Breaking News

संपादकीय

परिस्थिती आटोक्यात पण…

लॉकडाऊनमुळेच एव्हाना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे उत्तम व्यवस्थापन सरकारी यंत्रणांना शक्य झाले आहे. लॉकडाऊनआधी कोरोनाच्या केसेस साडेतीन दिवसांत दुप्पट होत होत्या तर आता हे प्रमाण 12 दिवसांवर आले आहे. हा निश्चितच दिलासादायक बदल आहे. परंतु केसेस मात्र अजूनही वाढत आहेतच. भारतातील लॉकडाऊनचा मंगळवारी 42वा दिवस होता. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या …

Read More »

…अन्यथा मोठा धोका!

मूळ राज्यात परतण्यासाठी नावनोंदणी कुठे करायची, टप्प्याटप्प्याने कशा तर्‍हेने त्यांची प्रवासाची व्यवस्था केली जाणार आहे या सार्‍या बाबतची माहिती जितक्या लवकर आणि नि:संदिग्धपणे स्थलांतरित मजुरांपर्यंत पोहोचेल तेवढ्याच गोंधळाच्या घटना टाळता येतील. या मजुरांच्या प्रवासाच्या खर्चाचेही राजकारण केले जाते आहे. या सार्‍यातून निव्वळ संभ्रमच वाढेल व त्यातून अशिक्षित, भांबावलेल्या, गरीब जनतेकडून …

Read More »

संक्रमण काळात दिलासा

देशात महाराष्ट्र राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून, मुंबईतील हा धोका तेथे अत्यावश्यक सेवांसाठी दररोज कामाला जाणार्‍यांद्वारे मुंबईजवळच्या जिल्ह्यांत पसरत आहे. याकडे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीला यश आले आहे. संसर्गजन्य कोरोनाचा एव्हाना आपल्या देशात गुणाकार …

Read More »

सावधपणे सवलती द्या

मुंबई, पुणे, नागपूरचा काही भाग तसेच अन्य काही रेड झोन्समधील परिस्थिती अजूनही गंभीर म्हणावी अशीच आहे. त्यामुळेच निव्वळ ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्येच टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करता येतील. अखेर 4 मेपासून 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची केंद्राची घोषणा शुक्रवारी आली. मात्र, निरनिराळ्या राज्यांत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, भाविक, पर्यटक आणि …

Read More »

वाढत्या सुसज्जतेची गरज

लॉकडाऊन 2.0च्या शेवटच्या टप्प्यात देश शिरत असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांना घरी परतण्यासाठी राज्यांतर्गत प्रवासाची परवानगी दिली आहे. हा महत्त्वाचा निर्णय असून आता सर्वच राज्यांना आपापली सुसज्जता वाढवावी लागणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून स्थलांतरित मजुरांची मोठ्या प्रमाणात असलेली आपापल्या राज्यांत परतण्याची …

Read More »

उपजीविकांवर भर हवाच

एकीकडे कोरोनाच्या आणखी फैलावाची भीती आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा फटका व जवळपास 40 कोटी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधण्याची जबाबदारी केंद्र सरकारला पार पाडायची आहे. हे आव्हान सोपे अजिबातच नाही. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा सोमवारपासून सुरू झाला. खरंतर याच्याही आधीपासून सर्वसामान्यांचे …

Read More »

संक्रमण आणि दिलासा

कोरोनाने आपला विळखा भारतातही घालायला सुरुवात केली आहे. कोविड-19चे नवे रुग्ण दररोज देशभरात आढळत असून, मृतांचा आकडाही हळुहळू पुढे सरकत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात होत असताना या महाभयंकर आजारातून बचावणारेही आहेत. ही दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. कोरोनावर मात करायची असेल, तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. संसर्गजन्य रोग कोरोनाने जगातील …

Read More »

कोरोना : प्राण्यांची कार्यशाळा

प्राण्यांचा राजा सिंह बरेच दिवस जंगलामध्ये नेहमी प्रमाणे फेरफटका मारत होता. तो खूप चिंतेत होता. एक दिवस त्याने सर्व प्राण्यांची बैठक बोलाविली. सिंहाने बैठक बोलविल्यामुळे सर्व प्राणी बैठकीला हजर राहिले. सिंहाने बैठकीला सुरुवात केली व सुरुवातीलाच सांगितले की, आज आपण एका अति गंभीर विषयावर बैठक बोलाविली आहे. सिंह म्हणाला की …

Read More »

अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त

हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठी चांगला मुहूर्त असावा लागतो. चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळणारच असा विश्वास असतो. वैशाख महिन्यातील शुध्द तृतीयेला येणार्‍या अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. संपूर्ण दिवसभर हा दिवस चांगल्या समजल्या …

Read More »

पुढील उपाययोजनांच्या दिशेने

देशातील जनता एव्हाना लॉकडाऊनमधील जीवनशैलीला बर्‍यापैकी रूळली असून आता पुढील उपाययोजनांच्या दिशेने थोड्याफार हालचालीही सुरू झाल्या आहेत. काही राज्ये आपल्या स्थलांतरित मजुरांना नेण्याच्या तयारीत असून सगळ्यांच्याच नजरा आता 3 मेच्या दिशेने लागल्या आहेत. लॉकडाऊनला आता महिना पूर्ण झाला आहे. सुरुवातीला प्रचंड गैरसोयीच्या वाटलेल्या लॉकडाऊनमध्ये एव्हाना देशभरातील बहुतांश जनता रुळली आहे. …

Read More »