Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पनवेलची वाजेकर विद्यालयात तर उरणची मतमोजणी जासई शाळेत

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण विभागात विधानसभा निवडणूक-2019 मतमोजणीसाठी स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघाची मतमोजणी के. ई. एस. इंदूबाई वाजेकर इंग्लिश मीडियम विद्यालय, पनवेल येथे होणार आहे. कर्जतची श्री. साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय, किरवली ता. कर्जत 410201 जि. रायगड, 190-उरण रा. जि. …

Read More »

उरणमध्ये विक्रमी 74 टक्के

मतदारांचा दांडगा उत्साह; मतदान प्रक्रिया शांततेत नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण मतदारसंघातील शहरी भागांत मतदानाचा टक्का घटला. उरण आणि पनवेल मतदारसंघातील ग्रामीण भागांत मतदारांनी उत्साह दाखवला. सोमवारी सकाळी पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा वाढला असताना मतदारांचा उत्साह मावळलेला दिसला. बेलापूरमध्ये 44 टक्के, ऐरोलीत …

Read More »

राज्यात मतदानाचा टक्का घसरला; पावसाचा फटका

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान झाले. यंदा मतदारांमध्ये तितकासा उत्साह दिसला नाही. त्यातच राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला, मात्र काही ठिकाणी पाऊस नसतानाही मतदारांनी निरुत्साह दाखवला. त्यामुळे एकूणच मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. राज्यात सहा वाजेपर्यंत अंदाजे 55.31 टक्के मतदान …

Read More »

घरून मतदान करण्याची सोय असावी -नाना पाटेकर

मुंबई : प्रतिनिधी देशासह राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर परखडपणे मत मांडणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी निवडणूक मतदान आणि राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या मुद्द्यावर रोखठोक मत मांडलं आहे. मतदानाला गर्दी कमी आहे. हे चांगलं नाही. सरकारनं मतदानाची सक्ती करावीच, पण घरी बसून मतदान करण्याची सोय करायला हवी, असं ते म्हणाले. दादरमधील मतदान केंद्रावर …

Read More »

मतदान झाले; आता प्रतीक्षा निकालाची

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) उत्साहात मतदान झाले. राज्यातील अनेक भागांत कोसळणार्‍या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली होती. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांबरोबरच एकूण 3,237 उमेदवारांचे भविष्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. आता सर्व उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे. …

Read More »

मतदार जागृतीसाठी व्यावसायिक सरसावले; विविध ऑफर्स

मुंबई : प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रशासनाबरोबरच आता हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संस्थांनीही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शक्कल लढवली आहे. ‘मतदान करा आणि पैठणीवर विशेष सूट मिळवा’ अशी ऑफर  येवला शहरातील कापसे पैठणीतर्फे देण्यात आली आहे. कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळच्या मालकांनी …

Read More »

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता मोर्चेबांधणीवर भर

मुंबई : प्रतिनिधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी प्रमुख नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनाने शनिवारी (दि. 19) विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. भरपावसात रोड शो, रॅली आणि सभांच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवला. प्रचार संपल्यानंतर आता उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. …

Read More »

सिडको वसाहत विभागाच्या सेवा 1 नोव्हेंबरपासून पूर्णत: ऑनलाइन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणार्‍या सर्व सेवा यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीने पुरविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वसाहत विभागाच्या सेवांचे सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) करण्याच्या उद्देशाने हा निर्णय …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत विश्वास; महायुतीचेच सरकार येणार

मुंबई : प्रतिनिधी आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? या आघाडीने तर आदर्श घोटाळा करून लष्करातील जवानांनाही सोडले नाही. दुसरीकडे पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 18) येथे व्यक्त केला. आपल्या …

Read More »

भावनिक साद आणि पायी प्रचार

मंदा म्हात्रे यांच्या पदाधिकार्‍यांशी भेटीगाठी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी बैठका घेऊन प्रचार मिरवणुकांचे नियोजन केले आहे. पायी प्रचार करीत त्या मतदारांना भावनिक साद घालीत आहेत. बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हात्रे सकाळी प्रचारासाठी बाहेर पडत …

Read More »