Breaking News

संपादकीय

सभा आणि शोभा!

तापमानाचा पारा वर चढत असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचारही चांगलाच तापू लागला आहे. त्यातून राजकीय धुरळा उडत असून, आरोप-प्रत्यारोपाचा डाव ऐन रंगात आला आहे. अशा वेळी सर्वच पक्षांचे नेते जोरदार भाषण देत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये काहींना उत्तम प्रतिसाद लाभतोय, तर काहींची मात्र पुरती दमछाक होताना दिसत …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही शेतकर्‍यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी उपयुक्त आहे. या योजनेचे उद्दिष्ट अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्‍यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी …

Read More »

वाचनसंस्कृती टिकायला हवी

एकही पुस्तक वाचलेले नाही असे सांगणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आढळतात. मुलांमध्ये वाचनाची सवय कायम राहावी म्हणून सरकारी पातळीवरून शिक्षण विभागामार्फत प्रयत्न जारी आहेत, परंतु मोबाईल आणि टीव्हीचा विळखा मुलांना पुस्तकांपासून दूर नेतो आहे. खरे तर, लहानपणापासून वाचनाची गोडी लागलेल्या मुलांची शब्दसंपदा तर समृद्ध आढळून येतेच, खेरीज ही मुले अधिक प्रतिभासंपन्न …

Read More »

चला, वसुंधरेचे आपण सारे विश्वस्त होऊ या…

आपल्या विकासाच्या आणि सौंदर्याच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत. आज आपल्या डोळ्यांना सुंदर दिसणारं, वास्तविक पृथ्वीच्या आणि आपल्या येणार्‍या पिढ्यांच्या जीवावर उठणारं आहे, हे कुणी समजूनच घ्यायला तयार नाही. वसुंधरा दिनानिमित्ताने पृथ्वी आणि पर्यावरणावरील संकटांचा घेतलेला हा मागोवा… आपण दर वर्षी वसुंधरा दिन साजरा करतो. वसुंधरेचे रक्षण करण्याच्या आणाभाका …

Read More »

मावळ पुन्हा काबिज करा

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हेविवेट गटात समाविष्ट झाल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. अर्थात ही लढाई भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेच जिंकणार हे निर्विवाद आहे. फक्त वातावरणनिर्मिती झाली म्हणजे मावळ आपला झाला असे विरोधकांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम ठरावा. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या अंतिम …

Read More »

नवरा, नारळ आणि राजकारणी

महाराष्ट्रचे लाडके विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणतात,  नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची. बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. दोन्हीही कसेही निघाले तरी ’पदरी पडले, पवित्र झाले’. दोघांनाही देवघरात स्थान, दोघेही पुज्य.  तसेच आज राजकारण्यांचे झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण आपण निवडून …

Read More »

सरकार स्थिर… मिरचीचे दर स्थिर

पावसाळा सुरू होण्याची चाहूल लागली की बेगमीची तयारी सुरू होते. लग्नाची तयारी घरात सुरू झाली की आधी चर्चा होते ती मिरची पावडर म्हणजे मसाल्याची. त्यात बाजारात रेडिमेड मिरची पावडर आणि मसाले असले तरी खरी पसंती असते ती बाजारात मिरच्या खरेदी करून तयार केल्या जाणार्‍या मसाल्यांची. मग महिलावर्ग आपल्या पसंतीच्या ठिकाणी …

Read More »

मतदारराजा जागा हो!

देशाच्या भवितव्यासाठी होणार्‍या लोकशाहीच्या उत्सवातील तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.आता वेळ मतदारांची आहे. त्यांनी आपले बहुमोल मत लोकशाही टिकविण्यासाठी आणि देशाचा विकास करणार्‍या उमेदवाराला, राजकीय पक्षाला देणे गरजेचे आहे. लोकसभेच्या महासंग्रामातील तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी (दि. 23) मतदान होत आहे. या तिसर्‍या …

Read More »

रायगडच्या रणांगणात रंगतदार लढत

रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे हे दोन तुल्यबळ उमेदवार पुन्हा आमनेसामने आहेत. रायगडचे राजकारण कधी कुठले वळण घेईल याचा नेम नसतो. म्हणूनच येथील निवडणुका रंगतदार होत असतात. गीते वि. तटकरे थेट लढतीत यंदा अनेक छटा दिसून येतात. रायगड लोकसभा मतदारसंघ पूर्वी कुलाबा …

Read More »

सत्तेच्या सिंहासनावर मोदीच बसणार

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय, सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेचे सिंहासन कोण पटकाविणार याविषयी तर्कवितर्कही सुरू झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच या सत्तेच्या सिंहासनावर पुन्हा विराजमान होण्याचा अंदाज अनेक राजनीतिकारांनी व्यक्त केलेला आहे. त्याचा हा गोषवारा… सन 2014च्या भारतीय, सन 2016 …

Read More »