मोहोपाडा ः प्रतिनिधी राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडून जाहीर झालेल्या एनआयआरएफच्या रँकिंगमध्ये टॉप दोनशेच्या यादीत सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आपले नाव नोंदविले आहे. सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि बीसीए या उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्ड, प्लेसमेंट, शिकवण्याची पद्धत, उत्कृष्ट निकाल, शिकवण्याची गुणवत्ता, शिस्त, पायाभूत सुविधा आणि परिणामी …
Read More »Monthly Archives: June 2020
‘सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करावी’
नवी मुंबई ः बातमीदार हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे या आत्महत्येची खोलात जाऊन चौकशी करावी, अशी मागणी नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोणतेही पाठबळ …
Read More »लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान होणार संरक्षित; सभापती संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल ः प्रतिनिधी खांदा वसाहतीतील सेक्टर 6 येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाला संरक्षण रेलिंग आणि प्रवेश गेट बसवण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 16) करण्यात आला. यामुळे हे उद्यान संरक्षित होणार आहे. याकरिता स्थानिक नगरसेवक म्हणून प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. वारंवार …
Read More »नवी मुंबईने ओलांडला चार हजारांचा टप्पा; 63 पॉझिटिव्ह, तर 49 रुग्ण कोरोनामुक्त
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईत मंगळवारी 63 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या चार हजार 61 इतकी झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 124 झाली आहे. मंगळवारी 49 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 355 झाली आहे. सलग …
Read More »बेशिस्त वाहनचालकाांविरोधात कारवाई करा; सर्वसामान्यांची मागणी
पनवेल ः वार्ताहर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यापासून मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरातील रहिवासी खरेदी व इतर कामांसाठी पनवेल बाजारपेठेत येत आहेत. या वेळी ते आणत असलेली दुचाकी व चारचाकी वाहने वाहतूक नियमांचे पालन न करता कुठेही रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तरी वाहतूक शाखेने पूर्वीप्रमाणे अशा …
Read More »विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांचे राज्य सरकारविरोधात मूक आंदोलन
पनवेल ः वार्ताहर मुंबई बसमालक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई बसमालक संघटना, बस ओनर्स सेवा संघ आणि स्कूल अॅण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशनच्या संघटनेमार्फत बोरिवली येथील एकसर गाव लिंक रोडवर नुकतेच राज्य सरकारविरोधात मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष दीपक नाईक, सचिव हर्ष कोटक, रायगड जिल्ह्याचे समीर माखेजा, …
Read More »जुम्मापट्टी आणि माथेरान घाटात पर्यटकांची गर्दी; आदिवासींची पोलिसांत तक्रार
कर्जत : बातमीदार – लॉकडाऊनमधून सूट देऊन जनतेला मुभा देण्यात आली आहे, मात्र त्याचा गैरफायदा उठवला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील असंख्य पर्यटक सध्या नेरळ-माथेरान घाटात आणि जुम्मापट्टी येथे येत आहेत. या अनपेक्षित पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासी लोकांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे सावट पसरले आहे.दरम्यान, स्थानिक आदिवासींनी नेरळ पोलीस ठाण्याच्या निवेदन देऊन त्या …
Read More »माणगावमध्ये भात भिजला; शेतकरी संकटात
माणगाव : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने संबंध दक्षिण रायगड उद्ध्वस्त केला असून माणगाव तालुकादेखील त्याला अपवाद राहिला नाही. शेतात रात्रंदिवस राबून कष्टाने पिकविलेला भात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडे महाराष्ट्र राज्य मार्केट फेडरेशनच्या शासकीय भात खरेदी केंद्रामध्ये शासनाची हमीभाव किंमत मिळविण्याकरिता दिलेला होता. हा भात वादळी पावसात भिजला आहे. …
Read More »विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
नोकरवर्ग आणि विद्यार्थ्यांना अडथळा खोपोली : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त फटका महावितरणला बसला आहे. अथक परिश्रमानंतर खोपोली व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला खरा, मात्र त्यानंतरही वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण आहेत. याचा सर्वांत मोठा फटका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरून ऑनलाइन काम करीत असलेले नोकरदार आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना …
Read More »रायगडात सलग दुसर्या दिवशी चौघांचा मृत्यू; 63 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 15) सलग दुसर्या दिवशी कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, 63 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44, पनवेल ग्रामीणमध्ये सात, पेण तालुक्यात सहा, अलिबाग तालुक्यात तीन, माणगाव तालुक्यात दोन आणि उरण तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे, तर मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper