लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या सभांना कुणी प्रायोजित केले आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतोय. आता आयोगानेही त्याची योग्य ती दखल घेऊन भाजपने जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यांचे योग्य प्रकारे निराकरण करणे गरजेचे बनले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार …
Read More »हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर अखेरच्या घटकेवर
कर्जत शहरात असलेले हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर आज अखेरची घटका मोजत असून या 150 वर्षाचा इतिहास असलेल्या मैदानाला आता बिल्डरचा वेढा पडत आहे. त्यामुळे हे व्यायाम मंदिर वाचवावे, अशी भूमिका कर्जत शहरातील नागरिकांनी आणि या व्यायाम मंदिरात येऊन आपले शरीर बनविणार्या बुजुर्ग मंडळींनी आता लढा पुकारला आहे. कर्जत येथील हुतात्मा …
Read More »महायुतीचा धडाका
रायगड, मावळमध्ये प्रचारात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप, शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यामुळे रायगडातील राजकारण आता चढत्या उन्हाबरोबरच चांगलेच तापू लागले आहे. हे वातावरण यापुढेही असेच तापत राहणार आहे. सतराव्या लोकसभेच्या तिसर्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला आता चांगलीच …
Read More »कर्तव्य
देशात शांततेच्या काळात सैनिक लढाई खेरीज अन्य कामे ही करतात. पूरग्रस्त स्थिती असल्यास, देशावर एखादे अस्मानी संकट वा वादळवारा किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास प्रथम पाचारण केले जाते ते सैनिकाला. देशाची सीमा सांभाळणार्या सैनिकावर जेवढा विश्वास टाकला जातो तेवढा क्वचितच सरंक्षणासाठी तैनात असणार्या शासकीय सेवेतील कर्मचार्यावर टाकले जाते. त्यांच्यात प्रामाणिकपणा, देश …
Read More »रामभाऊ म्हाळगी यांचा संसद प्रवेश
सतराव्या लोकसभेसाठी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशात सात टप्प्यात निवडणुकीच्या कार्यक्रमाची 10 मार्च 2019 रोजी घोषणा केली. त्या दिवसापासून देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे, प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दणदणीत रणशिंग फुंकून महाराष्ट्रात जबरदस्त वातावरण …
Read More »‘राम जन्मला…’ची कथा
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सवानिमित्त रामनवमी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राममंदिरांमध्ये यानिमित्ताने कीर्तन व प्रवचने आयोजित केली जातात. असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते, पण आताच्या आधुनिक युगात कालबाह्य होत …
Read More »जय श्रीराम
आज चैत्र शुद्ध नवमी. अर्थात रामनवमी. हजारो वर्षापूर्वी याच भूमीत भगवान विष्णूने प्रभू रामचंद्राच्या रूपात अवतार घेऊन जगाचे कल्याण केले होते. त्या भगवान रामाचे अयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प तमाम भारतीयांचा आहे. तो संकल्प तडीस नेणार्यांना साथ द्या. एवढीच अपेक्षा या रामनवमीच्या निमित्ताने रामभक्तांकडे. आज श्री रामजन्मोत्सव. एकवचनी, एकबाणी असे …
Read More »तरुण मतदारांवर मदार!
यंदाच्या निवडणुकीतील तरुणांच्या प्रचंड संख्येमुळेच कौशल्यविकास, उच्चशिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी हे मुद्देही राष्ट्रीय सुरक्षेच्या ठळक मुद्द्याइतकेच महत्त्वाचे मानले जात आहेत. निवडणुकीबद्दल तरुणांमध्ये कमालीची जागरुकता दिसत असून कित्येक सर्वेक्षणांमध्ये तरुणांनी मतदान हे आपले कर्तव्य असून ते बजावणे वास्तवत: बंधनकारकच असायला हवे अशी भावनाही व्यक्त केली होती. तरुणांच्या मोठ्या संख्येमुळेच आरक्षणाचा मुद्दाही …
Read More »गीते, तटकरेंची प्रतिष्ठा पणाला
रायगड लोकसभा मतदारसंघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. असे असले तरी खरी लढत होणार आहे ती विद्यमान खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात. या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे दोघांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहेे. काँग्रेस काय करणार यावर बरेच काही अवलंबून होते. …
Read More »पोलादपूर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी वाढताहेत
पोलादपूर तालुक्यातील 37 हजार 204 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 25 हजार 437 हेक्टर जमीन लागवडीस योग्य असूनही या शेतकरीबहुल तालुक्यात एकीकडे जमीन माफियांचा सुळसुळाट आणि दुसरीकडे बेकारी पराकोटीला पोहोचत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्यक्षात केवळ कागदं रंगविण्याकडे कल असलेल्या शेतकर्यांना राजकारण केल्याचा आनंद क्षणिक मिळत असला, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper