Breaking News

संपादकीय

मागणी वाढली- आली अर्थचक्राची गाडी पकडण्याची वेळ

कोरोना साथीच्या या अभूतपूर्व संकटात किती हानी झाली, याची आता केवळ चर्चा करण्यापेक्षा त्या चक्राला गती देण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ती मागणी भारतात भरपूर आहे. ती वाढत असल्याचे ताजी आकडेवारी सांगते आहे. वाढत्या मागणीचा अर्थ शेअर बाजार आणि गुंतवणूकदार …

Read More »

घोटाळ्याचा फुसका बार

मुंबई पोलिसांना आणि राज्यातील आघाडी सरकारला कायम धारेवर धरणार्‍या एका इंग्रजी वाहिनीवर टीआरपी घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन मराठी मनोरंजन वाहिन्यादेखील या प्रकरणात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरपीचा हा तथाकथित घोटाळा हास्यास्पद मानून सोडून द्यायचा की याला सुडाचे राजकारण म्हणायचे हे यथावकाश स्पष्ट होईलच. जगातील सर्व समस्या संपल्याप्रमाणे …

Read More »

अभिमानास्पद गगनभरारी

भारतीय वायुदलाचा स्थापना दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नभ:स्पृशं दीप्तम् असे ब्रीदवाक्य असलेल्या हवाई दलाच्या 88व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आकाशात विमानांनी चित्तथरारक कसरती केल्या. अलीकडच्या काळात शत्रूंचा त्रास वाढला असताना भारताची ताकद यानिमित्ताने जगाला दिसली. भारताच्या हवाई दलाची स्थापना 88 वर्षांपूर्वी म्हणजेच …

Read More »

उत्तम चालले आहे

या सरकारचे हे काय चालले आहे, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचा एकेकाळचा मित्रपक्ष म्हणवणार्‍या पक्षातर्फे विचारला जात आहे. खरे पाहता असा प्रश्नच कोणाला पडायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकदिलाने वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहे. शत्रूशी निकराने मुकाबला करत आहे आणि त्याच वेळी स्वत:चा सर्वंकष विकासदेखील साधत …

Read More »

क्लीन चिटसाठी उतावीळ!

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्याच केली, असा निर्वाळा दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) इस्पितळातील गुन्हेवैद्यक मंडळाने नुकताच दिला आहे. गुन्हेवैद्यक मंडळाचा हा निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्र सरकारला मिळालेली क्लीन चिट आहे असा काही लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. महत्त्वाचे म्हणजे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने अजून आपला …

Read More »

दिलासादायक परिस्थिती

गेला पंधरवडाभराहून अधिक काळ कोरोना आघाडीवरील देशातील परिस्थिती दिलासादायक राहिली आहे. भारताचा रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. अॅक्टिव्ह केसेसचे प्रमाण दहा लाखांच्या खाली राहिले आहे. कोरोना आघाडीवरील परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच सर्वच आर्थिक क्षेत्रांतही उलाढालींनी वेग घेतल्याचे दिसू लागले आहे.हे दिलासादायक बदल टिकवायचे असतील तर येणाऱ्या सणासुदीच्या काळात …

Read More »

हाथरस घटनेचे राजकारण

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीवर झालेला सामूहिक अत्याचार आणि त्यानंतर उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू धक्कादायकच आहे. कुणीही या घटनेचे समर्थन करणार नाही, मात्र विरोधक विशेषकरून काँग्रेस पक्ष यावरून राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करीत आहे. यातून त्यांची मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची मानसिकता स्पष्ट होते. उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात बुलगाडी येथील एका दलित …

Read More »

भाजयुमोतर्फे नवी मुंबईत विविध उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुनील कृष्णा सुतार यांच्यावतीने  नेरुळ सेक्टर, 4 येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  नवी मुंबई शहराला स्वच्छतेचा देशपातळीवर पुरस्कार मिळवून देणार्‍या पालिकेच्या सफाई करणारे कामगारांचा त्याचप्रमाणे …

Read More »

गणित बोनस शेअर्सचे!

शेअर बाजारातील कंपन्या जाहीर करत असलेल्या बोनस शेअर्सविषयी अनेक समज गैरसमज आहेत, अशा बोनस शेअर्सचे गणित आपण समजून घेऊ यात. दिवाळी म्हटलं की बाकीच्या सर्व गोष्टींबरोबर नोकरवर्गाची एक हक्काची गोष्ट म्हणजे बोनस. कामगारांना आधी दर आठवड्याला पगार (वेजेस) मिळायचा. वर्षातून 52 आठवडे, परंतु मासिक पगार ही पद्धत चालू झाल्यावर 12 …

Read More »

आर्थिक सहभागीत्व वाढेल, ते गुंतवणुकीच्याच मार्गाने

भारतीय अर्थव्यवस्थेत परस्परविरोधी अशा अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. कोरोना संकटाचा संभ्रम अजून संपला नसताना या गोष्टींकडे आधी जागरूक भारतीय नागरिक म्हणून आणि नंतर एक गुंतवणूकदार म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे. कोरोनासाथीसोबत आपल्याला दीर्घकाळ जगावे लागणार आहे, हे आता अगदी स्पष्ट झाले आहे. हे संकट किती लांबेल, याची …

Read More »