Breaking News

संपादकीय

समर्थ नेतृत्व

अफाट लोकसंख्येच्या भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर भयावह परिस्थिती ओढवेल अशी भीती जगभरातच अनेकांना वाटत होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाच्या काळात असे काही झपाट्याने आणि खंबीरपणे निर्णय घेतले आहेत की अनेकविध स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे. भारतातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रगाढ विश्वास आहे हे तर …

Read More »

डॉक्टरांना दिलासा

देशावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले तेव्हा प्रारंभीपासून सर्वच आरोग्य कर्मचारी झोकून देऊन या घातक साथीला अटकाव करण्यासाठी जुंपले आहेत, पण दुर्दैवाने सुरुवातीपासूनच या आरोग्य कर्मचार्‍यांना कुठे ना कुठे हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. केंद्र सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशामुळे मात्र निश्चितपणे त्यांना दिलासा मिळाला असेल. कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट देशात अवतरल्यानंतर देशभरात लागू …

Read More »

विकासचक्र पुन्हा फिरणार

कोरोनामुळे गेले अनेक दिवस बंद असलेली उद्योगासह अन्य क्षेत्र पुन्हा एकदा सुरू होत आहेत. माणसाचा जीव सर्वात महत्त्वाचा असला तरी याच माणसाला जगविण्यासाठी विकासाचे चक्र अविरत फिरणे आवश्यक आहे. म्हणून केंद्र शासनाने टाळेबंदीतील काही निर्बंधांमध्ये सूट देऊन शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. संपूर्ण जग सध्या …

Read More »

दिलासादायक कामगिरी

गेल्या 24 तासांत देशात आजवर नोंदल्या गेलेल्या कोरोनाच्या एकूण केसेसची संख्या 12 हजार 759 इतकी झाली आहे. पाश्चिमात्य देशांपैकी अनेक देशांमध्ये 12 हजारांहून अधिक केसेसचा हा टप्पा भारताच्या तुलनेत खूपच कमी काळात गाठला गेला होता. फक्त कॅनडा या एकमेव देशाने भारताइतक्याच प्रभावीपणे या साथीचा फैलाव थोपवून धरल्याचे दिसते. भारताने कोरोनाचा …

Read More »

लॉकडाऊनचा मार्गच योग्य

भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या विकसनशील देशासाठी हा निर्णय सोपा नव्हता. आर्थिक दृष्टीने पाहिले तर आपण खूप मोठी किंमत मोजली आहे, परंतु देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे मोदींनी स्पष्ट केले. गेले काही दिवस ते सातत्याने देशभरातील मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊनच आपण निवडलेला लॉकडाऊनचा मार्ग योग्यच होता, …

Read More »

जान भी है और जहान भी है

कोरोनाचा आता आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ लागला आहे. त्यामुळेच उच्चस्तरावर झालेल्या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुकूलता दर्शविली. त्याचबरोबर पुढच्या काळात आपल्याला ‘जान भी है और जहान भी है’ तत्त्वावर या संकटात काम करायचे आहे, असा मूलमंत्र दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण …

Read More »

निसर्गाचे स्वच्छता अभियान!

लॉकडाऊनमुळे सगळीकडेच वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हवेतील प्रदूषण स्वाभाविकपणे खाली आलेच, पण त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणातही लगेचच जाणवेल इतकी घट झाली. याचा तत्काळ दिसून आलेला परिणाम म्हणून ठिकठिकाणी पक्ष्यांची किलबिल विशेष प्रयास न करताही ऐकू येऊ लागली. अनेक ठिकाणी मोर रस्त्यांवर वा निवासी वस्त्यांमध्ये अवतरले. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे जगभरातील लोकांचे डोळे …

Read More »

गंभीर होण्याची गरज

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात सामाजिक आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही मोदीजींनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी बुधवारी लोकसभा व राज्यसभेतील विविध पक्षांच्या नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. देशातील एकूण एका व्यक्तीचा जीव वाचवण्याला आपले सरकार प्राधान्य देत आहे, हे मोदीजींचे उद्गार केंद्रातील सरकारचे लक्ष्य …

Read More »

देशाचे दीपस्तंभ

जनतेने निव्वळ मनोभावे दिवेच प्रज्वलित केले नाहीत, तर दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी समाजमाध्यमांवर या उपक्रमाद्वारे आपल्याला कशी विलक्षण जादूई अनुभूती मिळाली याचे वर्णनही केले. आपल्या अनोख्या उपक्रमांतून मोदी जनतेची आंतरिक शक्ती कशी वाढवत आहेत याचेच दर्शन समाजमाध्यमांवरील या प्रतिक्रियांमधून घडते. जगभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. भारतातली परिस्थिती युरोप-अमेरिकेच्या तुलनेत …

Read More »

कोरोनाविरुद्धचा लढा

जगभरात विशेषत: युरोपात तसेच महासत्ता अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण व मृतांचा आकडा मोठा नाही. सरकारने वेळीच उचललेल्या ठोस पावलांमुळे आपण 130 कोटी नागरिक सुरक्षित आहोत, मात्र धोका अजूनही टळलेला नाही. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती …

Read More »