Breaking News

Monthly Archives: June 2020

नौदलाच्या पाणबुडीचे वॉल्व्ह चोरीला; गुन्हा दाखल

खोपोली ः प्रतिनिधी खालापुरातील एका कारखान्यातून सुमारे 80 लाखांचे वॉल्व्ह चोरीला गेल्याची घटना घडली. चोरी झालेल्या वॉल्व्हचा वापर नौदलाच्या पाणबुडीकरिता होत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. फिर्यादी पंडिता राध्या हिरेमठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंभिवली गावाच्या हद्दीत असलेल्या सीएफएफ फल्युईड कंट्रोल प्रा. लिमिटेड कारखान्यात मरीन रूममध्ये उघड्या दरवाज्यावाटे चोरट्याने प्रवेश करून …

Read More »

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज सुरू

पेण ः प्रतिनिधी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन व लायसन्सविषयक सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. नेमून दिलेल्या कोट्याप्रमाणे अपॉइंटमेंट घेतली असेल व त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर केल्यानंतर कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिवहन कार्यालयातील …

Read More »

वादळग्रस्तांसाठी सरसावले संघ स्वयंसेवक; आळीपाळीने श्रमदान; जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

माणगाव ः प्रतिनिधी  निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले. अवघ्या तीन-चार तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने आलेला निसर्गाचा रौद्र झंझावात श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग, माणगाव, रोहा तालुक्यांची अपरिमित हानी करून गेला. या चक्रीवादळातील वादळग्रस्तांच्या मदतीला रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सरसावले असून मागील 17 दिवसांपासून विविध प्रकारे वादळग्रस्तांना मदतीचा हात …

Read More »

उरण तालुक्यात बळीराजा सुखावला

उरण : प्रतिनिधी यंदा निसर्ग चक्रीवादळाने कोकण वासीयांना हदरवले. मात्र चक्रीवादळात झालेल्या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच येथील शेतकर्‍यांनी भाताची पेरणी केल्याने अवघ्या काही दिवसात भाताचे दाणे रुजून रोपे जमिनीबाहेर निघाली. एक-दोन  दिवसांच्या अंतराने उरण तालुक्यात पावसाच्या हलक्या-मोठ्या आलेल्या पावसाच्या सरींमुळे शेतीला पूरक असा पाऊस झाल्याने 10 ते 12 दिवसात शेतातील …

Read More »

उरणमध्ये फ्लेमिंगोंचा मुक्काम वाढला

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे येथील खाडीत पाणथळ जागेत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मुक्काम पावसाळ्यातही वाढला आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणू व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर चालणारी वाहने, माणसांचा कमी झालेला वावर यामुळे प्रदूषण कमी होण्याला मदत झाल्याने निसर्गातील सर्वच पशुपक्षी यांना मुक्त संचार करण्याची संधी प्राप्त झाली. फ्लेमिंगो हे …

Read More »

आकुर्ली येथील वीज उपकेंद्रामुळे वीजपुरवठा होणार योग्य दाबाने

पनवेल : वार्ताहर आकुर्ली येथे नव्याने वीज उपकेंद्र उभारण्यात आले. 20 एमव्हीए क्षमता असलेल्या या उपकेंद्रामुळे पनवेल शहरालगत असलेल्या सुकापूर, आकुर्ली, नेरे तसेच माथेरानच्या पायथ्यापर्यंत असणार्या सर्व ग्रामीण भागांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळणार आहे, असे महावितरणचे अधिकारी जयदीप नानोटे यांनी सांगितले. नुकताच सुरू झालेला पाऊस तसेच होवून गेलेले निसर्ग …

Read More »

माथाडी कामगारांना अन्नधान्याचे वाटप

कोटक महिंद्रा बँकेचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त अन्नधान्याचा पुरवठा कायम राहिला पाहिजे यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातही कायम कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या कष्टांना बळ देण्यासाठी नवी मुंबईमध्ये कोटक महिंद्रा बँकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांना अन्नधान्याचे वाटप केले. देशाच्या कानाकोपर्‍यात अन्नधान्याचा अविरत पुरवठा कायम रहावा यासाठी कृषी उत्पन्न …

Read More »

करंजा गाव कोरोनामुक्तीच्या वाटेवर

133 जण ठणठणीत बरे होऊन घरी उरण : रामप्रहर वृत्त उरणमध्ये संचारबंदीच्या 19व्या दिवशी पहिला कोरोना विषाणूने बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर मे महिन्यात करंजा येथील एक तरुण बाधित असल्याचे उघड झाले. मात्र, त्याच्या घरात झालेल्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला आणि सांत्वनासाठी गेलेल्या जवळपास 134 जणांना बाधा झाल्याचे उघड झाले होते. …

Read More »

तळोजा कारागृहातील 291 कैद्यांची खारघरमधील गोखले विद्यालयात व्यवस्था

पनवेल : बातमीदार कोरोनाकाळात कारागृह व्यवस्थापनाला कैद्यांना पर्यायी जागेत हलविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तुरुंगात सामाजिक अंतर पाळत क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची व्यवस्था करण्याच्या प्रश्नावर तोडगा म्हणून कारागृह विभाग आणि रायगड जिल्हाधिकार्‍यांनी 291 कैद्यांना सध्या खारघरमधील गोखले विद्यालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालयात तात्पुरता तुरुंग उभारण्यात आला आहे. सध्या खारघर वसाहतीच्या …

Read More »

उरणमध्ये वीजग्राहक हैराण

वाढीव वीज बिलांमुळे महावितरणविरोधात संताप उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये मार्चपासून मे महिन्या पर्यंत गेली तीन महिने सरासरीवर आधारित ऑनलाइन वीज बिले देण्यात आली. त्यानुसार बहुसंख्य ग्राहकांनी ती भरली मात्र जून महिन्यात रीडिंगनुसार वीज बिल वितरीत करताना मागील भरलेली बिलाची रक्कम ग्राह्य न धरता सरसकट तीन महिन्याच्या सरासरीनुसार एकत्रित …

Read More »