Breaking News

संपादकीय

शेअर बाजाराचा 25 वर्षांचा लेखाजोखा

अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं भविष्यात वाढीस जागा असलेली क्षेत्रं हेरून त्यातील उत्तम कंपन्यांत गुंतवणूक करणं हाच नवीन दशकाची मूलमंत्र ठरू शकतो. त्यामुळे 25 वर्षांचा हा लेखाजोखा महत्त्वाचा ठरू शकतो.परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजेच ज्ञानाचा आरंभ होय. असं पवित्र बायबलमध्ये एक वचन आहे. याच ज्ञानावर …

Read More »

नवे वर्ष 2021 चे 21 आर्थिक संकल्प!

नव्या वर्षात नवे संकल्प करण्याची पद्धत आहे. 2020 या वर्षात जेवढी चर्चा कोरोना साथीची झाली तेवढीच वैयक्तिक आणि देशाच्या अर्थकारणाची झाली. अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले तर अनेक नागरिकांनी या काळातही गुंतवणुकीच्या मार्गाने पैसा कमावला. याचा अर्थ त्यांनी त्यांचे आर्थिक नियोजन केले. त्याचा दुसरा अर्थ त्यांनी आपल्या आयुष्यात काही आर्थिक …

Read More »

पर्यटन करा, पण जबाबदारीने

पुन्हा कोविडच्या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी एकीकडे आटापिटा सुरू असतानाच राज्यात ठिकठिकाणी उसळलेली पर्यटकांची गर्दी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारखी मूलभूत खबरदारीही घेताना दिसत नाही. इतके महिने घरात बंदिस्त राहिलेले लोक मोकळेपणाने हिंडू-फिरू इच्छितात यात वावगे काहीच नाही. परंतु कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही याचे भानही त्यांनी बाळगायलाच हवे …

Read More »

बुलेट ट्रेन विरुद्ध मेट्रो!

अहमदाबाद ते मुंबई अशी अतिवेगवान बुलेट ट्रेन सुरू करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे जुने स्वप्न आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि अहमदाबाद हे देशातील एक महत्त्वाचे व्यापार केंद्र या दोन्ही शहरांना अतिजलद रेल्वेसेवेच्या माध्यमातून जोडण्याचा हा महाप्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना फायदेशीरच आहे हे सांगावयास कुण्या ज्योतिष्याची गरज …

Read More »

कोरोनाची रात्रपाळी!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गोंधळयुक्त निर्णयांची एव्हाना जनतेला चांगलीच सवय झाली आहे. कुठल्याही समस्येचा सर्वंकष विचार न करता निर्णय जाहीर करायचे, त्या निर्णयांचा फोलपणा लक्षात आणून दिला गेल्यावर काही तरी जोड निर्णय घेऊन सारवासारव करायची हे तर गेले वर्षभर सुरूच आहे. त्याच मालिकेतला ताजा निर्णय म्हणून रात्रीच्या संचारबंदीच्या निर्णयाचा उल्लेख …

Read More »

भाजपचे ‘मिशन बंगाल’

देशावर अनेक वर्षे सत्ता गाजविणारा काँग्रेस पक्ष अंतर्गत मतभेद आणि नेतृत्व निवडीच्या गर्तेत अडकला असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्ष बिहारनंतर पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच केलेला बंगाल दौरा तेथील आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी आहे. नव्या वर्षात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक होत …

Read More »

सोनिया गांधींचा ‘लेटरबॉम्ब’

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले खरे, मात्र तीन पक्षांच्या सरकारमधील कुरबुरी अधूनमधून बाहेर येतच आहेत. विशेषकरून काँग्रेस नेत्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून डावलले जात असल्याची भावना आहे. याची दखल आता थेट काँग्रेस हायकमांडने घेतली असून, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे नाराजी दर्शविली आहे. खरेतर महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस …

Read More »

ट्रेडिंगचे प्रकार आणि त्यांचा कालावधी

मागील आठवड्यातील लेखात आपण ट्रेडिंगसाठी अत्यावश्यक असलेल्या शिस्तबद्धतेबद्दल जाणून घेतलं. आता विविध प्रकारच्या ट्रेडिंगच्या कालावधीबद्दल पाहूयात. स्कालपिंग : अगदी थोडक्या नफ्यासाठी ट्रेड करणार्‍यांना स्काल्पर्स म्हणतात. ऑप्शन ट्रेडिंग हे या स्कालपिंग प्रकारात मोडतं, ज्यामध्ये मोठ्या पोझिशन्स घेऊन दोन-पाच रुपये नफा घेऊन बाहेर पडणारे असे ट्रेडर्स असतात. अशा व्यवहारांचा कालावधी काही सेकंदांपासून …

Read More »

करपद्धतीत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे का आहे?

इन्कम टॅक्स भरण्याची अखेरची मुदत जवळ आली की करांची सर्वाधिक चर्चा होते. कर आणि कर पद्धती हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असूनही त्याविषयी पुरेशी जागरूकता झालेली नाही. करांची अपरिहार्यता एकदा समजून घेतली की करपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याला महत्त्व का आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच राहत नाही. इन्कम टॅक्स …

Read More »

पोरखेळ की सत्तेचा खेळ

कांजूर येथील जमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने झणझणीत चपराक दिल्यानंतर ठाकरे सरकार भानावर येईल असे वाटले होते, परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. या सार्‍या प्रकाराला कुरघोडीच्या राजकारणाचे स्वरुप देऊन सत्ताधारी पक्षाला कसला आनंद होतो आहे, कोण जाणे? आता बांद्रा-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या मोकळ्या भूखंडावर मेट्रो कारशेड उभी करण्याच्या दृष्टीने …

Read More »