Yearly Archives: 2021
बॅडमिंटनमध्ये तीन गेमची गुणपद्धती कायम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बॅडमिंटन खेळाची गुणपद्धती सर्वोत्तम पाच गेमऐवजी तीन गेमपुरतीच मर्यादित राहील, असा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला. ऑनलाइन झालेल्या मतदानामध्ये 282 जणांनी मते नोंदवली. 66.31 टक्के जणांनी या पद्धतीला पाठिंबा दर्शवला, मात्र 33.69 जणांनी विरोध केल्यामुळे नियमानुसार एकूण मतांपैकी दोन-तृतीयांश तीन …
Read More »आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईत?; बीसीसीआयच्या सभेत घोषणा होण्याची शक्यता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलच्या 14व्या पर्वाचे उर्वरित 31 सामने खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रयत्न करताना दिसत आहे. हे 31 सामने न झाल्यास बीसीसीआयला 2500 कोटींच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती (यूएइ) येथे आयपीएलच्या दुसर्या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यातील …
Read More »कोकणवासीयांची थट्टा
निसर्गाने समृद्ध असलेली कोकणची भूमी सध्या मात्र संकटांचा सामना करीत आहे. एका वर्षाच्या आत दुसरी नैसर्गिक आपत्ती कोकणावर आली. गेल्या जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला होता. आता तौक्ते चक्रीवादळाने नुकसान केले. कोकणाने राज्याला आजवर खूप काही दिले. आता हे राज्य चालविणार्यांनी कोकणवासीयांना मदत करणे आवश्यक आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या …
Read More »पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत कोविड प्रतिबंधक लसीकरण
पनवेल : वार्ताहर कल्पतरू रिव्हरसाईड गृहनिर्माण संस्थेने बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने शनिवारी (दि. 22) लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सोसायटीतील पाचही इमारतीमध्ये राहणार्या 900 रहिवाशांनी सहभाग घेतला. लसीकरण करताना कोरोना-19च्या नियमानुसार योग्य सामाजिक अंतर राखत 900 रहिवाशांचे टोकन सिस्टीम पद्धतीने लसीकरण करण्यात आले. आपल्या सोसायटीच्या आवारातच लसीकरणाचे …
Read More »काँग्रेस देशाचा अपमान करतेय!
’भारतीय व्हेरियंट’वरून भाजप नेते प्रकाश जावडेकर आक्रमक नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी कोरोनाच्या व्हेरियंटवरून केलेल्या एका विधानावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. काँग्रेसने भारताचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले …
Read More »शेअर बाजारामध्ये जोखीम वाढली, आता काय करायचे?
भारतीय शेअर बाजार एका विशिष्ट रेंजमध्ये फिरत असून त्यातील चढउतार वाढत चालले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सावध होऊन आपल्यापुरते काही विशिष्ट धोरण आखून बाजारात ठामपणे उभे राहता येईल का? मागील एक-दोन आठवड्यात आपण पाहतोय की भारतीय शेअर बाजार हा एका ठरावीक रेंजमध्ये घुटमळताना आढळत आहे. सेन्सेक्स साधारपणे 48000 ते …
Read More »बीटकॉईन’मध्ये गुंतवणुकीचा मोह का टाळला पाहिजे?
गेल्या आठवड्यात बीटकॉईनच्या किमतीने किमान 30 ते 40 टक्के बुडी मारल्याने त्याच्या उच्चांकाला ज्यांनी खरेदी केली होती त्यांचे हात पोळले आहेत. त्यामुळे या चलनाचे नियंत्रण जोपर्यंत सरकारांतर्फे होत नाही, तोपर्यंत त्यातून मिळणार्या परताव्याचा मोह टाळला पाहिजे. सर्व जगाचे व्यवहार ज्यावर अवलंबून आहेत, ती चलने कशी भरकटत चालली आहेत हे बीटकॉईन्सच्या …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक विकास घरत
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा चंग बांधलेल्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वपक्षीय बैठकांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष जागोजागी उमटत आहे. नामांतर वादाच्या याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत यांच्यासोबत चर्चा केली असता, नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच …
Read More »‘कोवॅक्सिन‘ला डब्ल्युएचओची मान्यता नाही
मंजुरी मिळेपर्यंत लसधारकांना विदेश प्रवासात अडचण नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय, पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना डब्ल्युएचओ मान्यताप्राप्त लस हा महत्त्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार आहे. देशाबाहेर प्रवास करू इच्छिणारे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper