अरूणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ सोहळा शनिवारी (दि. 15) झाला. या कार्यक्रमास रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा स्कुल कमिटीचे चेअरमन, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत …
Read More »Monthly Archives: February 2020
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पाहणी
सातारा : रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज येथे ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ साकारले जात आहे. या भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या भवनाची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली. श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे …
Read More »ठाकरे सरकार कोकणात नाणार प्रकल्प राबविणार?
शिवसेनेच्या मुखपत्रात जाहिरात मुंबई : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील मते मिळवणार्या शिवसेनेने आता मात्र यू-टर्न घेतल्याचे दिसते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात नाणार प्रकल्पाचा उदोउदो करणारी जाहिरात छापून आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले …
Read More »फुंडे हायस्कूलचे संस्कार परीक्षेत सुयश
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे, फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात गांधी विचार संस्कार परीक्षेत उज्ज्वल सुयश मिळवले आहे. दरवर्षी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर आणि त्यांच्या विचारांवर आधारीत इयत्ता पाचवी ते नववी अखेर इयत्तावार प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते. …
Read More »श्री साई नारायण बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
पनवेल : वार्ताहर प. पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या 84व्या जन्मोत्सवानिमित्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पनवेल येथील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या श्री साई बाबांच्या मंदिराच्या प. पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांचा 84वा जन्मोत्सव समारंभ (वार्षिक बालदिवस उत्सव) …
Read More »वाजेकरशेठ उरणकरांच्या गळ्यातील ताईत
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन, फुंडे कॉलेजमध्ये तु. ह. वाजेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारितोषिक वितरण उरण : वार्ताहर तुकाराम हरी वाजेकर यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उरणचा नावलौकिक सतत उंचावला ते वाजेकरशेठ उरणकरांच्या गळ्यातील ताईत आहेत असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग …
Read More »‘सीकेटी’त आंतरराष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी
भाषा व साहित्य संशोधनासंदर्भात इंग्रजी विभागाचा उपक्रम नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात नुकतीच भाषा व साहित्याची संशोधन कार्यप्रणाली या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. सीकेटी महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग, इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया (मुंबई चॅप्टर) …
Read More »राष्ट्रीय कुमार-कुमारी गट कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्राचे संघ बाद फेरीत रोहतक : वृत्तसंस्थाहरियाणातील रोहतक येथे चालू असलेल्या 46व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. महाराष्ट्राच्या मुलांनी पाँडेचरीला, तर मुलींनी आपल्याच विदर्भ संघाला चितपट करीत आगेकूच केली.महाराष्ट्राच्या मुलांनी साखळीतील पहिल्या सामन्यात पाँडेचरीचा 57-25 असा सहज पाडाव केला. आक्रमक …
Read More »संतोष परदेशी यांना राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक
उरण : रामप्रहर वृत्तगुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उरण येथील संतोष परदेशी यांनी गोळाफेकमध्ये सुवर्णपदक, तर हॅमर थ्रो या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. ही स्पर्धा वडोदरा येथील मंजलपूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाली. संतोष परदेशी हे रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पनवेल तालुका आरोग्य विभागात सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये …
Read More »अखेर धोनी करणार कमबॅक!
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाची सुरुवात येत्या 29 मार्चपासून होत आहे. यासाठी धोनी लवकर सराव सुरू करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि चाहते त्यांच्या थाला (लिडल)ची वाट पाहत आहेत.धोनीने केल्या वर्षी 10 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper