रोम जळत असताना राजा नीरो फिडल वाजवत होता, असे इतिहासकार सांगतात. तसाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला असताना राजा म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका होत असताना अखेर त्यांनी पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा वरुणराजाने …
Read More »असा रचला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या साम्राज्याचा पाया
भारतातील सर्वांत मोठी म्हणजे 15 लाख कोटी रुपये इतके विक्रमी भांडवल असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा इतिहास रोचक आहे. रिलायन्स कंपनीच्या सुरुवातीच्या वर्षात झालेली उभारणी ही अशी होती… आज आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण हे सर्वांनाच माहीत असेल. आज आपण त्यांच्या कंपन्यांबद्दल जाणून घेण्यापूर्वी या त्यांच्या वारसाबाबत काही रोचक बाबी जाणून घेतल्याशिवाय …
Read More »अर्थसाक्षर नागरिकांची संख्या का वाढली पाहिजे?
भारत वेगळा देश आहे आणि त्याच्या अर्थव्यवस्थेकडे वेगळ्या निकषांनीच पाहावे लागेल, पण पारंपरिक पाश्चात्य अर्थशास्त्राच्या निकषांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी नेहमीच संभ्रम निर्माण होत आला आहे. तो टाळण्यासाठी सरकारला अनेक धोरणात्मक बदल करावे लागणार आहेत. आर्थिकदृष्ट्या साक्षर नागरिकांची संख्या अशीच वाढवत ठेवली तरच असे बदल करणे शक्य होणार आहे. गेली किमान सात …
Read More »बेफिकीरी टाळायला हवी
एकंदरीतच या सणासुदीच्या काळात व आगामी दिवाळीच्या खरेदीकरिता लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील व त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाच्या फैलावाची शक्यता वाढेल, अशी भीती डॉक्टर व्यक्त करीत आहेत. त्यातच राज्य सरकारने शुक्रवारपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आदींना रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुले राहण्याची मुभा दिल्याने लोकांना बाहेर पडण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भीतीही आहे. …
Read More »परतीच्या पावसाचा तडाखा
गेल्या तीन-चार दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई-कोकणाचा भाग मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे. येथील सारे जनजीवन विस्कटून गेले. याच सुमारास तिकडे हैदराबादमध्ये तर पुराचे पाणी शहरामध्ये घुसून धडधाकट माणसे वाहून जात असतानाची दृश्ये टीव्हीवर ज्यांनी पाहिली असतील, त्यांच्या अंगावर नक्कीच काटा आला असेल. अशीच काहिशी परिस्थिती आपल्या नजिकच्या पुणे …
Read More »दिव्यत्वाची जेथ प्रचिती…
उत्तम वेव्हारे जोडोनिया धन, उदास विचारे वेचकरी, ही तुकोबा माऊलींची शिकवण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात संपूर्णपणे भिनवून घेतली आहे. या अभंग ओळीतील उदासीचा अर्थ विरक्त असा घ्यावा. अशा जणू विरक्तीनेच रामशेठ यांनी अक्षरश: हजारो कुटुंबांना जगण्यासाठी आधार दिला. शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर आणून सोडले. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात तर …
Read More »मंदिरावरून शंखनाद
कोरोना विषाणूच्या विळख्यात संपूर्ण महाराष्ट्र पुरता अडकला त्याला आता उणेपुरे सात महिने होतील. या सात महिन्यांमध्ये बर्याच उलथापालथी घडल्या. अनेक कुटुंबे देशोधडीला लागली. कित्येकांना आपल्या आप्तेष्टांना मुकावे लागले. महाराष्ट्रातील गावोगावी अशा हजारो शोकांतिका आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत जीव हतबल होतो हे खरेच. अशा असाह्य अवस्थेत कुठल्याही सामान्य माणसाला सर्वप्रथम देव …
Read More »किती सोसायचे?
संकट केव्हाही येऊ शकते, त्याचे स्वरूप आपल्या कल्पनेपलीकडचे असू शकते हा धडा तर आपल्यापैकी प्रत्येकाला कोरोना महामारीच्या रूपात मिळाला आहे. आपापल्या जगण्याच्या परिघात हा धडा ध्यानात ठेवूनच इथून पुढे मार्गक्रमणा करण्याची खूणगाठ आपण मनात बांधली आहे. त्यामुळेच कुठल्याही गोष्टीत पाऊल टाकतानाच संभाव्य आणि कल्पनेपलीकडल्या धोक्यांचा विचार आपल्यातील शहाणे लोक तरी …
Read More »आशावाद जपून
महाराष्ट्रातील कोरोनाचे थैमान तूर्तास काहिसे थंडावल्यासारखे दिसते आहे. सप्टेंबर महिन्यात केसेसमध्ये झालेली भयभीत करणारी वाढ गेल्या पंधरवडाभरात ओसरताना दिसल्याने सरकारी गोटातील संबंधितांनी नक्कीच सुटकेचा निःश्वास टाकला असेल. मात्र तरीही आगामी सणासुदीच्या काळात संसर्गामध्ये वाढ होण्याचा धोका लक्षात घेता अनलॅाकची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आतापासूनच घोषणा करणे निश्चितच उतावीळपणाचे ठरेल. सप्टेंबर महिन्यात …
Read More »बोनस शेअर, लाभांश आणि शेअर विभाजन
शेअर बाजारातील कंपन्या जाहीर करत असलेल्या बोनस शेअर्स, लाभांश आणि शेअर विभाजनाविषयी अनेक समज गैरसमज आहेत. या तिन्हीतील फरक आपण समजून घेऊयात. आपण सर्वच जाणतो की पारंपरिक गुंतवणुकीच्या माध्यमात व्याज हेच एक परताव्याचा मार्ग असतं (ठेवींवरील व्याज अथवा मुदतपूर्तीच्या वेळी व्याजासकट मिळणारी निश्चित रक्कम) परंतु शेअर्सच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर कोणताच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper