नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस… आयत्या बिळावरचा नागोबा, अशा शब्दात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री …
Read More »नेरूळमध्ये टॅग केलेला पक्षी रशियात
पाणथळ जागेचे संवर्धन करण्याची गरज; निसर्गप्रेमींचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार 139 वर्षे जुनी संशोधन संस्था असलेल्या बीएनएचएस म्हणजेच बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीने टॅग केलेला पक्षी रशियामध्ये सापडला आहे. बीएनएचएसने नेरूळ येथे ही कल्पना राबवत कॉमन रेड शांक या पक्ष्याला काही महिन्यांपूर्वी टेग केले होते. या पक्ष्याचे निरीक्षण केले जात …
Read More »महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई मनपा मुख्यालयात ध्वजारोहण
कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचा सन्मान नवी मुंबई ः बातमीदार महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. …
Read More »खारघर, तळोजात पाणी तक्रारींसाठी सिडको सरसावली
तक्रारींसाठी व टँकरच्या मागणीसाठी कॉल, एसएमएसची सुविधा नवी मुंबई ः बातमीदार खारघर आणि तळोजा नोडमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी आणि टँकरची मागणी करण्यासाठी नागरिकांनी 9324950948 या क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉटसअप संदेशद्वारे किंवा एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. दक्षिण नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, …
Read More »नवीन पनवेलमध्ये सुटीच्या दिवशी पर्यावरणपूरक बससेवा होणार सुरू
परिवहनच्या उपक्रमामुळे 60 ते 70 लाखांची बचत नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पयार्वरणपूरक वाहतुकीच्या दिशेने नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा प्रवास सुरू आहे. रविवारी सुटीच्या दिवशी फक्त विद्युत व सीएनजी बसमधून प्रवासी वाहतुकीच्या प्रयोग यशस्वी होत असल्याने आता शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी ‘नो डिझेल बस’चा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला …
Read More »नवी मुंबईतील विविध कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
भाजपने वेधले अधिकार्यांचे लक्ष नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभागाची पावसाळ्यापूर्वी नाले व गटार साफसफाई शिरवणे गाव व नेरुळ सेक्टर 1 परिसरात व्हावी या अनुषंगाने गुरुवारी नेरुळ ब विभाग अधिकारी नागराळे यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी माजी नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार, विजय नाईक, अरुणा …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात नको
राज्य निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे अवघड असल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा वाद उफाळल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्ष भाजपसह सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका …
Read More »महाराष्ट्रात फक्त सत्तेचे ‘भोगी’!
राज ठाकरे यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश सरकारने भोंग्यांच्या आवाजासंदर्भात कारवाई सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय, मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्तेत असणार्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश सरकारने …
Read More »श्रीमती सावित्रीबाई फुले विद्यालयाला बेस्ट स्कूल पुरस्कार
नवी मुंबई ः प्रतिनिधी ठाणे दिवा येथील श्रीमती सावित्रीबाई फुले विद्यालय या शाळेने कोरोना काळात सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाची दखल घेत राज्यस्तरीय बेस्ट स्कूल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेस्टा अधिवेशन नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुख्य सभागृहात झाले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, …
Read More »नैना प्रकल्पाच्या नियमावलीतील टीडीआरमध्ये सुधारणा करण्याची मागणी
नवी मुंबई ः बातमीदार नैना क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या नियमावलीतील टीडीआरमध्ये सुधारणार करण्याची मागणी नैना बिल्डर वेल्फेअर असोसिएशन व विकसक प्रकाश बाविस्कर यांनी अधिकार्यांकडे केली आहे. प्रारूप विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली प्रसिद्ध होऊन जवळपास पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत. जमीनमालकाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper