मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या विभागाच्या मंत्र्यांचे मध्यस्थ सध्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहाराची शक्यता वर्तविली जात आहे. सप्टेंबर महिन्यात याबाबत केलेल्या कारवाईनंतर प्राप्तिकर विभागाला महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यामुळे आणखी काही मध्यस्थ, तसेच सरकारी अधिकारीही या विभागाच्या रडारवर असल्याचे या घडामोडींशी संबंधित प्राप्तिकर विभागातील …
Read More »विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई : प्रतिनिधीनिवडणूक आयोगाकडून राज्यातील विधान परिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2022 रोजी विधान परिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, …
Read More »मंत्री नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध
देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोपजमीन खरेदीबाबतचे पुरावे सादर मुंबई : प्रतिनिधीज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ …
Read More »नवी मुंबईत दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सानपाडा नोडमधील प्रभाग 76 मधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून तसेच साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष शारदा पांडुरंग आमले यांच्या सहकार्याने ‘एक दिवा राम मंदिरासाठी’, ‘एक दिवा श्री रामासाठी’ अशी संकल्पना पुढे घेवून येत साईभक्त महिला फाउंडेशन व प्रभाग 76 भाजपच्या वतीने सानपाड्यात रविवारी …
Read More »दिवाळीनंतरही कोरोना लसीकरणाला वेग
नवी मुंबईकरांसाठी महापालिकेचे दुसर्या डोससंदर्भात नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळी उत्सवाच्या कालावधीतही नागरिकांची लसीकरणाविषयी अडचण होऊ नये याकरिता महानगरपालिकेच्या चारही रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे दिवाळीच्या दिवसात सुरू ठेवण्यात आली होती. कोविड लसीकरणात पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करून घेऊन आता दुसर्या डोसच्या 57 टक्के झालेल्या लसीकरणाला अधिक वेग देण्याच्या …
Read More »एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील -दरेकर
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या असंवेदनशीलपणामुळे एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. राज्य सरकारने या समस्येकडे कानाडोळा न करता त्वरित उपाययोजना करावी. एसटी कर्मचार्यांना जगण्यापेक्षा मरण बरे, अशा अवस्थेपर्यंत आणण्यात राज्य सरकारची नकारात्मक भूमिका जबाबदार आहे. असे राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. राज्यात एसटी कर्मचार्यांचे सुरू …
Read More »संप चिघळणार, प्रवाशांची परवड; एसटी कर्मचार्यांना राज्य सरकारचा जीआर अमान्य
मुंबई : प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनामध्ये विलीन करण्याबाबतचा अध्यादेश (जीआर) राज्य सरकारने काढला आहे, मात्र सरकारचा हा निर्णय एसटी कर्मचार्यांना मान्य नाही. त्यामुळे कर्मचार्यांनी पुकारलेला संप कायम राहणार आहे. या कर्मचार्यांच्या वतीने कोर्टात बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना ही माहिती दिली. सदावर्ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने पोलीस …
Read More »इराणचा कांदा बाजारात दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मध्यंतरी वळवाचा पाऊस झाल्याने कांद्यासह सर्वच कृषीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर 40 रुपये किलोपर्यंत पोहचले होते. एकंदरीत परिस्थिती पाहता कांद्याचे दर वाढणार हे गृहीत धरून बाजारातील आयातदार, व्यापार्यांनी इराणमधून कांदा मागवला होता. तो कांदा आता बंदरात पोहचला आहे आणि …
Read More »नवी मुंबईत रात्रीची स्वच्छता मोहीम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निश्चय केला, नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेबाबत जागरूक असणार्या नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार दिवाळीत रात्री वाजविल्या जाणार्या फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या कचर्यामुळे सकाळी दैनंदिन स्वच्छतेवर वाढणारा ताण लक्षात घेत 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या रात्रीपासून …
Read More »वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा; मनसे नेते संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना या दोन्ही पक्षांकडून अधिकाधिक आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी संपताच रविवारी सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper