खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी पुण्याहून मुंबईकडे जाताना रविवारी (दि. 30) पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास एक टँकर (एमएच-17 बीडी-4365) किमी 40.400 आडोशी उतार येथे अपघात होऊन उलटला. चालकाचे नियंत्रण सुटून टँकर मुंबईच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंत व लोखंडी रेलिंग तोडून पुणे लेनवर पलटी होऊन अपघात झाला. अपघातात टँकरचालक गंभीररीत्या जखमी होऊन …
Read More »Yearly Archives: 2021
पेणच्या विकासाचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये
भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे खडे बोल; आमदार रविशेठ पाटीलच जनतेचे खंबीर नेतृत्व पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील बोरी-शिर्की चाळ रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. हा रस्ता खासदार साहेबांनी मंजूर केलेला नाही. पाच कोटी 97 लाखांचा निधी यासाठी खर्ची पडला. त्याची मंजुरी संबंधित विभागामार्फत झालीय. आमदार रविशेठ पाटील …
Read More »दिघोड्यात शेतीविषयक प्रात्यक्षिके
उरण : रामप्रहर वृत्त कृषी विभागामार्फत खरीप हंगामामध्ये सुरुवातीस बीज प्रक्रिया मोहीम उरण तालुक्यातील दिघोडे सजामार्फत राबविण्यात येत आहे. बीज प्रक्रिया व भात उगवण क्षमता चाचणी तसेच दहा टक्के रासायनिक खत बचत याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी जाधव मॅडम, कृषी पर्यवेक्षक व्ही. एस. ढवळ, एन. वाय. घरत …
Read More »भाजपतर्फे गरजूंना तांदळाचे वाटप
नवी मुंबई : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुतीच्या केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सेवा हीच संघटना हा भाजपचा मूलमंत्र लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात सेवाकार्य दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, समाजसेविका …
Read More »संचारबंदी काळातील उल्लंघन; न्हावाशेवा पोलिसांकडून लाखोंची दंडवसुली
उरण : प्रतिनिधी न्हावाशेवा बंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीदरम्यान शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्या 4398 व्यक्तींवर कारवाई करीत त्यांच्याकडून पाच लाख 73 हजार 280 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही माहिती न्हावाशेवाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे. संचारबंदी काळात नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी न्हावाशेवा पोलिसांनी गस्ती …
Read More »जहाजांवर काम करणार्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया सिफेरर्स अॅण्ड जनरल वर्कर्स यूनियनकडून पुन्हा एकदा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी (जहाजांवर काम करणारे) कोविड लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात येत आहे. यूनियनकडून माहिती घेतली असता समजते, देशातील बहुतांश राज्य सरकारांनी, केंद्र सरकार व डीजी शिप्पिंगकडून निर्देश देवून सुद्धा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी कोविड लसीकरणाला प्राधान्य दिलेले नाही व …
Read More »एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सौजन्याने वागावे -दौंडकर
पनवेल : वार्ताहर सर्वच समाजातील लोकांनी जातीय सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करावा, सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांशी सौजन्याने वागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी त्यांच्या कार्यालयात प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक, शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य यांच्या घेतलेल्या एकत्रित बैठकीत मार्गदर्शन करताना केले. या वेळी बोलताना …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त गरजू घटकांना मदतीचा हात
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे गरजू रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गोरगरीब कामगार, मजूर, …
Read More »मँचेस्टर सिटीला नमवून चेल्सी ‘चॅम्पियन’; फुटबॉल लीग
पोर्तोे (पोर्तुगाल) ः वृत्तसंस्थाकाई होवित्झच्या एकमात्र गोलमुळे चेल्सीने मँचेस्टर सिटीला 1-0ने हरवले आणि नऊ वर्षांत दुसर्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले. शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात होवित्झने 42व्या मिनिटाला चेल्सीसाठी एकमेव विजयी गोल केला. मेसन माउंटच्या पासवर त्याने हा गोल केला. या पराभवानंतर मँचेस्टर सिटीच्या संघाला सलग दुसर्या विजेतेपदाने हुलकावणी …
Read More »पेणमधून एसटीच्या फेर्यांत वाढ
पेण ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात प्रवासी संख्या कमी झाल्याने रायगड एसटी प्रशासनाच्या वतीने एसटी फेर्यांमध्ये कपात करण्यात आली असून, थोड्या प्रमाणात पेण आगारातून पेण ते पनवेल, पेण ते अलिबाग अशी बससेवा सुरू होती. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने कोरोनाचे नियम पाळून पुन्हा एसटी बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper