पिक्चर कोणासाठी बनवले जातात?… पब्लिकसाठी! काही चित्रपट जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात दाखल व्हावेत, त्याचे कौतुक व्हावे, इंग्लिश मीडियाने दखल घ्यावीच, त्यांना पुरस्कार प्राप्त व्हावेत यासाठीच निर्माण होतात ती ’स्टोरी’च वेगळी. पिक्चर पाहतो नि नाकारतो कोण?… पब्लिक. यह पब्लिक है पब्लिक. सब जानती है. आपल्याला आवडलेला चित्रपट ते पडद्यावर ठेवत नाहीत. …
Read More »Monthly Archives: December 2023
पनवेलमध्ये रविवारी निर्धार मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा होणार आहे. भाजप हा सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, मात्र महाविकास आघाडीचे स्वार्थी आणि निष्क्रिय नेते, पदाधिकारी हेतुपुरस्पर …
Read More »मिशन लोकसभा : पिंपरी, चिंचवडच्या वॉरियर्सशी संवाद
पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मावळ लोकसभा प्रवास बैठकीच्या निमित्ताने पिंपरी आणि चिंचवड विधानसभा वॉरियर्स बैठकीचे आयोजन रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये शनिवारी (दि.23) करण्यात आले होते. या वेळी वॉरियर्सशी संवाद साधण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रेसह सोशल मीडिया, नमो चषक, बूथ …
Read More »हजारोंच्या साक्षीने रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
लहानग्यांपासून ज्येष्ठांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील सुंदर बाग आणि आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (दि.22) हजारो उद्यानप्रेमींच्या साक्षीने मोठ्या दिमाखदारपणे साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग नंदनवनाप्रमाणे फुलले होती. त्यातच …
Read More »खोपोलीतील लेखिका डॉ.सादिका नवाब यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
खोपोली : प्रतिनिधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेतर्फे 24 भारतीय भाषांसाठी दिल्या जाणार्या पुरस्कारात खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सादिका नवाब (सहर) यांच्या राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. कुरतुल ऐन हैदर यांच्यानंतर 56 वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार …
Read More »इको व विक्रम मिनीडोअर वाहनचालक-मालकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने नागपुरात झाली बैठक पनवेल, नागपूर : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील इको व विक्रम मिनीडोअर वाहनचालक व मालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने राज्याच्या परिवहन विभागाचे पराग जैन यांच्यासोबत नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. एमएमआरटीए क्षेत्रात परमिट ट्रान्सफर …
Read More »पिस्तुल विक्रीसाठी आलेल्याला कर्जतमध्ये अटक
अलिबाग : प्रतिनिधी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) कर्जत येथून अटक केली. त्याच्याकडून देशी बनवाटीची दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. सतिश अनिल क्षेत्रे (वय 29, रा. उलवे, मूळ चेंबूर टिळकनगर, मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. एक व्यक्ती …
Read More »देशाच्या संविधानिकपदाचा अपमान करणार्या विरोधी पक्षांचा पनवेलमध्ये तीव्र निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त उपराष्ट्रपती या संवैधानिकपदाचा अवमान करणारी इंडिया आघाडी आणि या आघाडीतील पक्षांविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून पनवेलमध्ये भाजपच्या वतीने मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.21) निषेध आंदोलन करण्यात आले. उपराष्ट्रपतींचा अवमान सहन करणार नाही, इंडिया आघाडीने देशाची माफी मागावी, अशी …
Read More »गोंधळलेले चेहरे
ममता बॅनर्जी यांनी धडाकेबाज सूचना करणे आणि त्याला ‘इंडिया आघाडी’च्या बाकीच्या काही नेत्यांनी मान डोलावणे ही काही आपोआप घडलेली घटना नव्हे. गांधी परिवाराला पूर्णत: बाहेर ठेवण्याचा बेत या आघाडीत शिजू लागल्याचे हे लक्षण मानायला हवे. म्हणूनच बैठकीतील दोन्ही मागण्यांबाबत स्वत: मल्लिकार्जुन खरगे यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते. येत्या वर्षात लोकसभेच्या …
Read More »नवीन पनवेलमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेलला पाणीप्रश्न भेडसावत असून नवीन पनवेलचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, या मागणीसाठी बुधवारी (दि. 20) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल सिडको कार्यालयाला धडक दिली. या वेळी नवीन …
Read More »