Breaking News

Monthly Archives: June 2020

रसायनीत चार नव्या रुग्णांची भर

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीत कोरोनाचे नव्याने चार रुग्ण आढळले आहेत. रिस, भटवाडी, कांबे, रिसवाडी येथे प्रत्येकी एक असे नव्याने चार कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी दिली आहे. तर आपटा आरोग्य केंद्रहद्दीत आपटा ते दापिवली भागात सध्या कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती डॉ. प्रियंका चव्हाण यांनी बोलताना दिली. …

Read More »

वाढदिवसानिमित कोप्रोली येथे गरजूंना चादर, चटईचे वाटप

उरण : वार्ताहर भाजपचे नेते तथा जेएनपीटी कामगार नेते हेमंत भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 20) उरण तालुक्यातील कोप्रोली येथे गरीब गरजू बांधवांना चटई व चादरीचे वाटप करण्यात आले. या वेळी शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, बबन पाटील, प्रदीप घरत, रवींद्र तांडेल, रमणिक म्हात्रे, शाळा कमिटी अध्यक्ष लाखन पाटील …

Read More »

वर्षा सहलीस येणार्यांवर होणार कारवाई

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. या विषाणूचा फैलाव शहरी भागासह ग्रामीण भागात होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी ठिकाणावरुन वर्षासहलीस पनवेल परिसरात येणार्‍या पर्यटकांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. पावसाळ्यात धरण क्षेत्रात येणार्‍या पर्यटकांना मज्जाव घालण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले …

Read More »

पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे राहणार बंद!

पनवेल : वार्ताहर राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथील केल्याने मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडलेले व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. पनवेल परिसरात दरदिवशी कोरोनाच्या रूग्णांत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल प्रशासनाने शहरातील गर्दीचे ठिकाणे बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरातील पर्यटनस्थळे …

Read More »

गृहनिर्माण सोसायट्यांमधील थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी

आमदार निरंजन डावखरे यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सदनिकांच्या थकीत मेंटेनन्सवर किमान सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करू नये. सोसायटीला तूर्त राखीव निधी खर्च करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सहकारमंत्री …

Read More »

समाजमाध्यमांचा वापर करीत योग दिन साजरा

माणगाव ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनाचे औचित्य साधून या वर्षी रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व विद्यार्थ्यांनी घरीच योग दिन उत्साहात साजरा केला. प्रतिवर्षी योग दिनाचे औचित्य साधून शासकीय व सार्वजनिक संस्था विविध प्रकारचे कार्यक्रम व योग शिबिर आयोजित करतात. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे शाळा, कॉलेजेच बंद असून सार्वजनिक …

Read More »

प्रवाशांना रेल्वे तिकिटांचा परतावा

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन कर्जत ः बातमीदार – लॉकडाऊन काळात प्रवास करणार्‍या प्रवाशांची तिकिटे रेल्वेकडून रद्द करण्यात आली आहेत. त्या रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे आता परत केले जाणार होते. त्यामुळे कर्जत येथे आरक्षित तिकीट रद्द करून पैसे मिळविण्यासाठी प्रवाशांनी सकाळपासूनच आरक्षण केंद्रावर उपस्थिती दर्शविली होती. सुमारे 300 अर्जांद्वारे तिकिटे …

Read More »

खोपोलीत योग दिन उत्साहात

खोपोली ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनानिमित्त रविवारी खोपोलीत विविध बंदिस्त सभागृहांत प्रस्तावित योगगुरूंनी योगाचे धडे दिले. दरम्यान, कोरोनाचे संकट पाहता सर्वसामान्य नागरिकांनी मात्र आपापल्या इमारती व घरांतच योगसाधना करून नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. वर्तमान स्थितीत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी व शारीरिक, मानसिक …

Read More »

पेणमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी उपाययोजनांची सुरुवात केल्याने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसला होता, मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पेण बाजारपेठांमध्ये होऊ लागलेली गर्दी तसेच बाहेरील प्रवास करणारे नागरिक हे कोरोना संसर्गाचे माध्यम ठरत असल्याने जिल्ह्याबरोबर पेणमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत …

Read More »

लॉकडाऊनमध्ये शेअरबाजार होतोय लोकप्रिय, पण…

लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंदे थांबले, बंद पडले. परंतु अगदी घरबसल्या मोबाइलवरून करता येणारा धंदा म्हणून लॉकडाऊनचा फायदा उठवत अनेक नवे लोक शेअर बाजारात आले. काही नशीब आजमावण्यासाठी तर काही निश्चित कमाईचे साधन म्हणून. शेअर बाजार म्हटले की दोन टोकाची मते पाहायला मिळतात, एक म्हणजे भरपूर कमाईचे साधन म्हणून तर दुसरीकडे याला …

Read More »