Breaking News

Monthly Archives: May 2020

पनवेलमध्ये एक कोरोनाबळी, 13 नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील विचुंबे येथे कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून, 13 नवे रुग्ण आढळले आहेत. यात महापालिका क्षेत्रातील नऊ आणि ग्रामीण भागातील चार रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाच्या मंगळवारी (दि. 13) समोर आलेल्या रुग्णांमध्ये नऊ महिन्यांची एक बालिका आहे.  कामोठे चार, खारघर तीन, नवीन पनवेल आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एक …

Read More »

शुभ वर्तमान! रायगडात 103 जणांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात सोमवार (दि. 11)पर्यंत 316 जणांना कोरोनाची लागण झाली असून, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 103 रुग्णांनी कोरोनावर मात करून जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. बरे झालेल्यांना रुग्णालयातून बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही …

Read More »

ठाकूर कुटुंबीयांकडून गोरगरीबांना मदतीचा ओघ सुरूच

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 मधील गोरगरीब कुटुंबांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि माजी खासदार दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या विद्यमाने जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो …

Read More »

अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचवा

शासनाने उपाययोजना करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका क्षेत्र व परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोना रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे, याची माहिती समस्त पनवेलकर जनतेला मिळावी, …

Read More »

आदित्य ठाकूरवर कौतुकाचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य परेश ठाकूर याने आपल्या नवव्या वाढदिवसानिमित्त स्वत:च्या पिगी बँकमध्ये जमा झालेले 2470 रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत जमा केले. याद्वारे त्याने सामाजिक बांधलकीचा कौटुंबिक वारसा लहानवयातच जोपासला आहे. त्याबद्दल सर्वस्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.आदित्य हा दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नातू आणि …

Read More »

रायगडात 292 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्याही फेरा वाढवू लागली आहे. 12 तालुक्यांमधील 66 गावे, 226 वाड्या असे मिळून एकूण 292 ठिकाणी 31 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  पेण, महाड, पोलादपूर, उरण, पनवेल, खालापूर, रोहा, पाली, श्रीवर्धन, मुरूड, तळा, कर्जत या तालुक्यांमध्ये …

Read More »

आत्मनिर्भरतेचे पर्व सुरू

कोरोनाचे संकट इतके भीषण आहे की याने जगातील बलाढ्य देशही डळमळले आहेत, परंतु आपण या संकटातून संधी शोधत 21व्या शतकावर भारताचे नाव कोरायचे आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेच्या पर्वासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा मंगळवारी केली. देशाची आत्मनिर्भरता, आत्मबळ आणि आत्मविश्वास दृढ करणार्‍या त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला …

Read More »

बनावट ई-पास बनविणारी टोळी गजाआड

पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई पनवेल ः वार्ताहर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार्‍या प्रवासी ई-पासची बनावट प्रतिकृती बनवून त्याचा गैरवापर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट ई-पासचा वापर करून पनवेल ते जालना असा प्रवास करणार्‍या टोळीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या विशेष पथकाने गजाआड …

Read More »

लॉकडाऊनमध्ये मांसाहार महागला!; खवय्यांचे खिसे रिते

उरण : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसली तरी यादरम्यान मात्र उरणमध्ये मासळी, मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव भलतेच कडाडले आहेत. परिणामी हे कडाडलेले भाव लॉकडाऊनच्या काळातही सामान्य खवय्यांचे खिसे रिते करू लागले आहेत. देशभरात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने …

Read More »

कृष्णा पाटील सामाजिक मंडळाच्या वतीने गोरगरिबांना अन्नधान्य वाटप

कळंबोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले कामगार व निराधार महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा 52 गरीब, गरजू कोकणवासीय कुटुंबांना मदतीचा हात देत कृष्णा पाटील सामाजिक मंडळाच्या माध्यमातून भाजपचे नेते कृष्णा पाटील यांच्या हस्ते अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी व …

Read More »