नियोजन नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप खारघर ः प्रतिनिधी खारघरमधील बागेश्री गृहसंकुलातील नागरिकांचे मागील महिनाभरपासून पाण्याचे प्रचंड हाल सुरू आहेत. सिडको महामंडळाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत भाजपतर्फेही पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र त्याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2018 साली लॉटरी पद्धतीने …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात बीट्स फेस्ट उत्साहात
खारघर ः रामप्रहत वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीतर्फे सहा दिवसाचे बीट्स फेस्ट मोठया उत्साहात पार पडला. गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधांमुळे महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही खंड पडला होता. मात्र यावर्षी महाविद्यालयातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बीट्स …
Read More »ओबीसी आरक्षण वाचवा! अधिवेशनात भाजपचा नारा !!
मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारचा (दि. 4) दुसरा दिवस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गाजला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का बसल्याने भाजपने ठाकरे सरकारला घेरले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारवर काही मोठ्या लोकांचा दबाव आहे, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मध्य प्रदेशाप्रमाणेच राज्य सरकारने …
Read More »”तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण”
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून तळोजा परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 13 उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे, …
Read More »नाला बंदिस्त करण्याची भाजपची मागणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी सिवूडस दारावे सेक्टर 27 येथील नैसर्गिक नाल्याची साफसफाई करून नाल्याच्या बाजूला जाळी बसवावी, अशी मागणी भाजप नवी मुंबई युवा मोर्चा महामंत्री रणजित नाईक यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या नाल्याच्या परिसरात नागरी वसाहत आहे. येथील वंडर पार्कच्या मागून वाहत जाणार्या या नाल्यातील …
Read More »शुक्रवारपासून बारावीची परीक्षा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवार (दि. 4)पासून सुरू होत असून ती 30 मार्चपर्यंत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर बोर्डातर्फे देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये …
Read More »ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केले. ते …
Read More »अहंकार्यांना महाराष्ट्र झुकवणारच!
देवेंद्र फडणवीस यांचा मविआ सरकारला इशारा मुंबई : प्रतिनिधी मविआचे नेते अलीकडे कोणतीही कारवाई झाली तरी महाराष्ट्र झुकणार नाही, असा डायलॉग मारतात, पण मविआचे नेते म्हणजे महाराष्ट्र नव्हे. राज्यातील 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या अहंकार्यांना हा महाराष्ट्र झुकवून दाखवेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला …
Read More »ग्रामस्थांची सरसकट सर्वच घरे नियमित करा
आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व याबाबत शासन निर्णय आणला, परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ‘आहे त्या स्थितीत’ सरसकट नियमित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे …
Read More »‘अभाविप’चा राज्य सरकारविरोधात घंटानाद
विद्यापीठ कायद्यातील बदल मागे घेण्याची जोरदार मागणी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने सोमवारी (दि.28) मुंबई विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य मंत्रिमडळाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper