Breaking News

Monthly Archives: October 2021

खालापूर तहसील कर्मचारी एक, तास ठिय्या आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी    खालापूर तहसील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 29) तहसील कार्यालयाच्या आवारात एक तास ठिय्या आंदोलन केले. जुनी पेन्शन योजना, केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणारे सर्व लाभ राज्य कर्मचार्‍यांना मिळावे, पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन आलेल्या तसेच 2005 पूर्वी निवड झालेल्या परंतु उशिरा नियुक्ती मिळालेल्या कर्मचार्‍यांना …

Read More »

माणगावात राज्य सरकारी कर्मचार्यांचे ठिय्या आंदोलन

माणगाव : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करा, प्रमुख मागणीकडे  राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. 29)  सकाळी माणगावमधील सरकारी कर्मचार्‍यांनी येथील तहसील कार्यालयासमोर एक तासाचे ठिय्या आंदोलन करून निवासी नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांना निवेदन दिले. राज्य शासनाने 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द करून 1 नोव्हेंबर 2005 …

Read More »

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी सर्व शासकीय कर्मचार्‍यांना जूनी पेन्शन योजना  लागू करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 29) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच  जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांचे वतीने एक तासाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी …

Read More »

नेरळमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदिल

दिवाळीनिमित्त महिला बचत गटांचे विविध उपक्रम कर्जत : बातमीदार नेरळ येथील यशवंती महिला बचत गटाच्या सदस्यांनी   दिवाळी सणासाठी आकाशकंदिल बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. रोजगार निर्मिती म्हणून बनवलेले हे पर्यावरणपूरक कंदिल उल्हासनगर आणि कल्याण येथील बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. नेरळ येथील रणरागिणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा बोराडे यांनी …

Read More »

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -राम मोहिते

वळके हायस्कूलच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन रेवदंडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जेएसडब्ल्यू कंपनीचे सिएसआर विभाग प्रमुख राम मोहिते यांनी बुधवारी (दि. 27) वळके येथे केले. साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सामाजीक दायित्व विभागाच्या वतीने कोएसोच्या वळके येथील नारायण कमळ्या गायकर माध्यमिक शाळेत नवीन प्रयोगशाळा उभारण्यात …

Read More »

पर्यावरण जनजागृतीसाठी मुरूडमध्ये पथनाट्य, सायकल रॅली

मुरूड : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी मुरूड शहरात गुरुवारी (दि. 28) नगर परिषदेतर्फे पथनाट्ये सादर करण्यात आली. या वेळी सायकल रॅलीही काढण्यात आली होती. मुरूड नगर परिषदेतर्फे गुरुवारी शहरातील बाजारपेठेत पथनाट्ये सादर करण्यात आली. वायुप्रदुषण आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये, यासाठी येणार्‍या दिवाळीमध्ये …

Read More »

चला मतदार यादीत नाव नोंदवू…

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या मोहिमेविषयी माहिती… भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर …

Read More »

डॉ. विनोद गीते यांना पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. विनोद गीते यांना कोरोना योद्धा व आरोग्यदूत पुरस्काराने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल डॉ. गीते यांचे अभिनंदन केले जात आहे. नवतरुण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्या …

Read More »

खारघरमध्ये स्वस्त दरात सामान; दीपावलीनिमित्त भाजपचा उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे दिवाळी सणासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात फराळ सामान वितरण करण्यात येत आहे. खारघर सेक्टर 13मधील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 29) हा उपक्रम सुरू करण्यात आला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक …

Read More »

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात येणार्‍या अभ्यागतांसाठी नियमावली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणार्‍या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी 3 ते 6 या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली, मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला. नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली …

Read More »