न असलेले. या परिसरातील बहुतेक …
Read More »भाजप-शिवसेना महायुतीने करून दाखवलं!
समोरच्या माणसाला कमी लेखायचं, त्याला काहीच कळत नाही, जे कळतं ते केवळ आणि केवळ मलाच, असा स्वतःच्या मनात (आणि स्वतःबद्दल) गैरसमज करून घ्यायचा. किंबहुना आम्ही केलंय तेच बरोबर दुसर्याने केलंय ते सर्वथा चूकच, अशी प्रवृत्ती आजकाल राजकारण्यांमध्ये आणि पत्रकारितेत वाढू लागली आहे की काय असं वाटतं. पत्रकारिता करताना आपण ’नीरक्षीरविवेकेन’ …
Read More »कामगार हिताय, कामगार सुखाय! ; गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस वेतनवाढ आणि सोयीसुविध
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल संघटनेच्या माध्यमातून न्हावा-शेवास्थित पंजाब कॉन्वेर सीएफएसमधील गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करारनामा झाला. त्यामुळे …
Read More »मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देता येत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजासह राज्य सरकारला दिलासा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर दोन आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाबाबतचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर या निर्णयाला आरक्षण विरोधकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper