Breaking News

संपादकीय

भारताच्या विकासात जेएनपीटीचे भरीव योगदान

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटी आपल्या ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी सतत नवनवीन उपाययोजना तसेच सुधारणा करीत आहे. बंदराच्या निरंतर विकास आणि विस्तारामुळे जेएनपीटीला राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देण्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडण्यास मदत झाली आहे. सध्याच्या परिस्थितीतही कोविड 19चा उद्रेक आणि लॉकडाऊनच्या आव्हानांच्या परिणामावर …

Read More »

कोरोनाचे संमिश्र चित्र

जगभरात अनेक देशांमध्ये सध्या काही महिन्यांच्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर दोन टोकाची परिस्थिती दिसते आहे. एकीकडे नित्य नव्याने वाढत चाललेले केसेसचे आकडे तर दुसरीकडे अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी व्यवहार खुले केले जाण्याच्या उपाययोजना, या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लोक सुयोग्य खबरदारी घेऊन वागत आहेत तर काही ठिकाणी बेपर्वाईने गर्दीही केली जाताना दिसते …

Read More »

रायगडात कोरोना वाढतोय

कोरोनाने रायगड जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले आहे. पूर्वी केवळ शहरांपुरता मर्यादित असलेल्या कोविड-19च्या विषाणूने एव्हाना जिल्ह्याचा ग्रामीण भागही व्यापला असून, सुधागड हा एकमेव तालुका सोडला तर उर्वरित सर्व 14 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे काही जण उपचार घेऊन बरे होत सुखरूप घरीही …

Read More »

संकटकाळात समन्वय अन् एकजूट हवी!

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या महाभयंकर शत्रूविरुद्ध अनोखे व ऐतिहासिक युद्ध सुरू आहे. युद्ध म्हटले की एकजुटीने आणि सर्वशक्तिनिशी लढा द्यावा लागतो. कोविड-19 हा शत्रू अदृश्य स्वरूपात आहे. शिवाय तो झपाट्याने पसरतोय, वाढतोय. त्यामुळे त्याचा मुकाबला पूर्ण क्षमतेने तसेच अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणीद्वारे करण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्यात मात्र …

Read More »

जीवन गाणे… नव्या चालीत

कोरोना विषाणूने आपल्या भयावह अस्तित्वाची जाणीव मानवजमातीला करून दिली त्याला आता जवळपास सहा महिने होत आले आहेत. युरोप-अमेरिकेत हजारोंचे बळी घेणार्‍या कोरोनाला आतापावेतो विकसनशील भारताने तुलनेने बरा अटकाव केला आहे. आता एकीकडे कोविड-19ची साथ रोखून धरतानाच जगणे पूर्ववत करण्याचे आपले प्रयत्न सुरू झाले आहेत. जोवर कोरोना विषाणूवरची लस वा त्याच्या …

Read More »

महाराष्ट्राला कसे वाचवणार?

एकीकडे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठीच्या हालचालीही सुरू झालेल्या दिसत आहेत. अन्य राज्ये कदाचित त्या दिशेने हळूहळू जाऊही शकतील. परंतु सर्व प्रमुख शहरे कोरोनाच्या विळख्यात असलेल्या महाराष्ट्राला कोण आणि कसे वाचवणार? देशातील कोरोना रुग्णांची संख्या एव्हाना 1 लाख 12 हजारच्या पुढे गेली आहे. गुरुवारीही …

Read More »

पायी चालताना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी

संजयआप्पा ढवळे यांची मागणी माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला. लॉकडाऊन काळात मुंबई, पुणे अथवा अन्य शहरांतून येणार्‍या कोकणवासीयांसाठी शासनाने केलेल्या सुविधा अपुर्‍या पडत असल्याने अनेक जण कोकणात आपल्या गावी आजही चालत येताना दिसत आहेत. असेच पायी चालत …

Read More »

राज्यात शासन आहे कुठे?

संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, कोविड-19चे सर्वाधिक बळीही इथेच गेले आहेत आणि सर्वाधिक मृत्यूदराच्या बाबतीतही महाराष्ट्राचाच क्रमांक पहिला आहे. असे असताना राज्यातले शासन आहे कुठे? राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे, अक्षम्य दिरंगाईमुळे राज्यातील जनतेची अवस्था दयनीय आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाशी आपली झुंज सुरूच असून त्याकरिता देशभरात पुकारण्यात आलेला चौथा लॉकडाऊन …

Read More »

…केला होता अट्टाहास!

‘अखेर गंगेत घोडे न्हाले’ अशीच सामान्य प्रतिक्रिया राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींनंतर सर्वत्र ऐकावयास मिळते आहे. असो, झाले गेले गंगेला मिळाले. कुटील राजकारणाची उठाठेव सोडून ठाकरे सरकार आतातरी कोरोनाच्या लढाईत पूर्ण ताकदीनिशी उतरेल अशी आशा आहे. प्रचंड आटापिटा आणि उलटेसुलटे राजकारण करून, सारा विधिनिषेध गुंडाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तीन चाकी …

Read More »

केंद्राकडून मदतीचा हात

महाभयंकर आपत्ती कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत देशवासीयांची परवड होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यातून विविध क्षेत्रांना बळ देण्यात आले असून, सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून कोणत्या घटकाला काय मिळणार याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गेल्या काही दिवसांपासून …

Read More »