कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला आणि सगळीकडेच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. काही ठिकाणी लॉकडाऊन हवा की नको याची प्रारंभी चर्चा झाली, परंतु लॉकडाऊन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आदी उपायांना पर्याय नाही हे सार्यांच्याच अल्पावधीतच लक्षात आले. कोरोनामुळे आपले जगणे कमालीचे बदलले आहे आणि काही तज्ज्ञ निरीक्षकांच्या मते यातील काही …
Read More »सरकारची नाचक्की
विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील तीन चाकी आघाडी सरकार चांगलेच तोंडावर पडले आहे. या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने सोमवारी दिला. अधिकार नसताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मात्र बराच मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी …
Read More »सरकारचे चालले आहे काय?
राज्यातील कोरोना महामारीसंदर्भातील परिस्थितीत कोणताही सकारात्मक लक्षणीय बदल नाही. मात्र कोरोना चाचण्यांची संख्या कमी करुन परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भासवणारे सरकार बिनदिक्कत हॉटेल्स व गेस्ट हाऊस उघडण्याचे पाऊल टाकत आहे. अंतर्गत फोडाफोडीच्या कलहाने पोखरलेल्या या सरकारला परिस्थितीचे भान आहे का? राज्यात या आठवड्याची सुरुवात झाली ती सत्ताधारी महाविकास आघाडीतील नाराजी नाट्याने. …
Read More »गरज जीवनदात्यांची
जगभरात कोरोना महामारीचा फैलाव झाल्यापासूनच प्लाझ्मा थेरपी या साथीवरील उपचारात उपयुक्त ठरु शकेल का या दिशेने विचार सुरु होता. या उपचारपध्दतीचा कोरोनासदृश्य आजारांच्या बाबतीत उपयोग झालेला असल्याने तशी ही उपचारपद्धती नवीन नाही. परंतु कोविड 19च्या संदर्भात ही प्रभावी ठरते आहे असे म्हणण्यासाठी तिच्या पुरेशा व्यापक वैद्यकीय चाचण्या होण्याची गरज आहे. …
Read More »उत्सव झालाच पाहिजे
एरव्ही वैष्णवांच्या गर्दीने फुलणारी पंढरी यंदा कोरोनाच्या सावटामुळे आषाढी एकादशीला सुनीसुनीच राहिली असली तरी परंपरेनुसार संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या, पायी वारी रद्द झाली असली तरी प्रत्येक पालखीसोबत काही वारकरी एसटीने का होईना पंढरपुरात आलेच. पहाटेची विठोबा-रखुमाईची शासकीय पूजादेखील रिवाजानुसार पार पडली. असाच आटोपशीरपणा राखत परंपरेनुसार गणेशोत्सवही साजरा व्हायला …
Read More »लढाई लांब पल्ल्याचीच
आपल्या देशात विकसित केल्या जात असलेल्या, भारत बायोटेक निर्मित कोरोना लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल परंतु भारत हा लशींचा व औषधांचा एक मोठा उत्पादक असून कोरोनावरील लशीच्या निर्मितीतही भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. जगभरात यापूर्वीच किमान डझनभर लशींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या असल्या …
Read More »समर्थ दिशादिग्दर्शन
देशात बुधवारपासून अनलॉक 2 ला सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन अतिशय संयतपणे येणार्या परिस्थितीविषयी दिशादिग्दर्शन तर केलेच, खेरीज आवश्यक तेथे वास्तवाची जाणीव करुन देत सामाजिक तसेच वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या हेळसांडीबद्दल टोकले देखील. नोव्हेंबरअखेरपर्यंत 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य देण्याची त्यांची घोषणा …
Read More »राज्य गोंधळात, राज्यकर्ते सुशेगात
महाराष्ट्रातील कमालीच्या गोंधळलेल्या आणि गोंधळ घालणार्या तीन चाकी आघाडी सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अशी आंग्ल भाषिक घोषणा करीत अखेर 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमांद्वारे जनतेशी प्रदीर्घ संवाद साधताना कोणतीही ठोस माहिती न दिल्यामुळे सामान्य जनांमधील गोंधळ कायम असून जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढच झाली आहे. अनलॉक …
Read More »आकड्यांचा खेळ थांबवा
महाराष्ट्रातील केशकर्तनालये रविवारपासून खुली होणार आहेत. निर्बंध खुले होत आहेत. यामुळे संकट ओसरले असा गैरसमज मात्र कुणीही करुन घेता कामा नये. येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढलेली दिसणार आहे. त्यामुळे येणारे काही दिवस हे पुन्हा एकदा अतिदक्षता घ्यायला लावणारे आहेत. गुरुवारी भारतात सतरा हजारांहून अधिक नव्या कोरोना …
Read More »सायबर युद्धाचे ढग
कोरोनासंबंधी आर्थिक मदत, मोफत कोविड चाचणी या आशयाचे मेल सरकारी ई-मेलवरून आल्याचे भासवून सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचा हॅकर्सचा प्रयत्न असू शकेल. हे हॅकर्स बड्या कंपन्या, श्रीमंत व्यक्ती यांच्यावर तर हल्ले करतातच, परंतु एखाद्या मोठ्या हल्ल्यात लाखो सर्वसामान्यांनाही फटका बसू शकतो. गेले अनेक दिवस भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमाभागात तणाव आहे. चीनची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper