Breaking News

संपादकीय

लस प्रत्येकाला मिळणार

जेव्हा कधी कोरोना प्रतिबंधक लस तयार होईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला दिली जाईल. कुणीही या लसीकरणातून वगळले जाणार नाही, असे सुस्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. लस तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून देशव्यापी लसीकरणाचा आराखडा तयार करण्याकरिता तज्ज्ञांचा राष्ट्रीय पातळीवरील गट …

Read More »

मराठा आरक्षणाची शोकांतिका

कुठल्याही विधायक कामाला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. समाजाला सतावणारे अनेक प्रलंबित प्रश्न धसाला लावणारे तितकेच प्रबळ सरकार सत्तेत असावे लागते. दुर्दैवाने महाराष्ट्रात तूर्तास या दोन्ही गोष्टींची वानवा आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सर्वांना आले असेलच. मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. त्याचप्रमाणे तो न्यायप्रविष्ट देखील …

Read More »

भीती दुसर्या लाटेची

कोरोना महामारीचे या घटकेला दिसणारे चित्र मोठ्या विचित्र मन:स्थितीत ढकलणारे आहे. एकीकडे कोरोनाचा आपल्या देशातील रुग्णआलेख उतरणीला लागलेला दिसत असल्याने हायसे वाटते आहे. तर त्याचवेळी युरोप अमेरिकेत दिसणार्‍या कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेमुळे छाती पुन्हा दडपून जाते आहे. अमेरिका, फ्रान्स, स्पेन आदी अनेक देशांमध्ये पुन्हा संसर्गाचे विक्रमी आकडे समोर येऊ लागले …

Read More »

विचारांची लाखोली

शिवसेना नेत्यांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषणे ऐकल्यानंतर या मेळाव्याला विजयादशमी मेळावा म्हणावे की शिमग्याचा कार्यक्रम असा प्रश्न कोणालाही पडला असता. काहीही करून भारतीय जनता पक्षाला झोडपून काढायचे या एककलमी कार्यक्रमात सार्‍या वक्त्यांची भाषणे आणि उपस्थितांचा वेळ या दोन्हीही गोष्टी वाया गेल्या. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपल्या पाऊण …

Read More »

संसर्ग कमी होतोय..!

संपूर्ण जगभर दहशत माजविणार्‍या कोरोना महामारीचा संसर्ग अखेर सहा महिन्यांनंतर भारतात कमी होताना दिसून येत आहे. त्या दृष्टीने ऑक्टोबर महिना देशासाठी दिलासादायक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. अर्थात, धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेताना कसूर नको! कोरोना …

Read More »

दसर्याचे खरे सोने

अत्यंत अभूतपूर्व परिस्थितीमध्ये यंदाचा दसरा उंबरठ्यावर आला आहे. एरव्ही दसरा-दिवाळीचे दिवस आले की बाजारपेठा फुलून गेलेल्या असतात. विविध प्रकारच्या चीजवस्तू, कपडे, दागदागिने, मिठाया यांच्या खरेदीसाठी गर्दी करणार्‍या सर्वसामान्यांनी दुकाने गजबजून गेलेली असतात. शेतकरी असो वा चाकरमानी खिशात थोडाफार पैसा खुळखुळू लागलेला असतो. दसर्‍याच्या शिलंगणासाठी संपूर्ण देशच आतुर झालेला असतो. यंदा …

Read More »

सीबीआयला नो एंट्री

राज्य सरकारने 1989 साली सीबीआयला राज्यात तपास करू देण्यास संपूर्ण मोकळीक दिली होती. ती मोकळीक नव्या आदेशानुसार काढून घेण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी जाहीर केले. काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्याची पार्श्वभूमी या निर्णयामागे आहे. परंतु यामागे मुंबई पोलिसांचे तपासाचे स्वातंत्र्य आबाधित राखण्याची भूमिका आहे की कुठेतरी …

Read More »

लेडिज स्पेशलचा मुहूर्त

नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारच्या सूचनेनुसार फक्त महिलांसाठी उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली. त्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे शतश: आभार मानायला हवेत. कारण राज्य सरकारने निर्णय घेतल्यास उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच दर्शवली होती. परंतु याबाबत निर्णय घेण्यास अक्षम्य चालढकल करून राज्य सरकारने महिला वर्गाच्या सहनशीलतेचा अंत …

Read More »

लॉकडाऊन संपला, कोरोना नव्हे

आजच्या घडीला देशाला नेमक्या ज्या संदेशाची आत्यंतिक गरज आहे नेमका तोच संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून दिला आहे. एखाद्या कुटुंबप्रमुखाला वाटावी तशी त्यांना देशवासीयांप्रति वाटणारी कळकळ या वेळी त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होती. त्यांच्यावर प्रेम करणारे भारतीय त्यांचा हा संदेश अतिशय गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा …

Read More »

एकमेव दिलासा मोदीच

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ही म्हण खरी भासावी असे राज्य सरकारचे आजवरचे वर्तन राहिले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळी शेतकर्‍यांच्या बांधावर धावली. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा जाहीर करताक्षणी सत्तेतील महाबिघाडी सरकारचे तालेवार नेते खडबडून जागे झाले आणि लगोलग शेतकर्‍यांच्या बांधावर धावले. परतीच्या …

Read More »