महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महिला सुरक्षेच्या केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणार्या निर्भयाफंड, वनस्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासीत …
Read More »‘पीएसएलव्ही’चे अर्धशतक; 50व्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा : प्रतिनिधी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-2 बीआर 1 या उपग्रहाचे बुधवारी (दि. 11) प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. ‘पीएसएलव्ही’ची ही 50वी मोहीम होती. रिसॅट-2 बीआर 1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट असून, या मालिकेतील …
Read More »गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट
अहमदाबाद : वृत्तसंस्था 2002च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या संदर्भातील नानावटी-मेहता आयोगाचा अहवाल बुधवारी (दि. 11) गुजरात विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात मोदींसह इतर मंत्री निर्दोष असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गोध्रा जळीतकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी नानावटी-मेहता आयोगाची स्थापना …
Read More »‘मी भाजप सोडतेय या तर वावड्या’
परळी : प्रतिनिधी मी भाजप सोडते आहे या वावड्या असून, इथं सगळे आम्ही एकत्र काम केलेले लोक आहोत. त्यांच्यावर काय नाराज व्हायचं? असा प्रतिप्रश्नच भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. एवढंच नाही तर मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असे कधीही म्हटले नव्हते. अकारण या सगळ्या …
Read More »नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही बुधवारी (दि. 11) मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 117 मते, तर विरोधात 92 मते पडली. हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही …
Read More »देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड नाही : पंतप्रधान मोदी
पुणे : प्रतिनिधी सीमेपलीकडील शत्रूंकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण असून, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाह्य आक्रमण आणि छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते रविवारी …
Read More »दिल्लीत अग्नितांडव, अनाज मंडी परिसरात 43 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत अनाज मंडीत परिसरातील कारखान्यामध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 8) पहाटे घडली. या आगीत अनेक जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनाज मंडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या फॅक्टरीला पहाटे 5.20च्या …
Read More »नराधमांचा एन्काऊंटर
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलीस गोळीबारात ठार हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 6) मध्यरात्री 3 ते 6च्या दरम्यान घडली, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली. हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार व …
Read More »आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही : गडकरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयएनएक्स मीडियाप्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 4) काही अटींवर जामीन मंजूर केला. त्यामुळे ते तब्बल 106 दिवसांनी तुरुंगाबाहेर येणार आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही, मात्र काँग्रेस …
Read More »‘एक देश, एक रेशन कार्ड’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरात ’वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा रंगलेली असताना आता ’एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. येत्या 1 जूनपासून देशात ही मोहीम राबविणार असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper