भारतीय संघराज्यामध्ये विविधतेत एकतेचे सूत्र देशाच्या अखंडतेला कायमच खतपाणी घालत आहे. सामाजिक, भाषिक विविधता, आर्थिक, वैचारिक, व्यावसायिक, पेहराव, आहार आणि राहणीमानातील विविधतांचा उहापोह आपण सर्वार्थाने भारतातील नागरिकांसंदर्भात करू शकतो, मात्र ’भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा म्हणताना आपण या विविधतेतील एकता सहजरीत्या स्वीकारतो. बहुसंख्याक या शब्दामध्ये संख्या गृहित धरली आहे, …
Read More »उडत येणारे संकट
महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे संकट घोंघावू लागले आहे. जागोजागी पक्षी मरून पडल्याच्या घटना ऐकू येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी कावळे, कबुतरे आणि बदके अचानक मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. आता हे पक्षी नेमके बर्ड फ्लूमुळेच मेले की अन्य कुठल्या कारणाने याचा तपास करावा लागेल. परंतु परभणीजवळील एका गावामध्ये …
Read More »सुरक्षेचे राजकारण
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अशा महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा अथवा कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्याच्या पाठीमागे सुडाचेच राजकारण आहे हे कोणीही ओळखेल. ज्याच्या हाती ससा, तो पारधी अशी आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे. याचा अर्थ ज्याच्या …
Read More »निसर्गाची अवकृपा
कोरोना महामारीतून भारत सावरत असताना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना देशातील नागरिकांना करावा लागत आहे. सध्या देशात हिवाळा सुरू असला तरी पावसाळ्याचा अनुभव येत आहे. या ‘हिवसाळ्या’चा फटका नागरिकांना विशेषकरून शेतकरी आणि मच्छीमार बांधवांना बसत असून, बदलत्या हवामानामुळे त्यांना सातत्याने आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात गेल्या काही …
Read More »सूड आणि आसूड
जनतेच्या प्रश्नांकडे संपूर्ण डोळेझाक करून आपापल्या खुर्च्या तेवढ्या सांभाळण्याच्या कामात व्यग्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराकडे पाहून कपाळावर हात मारावा की संतापाने उसळून उठावे असेच महाराष्ट्रातील तरुण पिढीला वाटत असेल. जनतेच्या समस्यांचा मुद्दा आला की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे अंगलट आल्यावर चांगले काम करणार्या व्यक्तींना सूडबुद्धीने कायद्याच्या …
Read More »बिल्डर धार्जिणा निर्णय
लॉकडाऊनच्या तडाख्याने विकलांग झालेल्या बांधकाम व्यवसायाला उभारी देण्याच्या हेतूने सर्व प्रकारच्या अधिमूल्यात (प्रीमियम) 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या आधी मुद्रांक शुल्कातही सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. अधिमूल्यातील सवलतीचा लाभ घेणार्या बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना घरखरेदीदारांचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विकासकांबरोबरच या भरघोस …
Read More »फाफडा पॉलिटिक्स
येत्या 10 जानेवारीस शिवसेनेतर्फे गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला खुद्द शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मुंबईत होर्डिंगबाजी सुरू झाली असून, जलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशी घोषणा देण्यात येत आहे. हे सारे पाहून मुंबईतील मराठी माणूस सोडाच गुजराती बांधवांसदेखील हसू …
Read More »नामांतराचे नाटक
औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1988मध्ये केली. तेव्हापासून हा वाद चालू आहे. गेल्या तीन दशकांमध्ये शिवसेना दोन वेळेला सत्तेवर होती. आजही औरंगाबाद महापालिकेत हा पक्ष सत्तेवर आहेच. तरीही सरकार दफ्तरी औरंगाबादचे संभाजीनगर काही होऊ शकलेले नाही. यंदा तेथील महापालिका निवडणूक उंबरठ्यावर आलेली असताना हा मुद्दा पुन्हा …
Read More »कोरोना आणि काँग्रेस
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादची भारत बायोटेक या दोन औषध कंपन्यांनी अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी शोधून काढल्या. केंद्र सरकारच्या औषध विभागाने आपत्कालीन वापरासाठी त्यांना मान्यतादेखील दिली. ही दोन्ही औषधे पूर्णत: भारतीय बनावटीची असून त्याबद्दल सर्व देशवासियांना अभिमान वाटावा. आत्मनिर्भर भारत उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी …
Read More »रस्त्यांच्या मधोमध विजेचे खांब
कर्जत तालुक्यातील नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर विजेचे खांब उभे आहेत,त्यांच्या आजूबाजूला रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि मध्ये विजेचा खांब हि समस्या. यावर महावितरण कंपनी कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत असून रस्त्याची करोडो रुपयांची कामे करणारी यंत्रणा देखील वीज वाहून नेणारे खांब हटवत नसल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यात मागील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper