Breaking News

संपादकीय

युगे अठ्ठावीस

आषाढ महिना लागला की अवघ्या महाराष्ट्राला वारीचे वेध लागतात. कानांमध्ये जणू टाळ-मृदुंगाचा नाद ऐकू येऊ लागतो आणि मन पंढरी रायाच्या दर्शनासाठी आसावते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली पायी वारी रद्द करणे भाग पडले आहे. गेले जवळपास सहा महिने कोरोनाने जगभरात थैमान घातले असून मार्च महिन्यात आपल्या देशात …

Read More »

अधांतरी भवितव्य

कोरोना विषाणूच्या महामारीच्या थैमानामुळे एरव्ही मार्च-एप्रिलमध्ये होणार्‍या परीक्षा यंदा त्या काळात होऊ शकल्या नाहीत. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने पदवी परीक्षांसंबंधी परिस्थितीचा व्यापक विचार न करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बेधडक जाहीर केला, परंतु संबंधित अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मागून विरोधी पक्ष म्हणून भाजप आपली भूमिका चोख बजावत …

Read More »

संकट सरण्याची आशा

आताच्या घडीला जगभरातच कोरोना संकट अधिक गहिरे झाल्याचे चित्र निर्विवादपणे दिसते आहे. परंतु तरीही आशेला जागा आहे असे म्हणायला हरकत नाही. परिणामकारक ठरणारी औषधे बाजारात येऊ घातली आहेत. प्रभावी लसही पाठोपाठ येईलच. तोवर मात्र आपण खबरदारी घेत राहिलेच पाहिजे. जगभरातील तमाम देशांतील जनजीवन जवळपास ठप्प करणार्‍या कोरोना संकटाचे सध्याचे चित्र …

Read More »

लॉकडाऊनमध्ये शेअरबाजार होतोय लोकप्रिय, पण…

लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंदे थांबले, बंद पडले. परंतु अगदी घरबसल्या मोबाइलवरून करता येणारा धंदा म्हणून लॉकडाऊनचा फायदा उठवत अनेक नवे लोक शेअर बाजारात आले. काही नशीब आजमावण्यासाठी तर काही निश्चित कमाईचे साधन म्हणून. शेअर बाजार म्हटले की दोन टोकाची मते पाहायला मिळतात, एक म्हणजे भरपूर कमाईचे साधन म्हणून तर दुसरीकडे याला …

Read More »

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यात दुप्पट कसे झाले?

भविष्यातील संधी शोधत रिलायन्स इंडस्ट्री ही आज भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. बाजार मूल्याचा विचार करता 11 लाख कोटी रुपयांचा टप्पा तर पार केला आहेच, पण गुंतवणूकदारांना तीन महिन्यात दुप्पट परतावा दिला आहे! पैसा कोठे फिरतो आहे आणि कसा फिरविला जाऊ शकतो, हे रिलायन्स इंडस्ट्रीने गेल्या काही महिन्यांत दाखवून …

Read More »

स्वदेशीचा नारा

चीनने सीमेवर केलेली आगळीक आता त्यांच्याच अंगास येऊ लागली आहे. चीनसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारताने सीमेवरील हिंसक संघर्षानंतर चिनी मालावर बहिष्कार टाकत स्वदेशीचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले पाहिजे. सरकारने चांगले पाऊल उचलले आहे. नागरिकांनीही सरकारला साथ देत शहीद जवानांच्या …

Read More »

तिघाडी काम बिघाडी

राज्यातील तीन चाकी महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद एव्हाना पुरेसे चव्हाट्यावर आले आहेत. जुन्या खाटांचे कुरकुरणे सरकारमधील भागीदार पक्षानेच जगजाहीर केले. अखेर बर्‍याच कुरकुरण्यानंतर नाराज काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक गुरुवारी पार पडली असली तरी तिघाडी काम बिघाडी हेच अखेर खरे ठरणार! सत्तेच्या लोभातून कुटिल डावपेच खेळून जनाधार नसतानाही सत्ता काबीज केल्यानंतर …

Read More »

चीनला धडा शिकवायलाच हवा

भारत-चीन दरम्यानच्या लष्करी संघर्षात वीस जवानांचा बळी गेल्यानंतर देशातील जनमानसातील चीनविरोधाची धार तीव्र झाली असून जनतेने समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चीनविरोधी संताप व्यक्त केला आहे. चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी यातून जोमाने पुढे येत आहे. हिमालयाच्या खोर्‍यात भारत-चीन सीमाभागात गेला महिनाभर अधून मधून तणावपूर्ण स्थिती निर्माण होत होतीच. डिसेंबर महिन्यात …

Read More »

लपवालपवी कशासाठी?

देशात दुर्दैवाने महाराष्ट्रातच कोरोनाचा फैलाव सर्वाधिक होत असल्याचे चित्र एप्रिलपासून दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रामाणिकपणे, नियोजनबद्ध रीतीने पावले उचलण्याऐवजी कोरोनाचे रुग्ण व मृतांच्या आकड्यांचे घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आता पुरते उघड झाले आहे. कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हा आकड्यांचा खेळ? देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आणि अल्पकाळातच …

Read More »

गोंधळाचा नवा अंक

चार भिंतींच्या वर्गातील औपचारिक शिक्षणाला ऑनलाइन शिक्षण पर्याय ठरू शकते असा दावा अनेकांकडून गेली काही वर्षे विविध स्तरांवर केला जातो आहे. काही विशिष्ट शैक्षणिक शाखा वा विशिष्ट स्तरावरील विद्यार्थ्यांच्या संदर्भात ते खरेही असेल. परंतु सरसकट प्राथमिक व एकंदर शाळा-कॉलेजांतील शिक्षणाला एका झटक्यात ऑनग्राउंडवरून ऑनलाइन करणे वाटते तितके सोपे काम अजिबातच …

Read More »