सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल येथील कोशिश फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प असून नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिका सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर …
Read More »Yearly Archives: 2021
कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा संगम
शंभरातून एखादाच शूरवीर मनुष्य जन्मतो, हजारांतून एखादाच विद्वान मनुष्य, उत्कृष्ट वक्ता दहा हजारांतून एखादा जन्मतो, परंतु दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच पाहायला मिळतो. असाच एक दाता, दानशूर व्यक्तिमत्त्व रायगड जिल्ह्याला लाभले, ते नाव म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब! कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकनेते माजी खासदार रामशेठ …
Read More »लोकसेवक
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भारतीय संसदेत सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून केलेले काम उल्लेखनीय असे आहे. ते पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षण वारसा घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या रायगड व मुंबई विभागातील सच्चे विकासपुरुष ही त्यांची खरी ओळख आहे. अतिशय सामान्य कुटुंबात पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर देवदूत
माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते जपत कुठल्याही प्रसंगात लोकांना मदत करण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर अविरतपणे करीत आले आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने ते …
Read More »मेट्रो चाचणीदरम्यान भाजपचे निषेध आंदोलन
मुंबई ः प्रतिनिधीपश्चिम उपनगरात मुंबई मेट्रोच्या चाचणी (ट्रायल रन) कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 31) भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले.भाजप सरकारच्या काळात प्रगतिपथावर असलेल्या मेट्रोचे काम आधी हट्टापायी रखडवून, नंतर प्रकल्पाची किंमत वाढवून आता …
Read More »माजी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात घोषणाबाजी
शिवसेनेचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर खोपोली ः प्रतिनिधीकर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. विद्यमान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाली असताना दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पाली फाटा …
Read More »राज्य सरकारला अखेर उपरती
मराठा समाजाला 10 टक्के ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण मुंबई ः प्रतिनिधीमराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला, तर छत्रपती संभाजीराजे यांनीही सरकारला इशारा दिला होता. अखेर मराठा …
Read More »शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री शरद पवार; यांच्याबरोबर यशस्वी वाटाघाटी करणारे ‘दिबा’
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… विधानसभेप्रमाणे लोकसभेतही लोकनेते दि. बा. पाटील शेतकर्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत. देशाच्या …
Read More »आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाने राज्य सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर किल्ले रायगडावरून …
Read More »शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper