Breaking News

Yearly Archives: 2021

विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक मनोहर म्हात्रे

पनवेल : वार्ताहर सिडकोच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ अगदी सुरुवातीपासून वादाच्या भोवर्‍यात राहिले आहे. या वेळेस वाद चिघळला आहे तो नामकरणाचा. स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधवांची एक दिलाने अशी इच्छा आहे की, या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले …

Read More »

कळंबोली वसाहतीत गरजूंना धान्यवाटप

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम कळंबोली : बातमीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू जनतेला एक मदतीचा हाथ म्हणून कळंबोली वसाहतीमधील हजारो गरीब व गरजू नागरिकांना मोफत वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 24) राबविण्यात आला. या वेळी धान्यवाटप केल्यानंतर नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. …

Read More »

पनवेल परिसरात पुन्हा चोर्यांचे प्रमाण वाढले

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीमुळे सर्व जण मेटाकुटीस आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आणि लादण्यात आलेले निर्बंध यामुळे असंख्य नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीमुळे चोरी, लुटमार, लुबाडणूक अशा अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत असलेल्या दिसत आहे. पनवेल परिसरात यामध्ये कामोठे, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली आदी ठिकाणी मध्यंतरीच्या …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची घोषणा ‘दिबां’च्या नावासाठी आता व्यापक लढा!

10 जूनला मानवी साखळी तर 24 जूनला सिडको भवनावर धडकपनवेल : दीपक म्हात्रेप्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्यांच्या संघटना एकत्र येऊन हा लढा …

Read More »

‘दिबा’ : विधानसभेतील एक बुलंद तोफ!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… महाराष्ट्रात सन 1972मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट …

Read More »

रायगडात 189 लसीकरण केंद्र; तीन लाख 77 हजार 924 जणांना लसीची मात्रा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 189 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अतापर्यंत तीन लाख 77 हजार 924 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये 158 लसीकरण …

Read More »

1 जूननंतर दुकाने उघडू द्या; व्यापार्‍यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : प्रतिनिधी लॉकडॉऊनमुळे सगळेच व्यवसाय बंद पडल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, ईद आदी सण लॉकडॉऊनमध्ये गेल्याने गेल्या दोन महिन्यांपासून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा …

Read More »

बारावीची परीक्षा ः केंद्राने मागविल्या राज्यांकडून सूचना

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी रविवारी (दि. 23) राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली. यात केंद्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षेसंबंधी राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षेची पद्धत बदलणे असे दोन पर्याय केंद्र सरकारकडून सूचवण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार राज्याला निर्णय …

Read More »

पेण दादर येथे विठ्ठल-रखुमाई उत्सव साध्या पद्धतीने साजरा

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील दादर गावात विठ्ठल-रखुमाईचा उत्सव गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचे संकट असल्याने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय नियमांचे पालन करून विठ्ठल-रखुमाईचा उत्सव मोजक्याच भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कोणताही कार्यक्रम ठेवण्यात आला नाही. या वेळी भाविकांना सुंठवडा, खिचडी व केळीचा …

Read More »