Breaking News

संपादकीय

गुंतवणूकदारांनो, काळ आहे मुद्दल सांभाळण्याचा!

नव्या दमाचे गुंतवणूकदार सध्याच्या अस्थिर वातावरणात शेअर बाजारात येत आहेत, त्यांचे स्वागतच आहे. पण अशावेळी दीर्घकालीन गुंतवणूक नव्हे तर मुद्दल सुरक्षित ठेवत गुंतवणूक करायची असते, याचा विसर पडता कामा नये. नुकताच एका नामवंत हॉस्पिटलमधील प्रख्यात डॉक्टरचा व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यामध्ये ते अगदी सोप्या भाषेत परंतु अत्यंत आत्मविश्वासानं कोरोनाबद्दलचे गैरसमज घालवताना …

Read More »

आपण सर्वच रिलायन्सचे ग्राहक का आहोत?

कोरोना साथीमुळे बाजारात मंदी असताना रिलायन्स इंडस्ट्रीज या आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी नवनवे विक्रम प्रस्थापित करते आहे. हा प्रवास या कंपनीला कसा शक्य होतो आहे, याची चुणूक तिच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत पाहायला मिळाली. शेअर बाजारातील गुंतवणुकीला चांगला परतावा मिळविण्यासाठी सतराशे साठ गोष्टी जगभर सांगितल्या जातात, पण त्यानुसार शेअर बाजार …

Read More »

लशीभोवती राजकारण?

माहितीच्या महास्फोटाच्या या युगातच कोरोना महामारीचे अभूतपूर्व संकट जगभरातील सर्वसामान्य अनुभवत आहेत. हे सारे काय घडते आहे, हे कधी संपणार हे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्याच डोक्यात गेले काही महिने सतत घोंघावत आहेत. यातून दिसणार्‍या अनिश्चिततेतून निर्माण होते ती फक्त ताणयुक्त हतबलतेची स्थिती. या सार्‍यात आता लशीच्या संशोधनावर अवघ्या आशा एकवटलेल्या असताना …

Read More »

एका अनिश्चित उद्याची तयारी

बारावीचा निकाल लागला आहे. लवकरच दहावीचाही लागेल. पास होणार्‍यांचे आणि उत्तम गुण मिळवणार्‍यांचे कौतुक आहेच. परंतु पास झालो, पुढील प्रवेश मिळाला म्हणजे सुटलो, इतकी सोपी आता शैक्षणिक वाटचाल कुणासाठीच राहिलेली नाही. तंत्रज्ञानातील मोठे आविष्कार उद्याचे जग बदलून टाकणारच आहेत. त्या बदलांना कोरोनाने आणखी समीप आणून ठेवले आहे. आगामी काळ आत्यंतिक …

Read More »

लशीची सुरक्षितताही महत्त्वाची

सुरक्षित लस शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश आले असून सर्व उमेदवारांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती उत्तमरीत्या काम करीत असल्याचा दावा रशियाने मंगळवारी करताच पाठोपाठच डोनाल्ड ट्रम्प यांनीही लशीसंबंधी मोठी बातमी असे ट्वीट केले. अवघ्या मानव जमातीचे जिणे मुश्कील करणार्‍या कोरोना विषाणूवर लवकरात लवकर सुरक्षित लस यावी असे आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत आहे, परंतु मानवी आरोग्यापलीकडच्या …

Read More »

‘बिगिन अगेन’चे काय झाले?

महाराष्ट्रातील तीन चाकी आघाडी सरकारने बराच गाजावाजा करत राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ‘मिशन बिगिन अगेन’ची घोषणा जरुर केली. परंतु त्यासाठी राज्यातील कोरोना परिस्थिती सुयोग्य हाताळणीने आधी पुरती नियंत्रणात आणायला हवी होती हे बहुधा त्यांच्या ध्यानात आले नसावे. एकामागोमाग एक अनेक महापालिका पुन्हा लॉकडाऊन पुकारित असल्यामुळे ‘बिगिन अगेन’चे काय झाले असा …

Read More »

गलथानपणाला अटकाव कधी?

देशात रोजच्या रोज मोठ्या संख्येने नव्या कोरोनाबाधितांची भर पडताना दिसत आहे. पॉझिटिव्हिटीचा दरही वाढत असला तरी तो टार्गेटेड टेस्टिंगमुळे वाढत आहे असे कदाचित म्हणता येईल. मृत्यूदर मात्र कमी होत असल्याने परिस्थिती काही प्रमाणात निश्चितपणे नियंत्रणात आहे हेही स्पष्ट होते, परंतु औषधांचा बेसुमार काळाबाजार व अत्यवस्थ रुग्णांना आजही वेळेत उपचार उपलब्ध …

Read More »

असे होते बाजारातील संधीचे सोने !

कोरोना साथीमुळे घबराट पसरली तेव्हा बाजारात खरेदी करणार्‍यांच्या संधीचे सोने झाले आहे. अशी संधी फार दुर्मिळ असते, ती घेण्यासाठी धाडस मात्र हवे. When everybody is greedy, be fearful and when everybody is fearful, be greedy. जेंव्हा बाजारात प्रत्येकजण तेजीबद्दल बोलू लागतो तेंव्हा आपण अशा गोष्टीचा धसका घ्यावयास हवा आणि जेंव्हा …

Read More »

‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती!

कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यात आटोक्यात आल्यास भारताचे अर्थचक्र तुलनेने लवकर सुरु होऊ शकेल, अशी सर्व चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय जीवनपद्धतीचे पालन, एक देश आणि समाजाने याकाळात दाखविलेले सामंजस्य, शेतीमुळे ग्रामीण भागात व्यवहारांना आलेली गती आणि सरकारी व्यवस्थेने केलेले व्यापक प्रयत्न, यामुळे हे शक्य होते आहे. कोरोना साथीमुळे जगाचे व्यवहार …

Read More »

गैरप्रकारांना आळा हवाच

कोरोना या घातक विषाणूचा फैलाव जसजसा वाढत गेला आणि या महामारीत मोठ्या संख्येने जीवितहानी होऊ शकते हे स्पष्ट झाले तसतशी कोरोनाची भीती फैलावाइतकीच झपाट्याने वाढत गेली आहे. या भीतीच्याच जोरावर काही नफेखोर सर्वसामान्यांना कोंडीत पकडून त्यांची नाना तर्‍हेने आर्थिक लुटमार करीत आहेत. खाजगी हॉस्पिटलांकडून रुग्णांची केली जाणारी लूट आणि औषधांचा …

Read More »