Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

नक्षलग्रस्त भागात केला जातोय सावध प्रचार

गडचिरोली ः वृत्तसंस्था गाडीवर लाऊड स्पीकर लावून, पक्षाचे झेंडे लावून प्रचार करण्याची पद्धत आपण नेहमीच पाहतो, पण गडचिरोलीतील दुर्गम भागातील खेड्यांमध्ये अत्यंत सावधपणे प्रचार केला जातो. पक्षाचे झेंडे घेऊन कोणी फिरत नाही, ना गाडीवर लाऊड स्पीकर लावून घोषणा दिल्या जातात आणि याचे एकमेव कारण म्हणजे नक्षल्यांची भीती. एकीकडे नक्षलवाद्यांची भीती, …

Read More »

उपद्रवी मंडळींना थेट कोठडीत डांबू; लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा इशारा

नागपूर ः प्रतिनिधी मतदान प्रक्रियेत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्याच किमतीत खपवून घेतला जाणार नाही. असा प्रकार करणारा व्यक्ती कितीही मोठा आणि कुणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. अशा उपद्रवी मंडळींना थेट कोठडीत डांबू, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला आहे. 11 एप्रिलला देशाचे …

Read More »

संकल्पित भारत, सशक्त भारत!

भाजपचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 8) आपला जाहीरनामा प्रकाशित केला. भाजपने त्याला संकल्पपत्र म्हटले असून, याद्वारे ‘संकल्पित भारत, सशक्त भारत’चा निर्धार केला आहे. या जाहीरनाम्यात शेतकर्‍यांपासून गर्भवती स्त्रियांपर्यंत सर्वांची काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे सशक्तीकरण करतानाच त्यांना फ्रि हँड …

Read More »

माझ्या कुटुंबाने अनेक पंतप्रधान दिले, पण मोदींना तोड नाही!

भाजप नेते वरुण गांधींचे वक्तव्य नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘माझ्या कुटुंबातील काही लोक पंतप्रधानपदी राहिले आहेत, पण जो सन्मान नरेंद्र मोदींनी देशाला मिळवून दिला आहे तो दीर्घकाळापासून कोणीही देशाला देऊ शकला नव्हता. हा माणूस केवळ देशासाठी जगत असून, देशासाठी ते आपले प्राण देतील,’ असे वक्तव्य गांधी कुटुंबीयांमधीलच एक सदस्य आणि …

Read More »

ग्रामस्थांनी स्वखर्चाने उभारला सावित्रीबाईंचा पुतळा

चंदीगड ः वृत्तसंस्था स्त्री-पुरुष गुणोत्तराच्या बाबतीत बाकी राज्यांपेक्षा बरेच मागे असणार्‍या पंजाबमधील एका गावामध्ये स्त्री शिक्षणासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यातील भिडेवाडा येथून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या सावित्रीबाईंचा पुतळा मानसा तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत गावकर्‍यांनी आणि शिक्षकांनी स्वखर्चाने उभारला …

Read More »

भांडणात जात काढल्याने गुन्हा दाखल

पुणे ः प्रतिनिधी पुण्यात एका सोसायटीच्या मीटिंगमध्ये पाण्यावरून चर्चा सुरू असताना सोसायटीच्या चेअरमनने एका सदस्याला शिवीगाळ करत त्याच्याविरोधात जातीवाचक उद्गार काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. कात्रज येथील भारती विहार सोसायटीमध्ये 31 मार्चला हा प्रकार घडला. या प्रकरणी विश्वजीत कीर्तिकर यांनी …

Read More »

बारामतीत यंदा इतिहास घडणार; चंद्रकात पाटलांचे भाकीत

वडगाव बुद्रुक ः प्रतिनिधी  बारामती मतदारसंघातील निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल यांच्यामध्ये नसून देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्यातील आहे. या वेळी बारामतीत इतिहास घडणार आहे, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी या वेळी वर्तविले. महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ रविवारी वडगाव बुद्रुक येथे ’मैं भी चौकीदार’ मेळाव्याचे …

Read More »

मतदानवाढीसाठी अनोखा फंडा; मतदान करा अन् मिळवा मोफत जेवण, औषधांवर सूट

नोएडा ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता व्यापारी संघटनाही पुढाकार घेत आहेत. दिल्लीजवळील नोएडामध्ये केमिस्ट असोसिएशनने मतदान करणार्‍यांना औषधांवर 10 टक्के …

Read More »

देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सचे सर्वेक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येण्याची शक्यता आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने देशभरात केलेल्या सर्व्हेनुसार, पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे, तर काँग्रेसला फक्त 97 जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसपेक्षा अन्य पक्षाच्या जागा जास्त येऊ शकतात असा …

Read More »

प्रबोधनाचे माध्यम झाले प्रचाराचे साधन

नागपूर ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग धरला असून सूर्यासोबत समाजातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. अशात प्रबोधनाच्या चळवळीच्या रूपात उदयास आलेले पथनाट्य आज राजकीय पक्षांच्या प्रचाराचे साधन झाले आहे. पथनाट्याबाबत …

Read More »