Breaking News

संपादकीय

वेळकाढू कारस्थान

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे केवळ ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून भिजत पडले होते असे मानले जाते. वास्तविक या निवडणुका लागलीच जाहीर झाल्या तर आपली धुळदाण उडेल याची खात्रीच असल्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये रस नव्हता. अजुनही सत्तेत असलेले तिन्ही पक्ष निवडणुकांसाठी तयार आहेत …

Read More »

आता महाराष्ट्राचे काय?

ओबीसी आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने अत्यंत वेगाने शासकीय यंत्रणा कार्यान्वित केली तसेच पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करून आपण कुठली पावले उचलली आहेत याची संपूर्ण माहितीही न्यायालयाला दिली. साहजिकच सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मध्यप्रदेश सरकारच्या याचिकेवर स्वतंत्र निकाल देऊन तेथील ओबीसी आरक्षणासहित निवडणुकांचा मार्ग मोकळा …

Read More »

’स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’  असे आपल्या माय मराठीत म्हटले जाते. आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की, नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही …

Read More »

सुसज्जता हाच पर्याय

हवामान बदलाच्या भयावह परिणामांचे चित्र किती भीषण असू शकेल याचा इशारा देणारे अनेक अहवाल या आठवडाभरात समोर आले आहेत. वाढते तापमान, पावसाच्या स्वरुपात वारंवार होणारे ठळक बदल आणि कित्येक ठिकाणी उद्भवणारी पूरस्थिती या तिन्ही बाबी हवामान बदलाच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठीची सुसज्जता भारताला आता वेगाने वाढवावी लागणार आहे हेच अधोरेखित करतात. …

Read More »

कितीही काम केले तरी माझं समाधान होत नाही -परेश ठाकूर

गेल्या पाच वर्षांपासून मी पनवेल महापालिका सभागृह नेता म्हणून काम करतो. नागरिकांच्यात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी कितीही काम केले तरीदेखील माझे समाधान होत नाही. अजूनही खूप काही करणं बाकी आहे, असंच मला वाटतं… अशी प्रामाणिक कबुली दिलीये पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी. आज त्यांच्या …

Read More »

परेश ठाकूर : एक यशस्वी नेतृत्व

वपुर्वचन वस्त्राणि विद्या विभव एवंच। वकार पंचहीना न लभन्ते गौरवंंं नरा:॥ समाजात मोठेपणा, मान-सन्मान हवा असेल तर या पाच गुणांपैकी एक गुण आपल्याकडे हवा. आकर्षक रूप किंवा भरदार बांधा अथवा उत्तम व्यक्तिमत्त्व सर्वांचे लक्ष वेधून घेते. वक्तृत्व कलेने लोकांना आपल्याकडे वळवून घेता येते. सुंंंंदर व नीटनेटके कपडे लोकांना मोहवितात. ‘विद्वान …

Read More »

काँग्रेस जोडो यात्रा

देशभरातील पराभवांच्या मालिकेनंतर काँग्रेसने पक्षीय ढांचामध्ये बदल करायचे ठरवले आहे. तरुणांसाठी 50 टक्के प्रतिनिधित्व तसेच एक कुटुंब, एक तिकिट अशी संकल्पना राबवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या घोषणेचे नक्कीच स्वागत करता आले असते. परंतु गांधी परिवाराचे संरक्षण करण्यासाठी त्यातही पळवाटा ठेवण्यास हा पक्ष विसरलेला नाही. सलग पाच वर्षे पक्षामध्ये सक्रीय …

Read More »

सावित्रीतील उत्खननाने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत धोक्यात

सावित्री नदीपात्रातील राजेवाडी ते केंबुर्ली क्षेत्रात पर्यटन व नौकानयन क्षेत्र सुरू करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने सावित्री नदीपात्रात ड्रेझरद्वारे उत्खनन करण्यात येणार आहे मात्र असे झाल्यास सव ते राजेवाडी या आठ किलोमीटर पट्ट्यातील परिसरातील हजारो एकर भातशेती भविष्यात नष्ट होऊन नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विहिरी व बोअरवेल नष्ट होण्याची शक्यता असल्याने पर्यटनाच्या …

Read More »

नुसतीच ओरड!

रशिया-युक्रेन युद्धाची थेट झळ आपल्याला पोहोचली नसली तरी या युद्धाचे आर्थिक परिणाम अवघ्या जगाबरोबरच आपल्यालाही भोगावे लागणार आहेत याचा इशारा अर्थतज्ज्ञ सुरूवातीपासूनच देत होते. शेजारच्या श्रीलंकेमध्ये महागाईमुळे जनक्षोभाचा कसा भडका उडाला हे आपण पाहतोच आहोत. महागाईच्या नावाने विरोधकांनी आता अधिकच उच्च रवात ओरड करायला सुरूवात केली असली तरी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

हिंदुत्वासाठी चढाओढ

भारतीय जनता पक्ष सोडला तर बाकीचे बहुतेक पक्ष सध्या स्वत:चे हिंदुत्व सिद्ध करण्याच्या चढाओढीत मग्न दिसतात. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच मशिदींवरील भोंग्यांना पर्याय सुचवला. हा पर्याय होता, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा. राज ठाकरे यांच्या या मोहिमेनंतर भाजप मनसेच्या अधिक जवळ येईल असा अंदाज बांधून भाजपवरच तोंडसुख घेणे सुरू …

Read More »