Breaking News

मुंबई – नवी मुंबई

कोविड केअर सेंटर की मृत्यूचे आगार? : देवेंद्र फडणवीस

मुंबई ः राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये होणार्‍या मृत्यूविषयी चिंता व्यक्त करीत ते कोविड केअर सेंटर आहे की …

Read More »

नवी मुंबईत डेंग्यूचा रुग्ण नसल्याचा दावा

मागील वर्षीच्या तुलनेत साथ आटोक्यात नवी मुंबई ः प्रतिनिधी दरवर्षी पावसाळा काळात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, मात्र या वर्षी हे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचा एकही रुग्ण शहरात सापडला नाही, तर मलेरियाचे फक्त नऊ रुग्ण सापडले आहेत. पालिकेकडून कोरोना काळातही याबाबत …

Read More »

जलभूषण पुरस्काराचा निर्णय रद्द करा; संघर्ष फाऊंडेशनचे कोकण आयुक्तांना निवेदन

खारघर ः बातमीदार शासनाने जलभूषण पुरस्कार प्रदान करण्यासंदर्भात जूनमध्ये घेतलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन नवी मुंबईतील संघर्ष फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाकडून सोमवारी (दि. 7)  कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आले. शासनाने 12 जून 2020च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी जलक्रांतीचे जनक म्हणून …

Read More »

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात

ग्रामपंचायत विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य विधिमंडळाचे कामकाज सोमवारी (दि. 7) सुरू झाले, पण पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ग्रामपंचायत सुधारणा विधेयकावरून विधानसभेत एकच गोंधळ पाहण्यास मिळाला. विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत सभात्याग केला.विधिमंडळाच्या दोनदिवसीय पावसाळी अधिवेशाला सोमवारी …

Read More »

मुंबईतील लोकल, कार्यालये 1 नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; ‘टीआयएफआर’चा मनपाला अहवाल

मुंबई : प्रतिनिधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) एक महत्त्वपूर्ण अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालयांसह वाहतूक सुविधा पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. याचबरोबर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी अहवाल सादर करीत शाळा जानेवारी 2021पासून …

Read More »

‘त्या’ हुंडाबळीतील आरोपींना अटक करा

आमदार मंदा म्हात्रे यांचे गृहमंत्र्यांना पत्र नवी मुंबई : बातमीदार बीड जिल्ह्यात 30 नववधूंनी हुंडाबळीमुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनासारख्या संकटकाळात काही समाजकंटक नववधूंचा हुंड्यासाठी …

Read More »

हजारो नागरिकांनी टाळला गणेशोत्सव

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. अनेकांनी उत्सव साजरा केला नसल्याचे दिसून आले. 2019-20 घरगुती व सार्वजनिक मिळून 34 हजार 006 मूर्तींचे विसर्जन  करण्यात आले तर यंदा हीच संख्या 22 हजार 381 पर्यंत सीमित राहिली. तब्बल 11 हजार 625 नवी मुंबईकरांनी …

Read More »

नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये धुसफूस

कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या नवी मुंबईच्या युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी पक्षातील कमिटीच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केल्याने युवक काँग्रेस पक्षामध्ये होणारी खदखद चर्चेचा विषय बनत आहे. एकंदरीतच नवी मुंबई युवक काँग्रेस पक्षामध्ये आपापसातच धुसफूस होत असल्याने पक्ष कार्यकर्त्यांची वृत्ती चव्हाट्यावर आली आहे. युवक काँग्रेसच्या नवी मुंबई …

Read More »

पावसाळी अधिवेशनात कोरोनामुळे विविध निर्बंध

मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे, पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे, तर आमदारांच्या पीएनादेखील प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय मंत्रिमंडळापासून …

Read More »

कोरोनाबाधित विद्यार्थ्याने दिली रुग्णालयातून परीक्षा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आई-वडिलांसह कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 13 वर्षीय मुलाने रुग्णालयात उपचारादरम्यान आठवीची ऑनलाइन परीक्षा दिली. त्यासाठी त्याला नवी मुंबईतील नेरूळ येथील एका रुग्णालयाने सर्वोपरी मदत केली. नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथे राहणार्‍या नीलेश कदम, पत्नी निशी आणि मुलगा निरंजन (13) यांना कोरोना …

Read More »