Breaking News

संपादकीय

मनोरंजनाचे तांडव

केंद्र सरकार काही महत्त्वाची पावले टाकत असले तरी अजुनतरी ओटीटी व्यासपीठांना लगाम घालणारी व्यवस्था आपल्याकडे नाही हे मान्य करावे लागेल. अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे. ओटीटी कार्यक्रमांना सेन्सॉर बोर्डाचा अंकुश लावला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक चवताळून उठतात आणि या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना मोकळे सोडले तर तांडव सारखा पेचप्रसंग …

Read More »

समांतर न्यायालयांचे पेव

दुर्दैवाने सध्या समाजमाध्यमांचा रेटा अन्य प्रस्थापित माध्यमांनाही आपल्या मागून येण्यास भाग पाडत आहे. विशेषत: टीव्ही पत्रकारितेवर समाजमाध्यमांतील क्रिया-प्रतिक्रियांचा नकळत मोठा प्रभाव पडत गेला आहे. आजमितीस देशात शेकडो वृत्तवाहिन्या विविध भाषांमधून प्रसारित होत असतात. या वृत्तवाहिन्यांना सनसनाटी बातम्या आणि वादग्रस्त आशयाचे (कंटेंट) आकर्षण वाटू लागले. त्याचीच परिणती मीडिया ट्रायल नावाच्या भस्मासुरात …

Read More »

ग्रामविकासाचा उत्सव

रायगड जिल्ह्यात विधानसभेची भाजपकडे एकही जागा नसताना प्रशांत ठाकूर यांच्या 2014मधील विजयाने पक्षाच्या येथील यशाची सुरुवात झाली होती. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांच्यासह महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांनीही विजय मिळवला. ताज्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तर जिल्ह्यात शेकापचे अस्तित्वच धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. …

Read More »

लॉकडाऊननंतरचे माथेरान!

मुंबई आणि पुणे या महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी 90-100 किलोमीटर जवळ असलेले वाहनमुक्त, प्रदूषणमुक्त आणि सध्या कोरोनामुक्त असलेले माथेरान हे ब्रिटिशकालीन निसर्गरम्य थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. कोरोनामुक्त माथेरानला पर्यटक मोठ्या प्रमाणात पसंती देत असून पर्यटनावर 100 टक्के अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये सात महिन्यानंतर पुन्हा पर्यटन फुलू लागले आहे. दरम्यान, वाहनांना बंदी …

Read More »

महालसीकरण मोहीम

गेल्या अनेक महिन्यांपासून देशवासीयांना ज्याची प्रतीक्षा होती ती कोरोना प्रतिबंधक लस अखेर उपलब्ध झाली आहे. वैश्विक महामारी कोरोनावरील देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाला. त्यामुळे कोविड-19 विषाणूविषयीचे उरलेसुरले भयही संपुष्टात आले आहे. नववर्षाची याहून चांगली सुरुवात काय असू शकते. कोरोना या तीन अक्षरी महामारीने मानवी …

Read More »

शेअर बाजार म्हणजे लॉटरी नव्हे!

शेअर बाजारात अशक्य काही नसलं तरी अवाढव्य नफा थोड्याच अवधीत मिळणं हे लॉटरी लागण्यासारखंच असतं आणि म्हणून प्रत्येक वेळी अशी लॉटरी लागेल अशी आशा बाळगणं मूर्खपणाचं ठरू शकतं. जर आपली आर्थिक उद्दिष्टे अशा अवास्तव गृहितकांवर आधारित असतील, तर भविष्यात आपण नक्कीच अडचणीत येऊ शकतो. कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी …

Read More »

आर्थिक आणि सामाजिक प्रदूषणापासून सावधान!

कोरोना संकटकाळातील अर्थकारण आणि समाजकारण अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय समाजाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे, असे आता 10 महिन्यांच्या अनुभवानंतर अभिमानाने म्हणता येईल. या वेगळेपणाचे महत्त्व आपण सर्वसामान्य स्थितीतही जेवढे मान्य करू तेवढा भारतीय समाज आत्मविश्वासाने वाटचाल करू शकेल. भारतीय शेअर बाजार दररोज नवे विक्रम प्रस्थापित करतो आहे. बाजारात येणार्‍या …

Read More »

ऐतिहासिक पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच राज्यांनी लसीकरणासाठी कंबर कसली आहे. लसीकरणासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयात निदान राजकारण होऊ नये एवढी अपेक्षा विरोधकांकडून जनतेला आहे. कारण ज्या गोष्टीशी पंतप्रधान मोदी यांचे आणि भारतीय जनता पक्षाचे नाव जोडले गेले असेल त्या प्रत्येक गोष्टीला टीकेचे लक्ष्य करण्याचे विरोधकांचे धोरण दिसते. निदान जनतेच्या आरोग्याशी …

Read More »

पुन्हा शाळा आणि दप्तर

शाळा सुरू करायची म्हणजे फक्त तारीख ठरवायची, एवढे नसते. शाळेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण कशा पद्धतीने करायचे, कोरोना चाचणीसाठी शिक्षकांना किती वेळ देता येईल, विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न कसा सोडवायचा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा विचार करून विद्यार्थीवर्गासाठी बाके कशी मांडायची, शाळेच्या वेळा कशा ठरवायच्या असे शेकडो प्रश्न अजुनही अधांतरीच आहेत. तब्बल अकरा महिन्यांच्या प्रदीर्घ …

Read More »

सार्वजनिक जीवनातील पथ्ये

एखाद्या लोकप्रतिनिधीचे खाजगी प्रकरण जाहीररित्या चर्चेत येऊ न देण्याचा अन्य नेतेमंडळींनी प्रयत्न केला तरी समाजमाध्यमांमध्ये असली प्रकरणे अत्यंत चवीने चघळली जातात. तसे पाहता अशाप्रकारचे वर्तन दुर्दैवीच म्हणायला हवे. कारण लोकप्रतिनिधींच्या खाजगी आयुष्यातील ढवळाढवळ चव्हाट्यावर आणली की राजकारणाचा दर्जाही तितकाच खालावत जातो. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याला आता 73 वर्षे होऊन …

Read More »