Breaking News

संपादकीय

लोकसंख्यावाढीचे प्रश्न

मुंबई महानगर प्रदेशाची व्याप्ती अलीकडेच पालघर, वसई, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबागपर्यंत वाढवण्यात आली. या वाढीव क्षेत्रात प्रचंड मोठ्या गुंतवणुकीतून अनेक विकास प्रकल्प राबवले जाणार असून त्यामुळे मुंबईतील लोकसंख्येचा ओघ तिकडे वळण्याची शक्यता आहे. जुलैची 11 तारीख हा लोकसंख्या दिवस मानला जात असल्याने भारताच्या तसेच मुंबईच्याही लोकसंख्या …

Read More »

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कार्यान्वित करुन देशातील शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असून शासनाने शेतकरी हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सर्वांर्थाने शेतकर्‍यांच्या आर्थिक परिवर्तनास …

Read More »

कायदा व जनजागृतीची गरज

आंतरजातीय प्रेमसंबंधांना आपल्याकडे असलेला विरोध ‘सैराट’ या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटातून उत्तम रीतीने मांडला गेला होता. एकीकडे तरुणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले तर हा चित्रपट आपल्या लेकीबाळींच्या डोक्यात भलते खूळ घालतो आहे, अशी टीकाही विशिष्ट वर्गाकडून झाली होती. हाच चित्रपट पुढे हिंदी व दाक्षिणात्य भाषांमध्येही निघाला व तितकाच लोकप्रिय झाला, …

Read More »

रायगडमध्ये नाणार चषकाचे स्वागतच व्हावे

रायगड जिल्ह्यात येणार्‍या कोणत्याही प्रकल्पाला विरोध करण्याची आपली परंपरा यावेळीही शेकापने नाणार प्रकल्पाला विरोध करून पाळली आहे. रायगड जिल्ह्यात कोणत्याही विकास योजना राबवताना त्यामध्ये विरोधाला विरोध करण्यासाठी लोकांना भडकावून त्याला विरोध करावयाचा आणि यांच्या मजूर सोसायट्यांना ठेकेदारी मिळाली की विरोध बंद करायचा हेच धोरण आजपर्यंत या पक्षाच्या नेत्यांनी राबवल्यामुळे अनेक …

Read More »

ओझ्याला जबाबदार कोण?

जरा आसपासच्या मुलांचा दिनक्रम पाहावा. सकाळी झोपेतून उठताच शाळेच्या तयारीला जुंपली जातात मुले. शाळेतला दिनक्रम पार पाडून घरी येताच, दोन घास खाल्ले न खाल्ले की त्यांना शिकवणीला पिटाळले जाते. त्यातच भरीस भर म्हणून चित्रकलेचा क्लास, स्कॉलरशिपचा क्लास, अतिरिक्त परीक्षांचा क्लास, गाण्या-नाचण्याचा क्लास, कराटे क्लास हे असतातच. या सार्‍यानंतर थोडेसे जरी …

Read More »

स्वतंत्र कोकण विद्यापीठाची नितांत गरज

सातशे महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने 1857 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीचे अनेक प्रसंग, उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यात होणारा विलंब, अभ्यासमंडळ व प्राध्यापकांच्या नियुक्तीस होणारा विरोध हा मूलतः विद्यापीठाचा वाढलेला अवाढव्य पसारा …

Read More »

जबाबदारी फक्त सरकारची?

जोरदार पावसाच्या दिवशी असा संप झाल्यास सर्वसामान्यांच्या हालाला पारावार राहणार नाही. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढीची त्यांची मागणी योग्य म्हणता येईलही. परंतु सध्याची वाहतुकीची एकंदर परिस्थिती पाहता त्यांनी असा दबाव टाकण्याऐवजी चर्चेतून तोडगा काढण्यावर भर द्यायला हवा आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात या आठवड्याची सुरूवातही झोडपून काढणार्‍या पावसाने झाली. त्यामुळे पुन्हा …

Read More »

बेफाम पर्यटकांना प्रशासनाकडून नियमांचा लगाम

कर्जतचा निसर्ग पावसाळ्यात विशेष खुणावत असतो, त्यावेळी फेसळत कोसळत असलेले धबधबे, धरणे, पाझर तलाव, गडकोट यांची सफर आणि ट्रेकिंग यांना विशेष पसंती दिली जाते, पण सातत्याने होणारे अपघात यामुळे निसर्ग पर्यटनाची ठिकाणेही बंदीच्या कक्षेत आली आहेत. मागील तीन वर्षे सातत्याने जिल्हा प्रशासनाने पावसाळी पर्यटनांवर काही प्रमाणात बंधने आणली आहेत. यावर्षी …

Read More »

‘रन’संग्राम निर्णायक टप्प्यावर

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. यजमान इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. कोणताही उलटफेर न होता अपेक्षेप्रमाणे चार अव्वल संघ निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्याने चुरस वाढली आहे. एकीकडे पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे कूच करीत असताना, तिकडे क्रिकेटची पंढरी …

Read More »

महादजी, मार्सेलिस आणि महाराष्ट्र

भाषावार प्रांतरचना तत्त्वानुसार स्थापन  झालेल्या महाराष्ट्र राज्याला पुढील वर्षी 1 मे या दिवशी 60 वर्षे पूर्ण होतील. ह्या निमित्ताने महाराष्ट्राची नवी आणि खरी ओळख सगळ्या देशाला करून देता येईल. ज्ञान, पराक्रम आणि सेवा ह्या तीन क्षेत्रात मराठी माणसाने अनेक वेळा राष्ट्रीय पातळीवर स्फूर्तिदायक आणि स्थायी स्वरूपाचे नेतृत्व आघाडीवर राहून केले …

Read More »