Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

‘ती’ भुयारे पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन ः पुरातत्त्व विभाग

पुणे ः प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट परिसरात मेट्रोच्या मल्टी मोडल हबचे काम सुरू असताना आढळून आलेली दोन भुयारे ही पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिली. या भुयारांच्या बांधकामाच्या पद्धतीवरून ती ब्रिटिशांनी बांधली असावीत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. स्वारगेट येथील सातारा …

Read More »

मद्यसम्राट मल्ल्याच्या उलट्या बोंबा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : देशभरातील विविध बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून परदेशी पळालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याभोवती भारतातील तपास यंत्रणांनी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केल्यामुळे विजय मल्ल्याचे धाबे दणाणले आहेत. नऊ हजार कोटींच्या बदल्यात जगभरातील माझी 14 हजार कोटींची संपत्ती जप्त केली, तसेच मी ब्रिटनचा नागरिक असून सध्या तिथेच राहत आहे, …

Read More »

महिला आरोग्य अधिकार्याची गोळ्या घालून हत्या

पंजाब ः प्रतिनिधी : पंजाबच्या खरड भागात वरिष्ठ महिला आरोग्य अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची त्यांच्या कार्यालयात घुसून एका व्यक्तीने गोळी झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मारेकर्‍याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन …

Read More »

उमेदवाराचा पत्ता नाही, पण काँग्रेसची प्रचाराची घाई

पुणे ः प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन अनेक राजकीय पक्षांचे उमेदवारही ठरले. प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली, मात्र काँग्रेससारख्या इतकी वर्षे जुना असलेल्या पक्षाला पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार सापडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मतदानाची तारीख जवळ आली, इतर पक्षांच्या विरोधी उमेदवारांचे अर्जदेखील दाखल झाले, तरीही पुण्याच्या जागेसाठी …

Read More »

‘चांद्रयान-2’ मोहिमेसाठी भारत सज्ज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारताचे चांद्रयान-2 व इस्त्रायली बेरेशीट 11 एप्रिल रोजी चंद्रावर दाखल होणार आहेत. चांद्रयान नासाच्या उपकरणाला चंद्रापर्यंत घेऊन जाणार आहे. भारताच्या चांद्रयान 1 मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान -2 मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या चांद्रयान मोहिमेमध्ये अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासादेखील सहभागी होत आहे. …

Read More »

उन्हाळी सुटीसाठी एप्रिलपासून रेल्वेच्या विशेष गाड्या

सोलापूर ः प्रतिनिधी : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, पुण्याहून गोरखपूर व मंडुआडीहपर्यंत साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 7 एप्रिलपासून या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाने दिली आहे. पुणे ते गोरखपूरदरम्यान 7 एप्रिल ते 30 जून या …

Read More »

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता

मुंबई ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी आर्थिक आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या 2 एप्रिलपासून रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीची बैठक होणार असून या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. तसे झाल्यास बँकांना आपल्या व्याजदरात कपात करावी लागेल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे. ब्रोकरेज …

Read More »

पोलीस निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

नागपूर ः प्रतिनिधी : महिला रेडिओ जॉकी (33)सोबत चॅटिंग करून तिला व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागूल यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागूल वाहतूक शाखेत प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तक्रार करणारी तरुणी रेडिओ जॉकी म्हणून नागपुरात काम करते. …

Read More »

भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे उपग्रहाचा लक्ष्यवेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाद्वारे दिली. अंतराळात अशा स्वरूपाची कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर जगातील चौथा देश ठरल्याचेही मोदींनी सांगितले. ‘मिशन शक्ती’बाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान मोदी …

Read More »

गुजरातजवळ अमली पदार्थांची बोट नष्ट

पोरबंदर ः वृत्तसंस्था भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसने मोठी कारवाई करीत भारतीय हद्दीत घुसणार्‍या नऊ अमली पदार्थांच्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तस्कर सुमारे 100 किलो हेरॉइन घेऊन भारतात येत होते. हे हेरॉइन 500 कोटी रुपये इतक्या किमतीचे आहे, मात्र सर्व पुरावे नष्ट व्हावेत म्हणून बोटीतील कर्मचार्‍यांनी बोटीला आग …

Read More »