वळके हायस्कूलच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन रेवदंडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जेएसडब्ल्यू कंपनीचे सिएसआर विभाग प्रमुख राम मोहिते यांनी बुधवारी (दि. 27) वळके येथे केले. साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सामाजीक दायित्व विभागाच्या वतीने कोएसोच्या वळके येथील नारायण कमळ्या गायकर माध्यमिक शाळेत नवीन प्रयोगशाळा उभारण्यात …
Read More »पर्यावरण जनजागृतीसाठी मुरूडमध्ये पथनाट्य, सायकल रॅली
मुरूड : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी मुरूड शहरात गुरुवारी (दि. 28) नगर परिषदेतर्फे पथनाट्ये सादर करण्यात आली. या वेळी सायकल रॅलीही काढण्यात आली होती. मुरूड नगर परिषदेतर्फे गुरुवारी शहरातील बाजारपेठेत पथनाट्ये सादर करण्यात आली. वायुप्रदुषण आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये, यासाठी येणार्या दिवाळीमध्ये …
Read More »चला मतदार यादीत नाव नोंदवू…
मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या मोहिमेविषयी माहिती… भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर …
Read More »डॉ. विनोद गीते यांना पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. विनोद गीते यांना कोरोना योद्धा व आरोग्यदूत पुरस्काराने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल डॉ. गीते यांचे अभिनंदन केले जात आहे. नवतरुण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्या …
Read More »खारघरमध्ये स्वस्त दरात सामान; दीपावलीनिमित्त भाजपचा उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे दिवाळी सणासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात फराळ सामान वितरण करण्यात येत आहे. खारघर सेक्टर 13मधील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 29) हा उपक्रम सुरू करण्यात आला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक …
Read More »नवी मुंबई महापालिका मुख्यालयात येणार्या अभ्यागतांसाठी नियमावली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणार्या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी 3 ते 6 या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली, मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला. नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली …
Read More »पनवेल परिसरात लुटमारीत वाढ
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात फसवणूक करून पैसे व ऐवज लुबाडून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी लुटारू विविध युक्त्या करीत समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून लुटमार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच पनवेलमध्ये व खारघरमध्ये अशा घटना घडल्या आहेत. पोलीस या लुटारूंचा शोध घेत असून फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिक …
Read More »वेध भविष्याचा
फेसबुक आयएनसीचे कॉर्पोरेट नामांतर करण्यात आले असून तिचे नवे नाव मेटा असे असेल. याचा दुसरा अर्थ असा की फेसबुक हे आता मेटाचे प्रॉडक्ट राहील आणि त्याचे नाव फेसबुक हेच असेल. अवाढव्य प्राप्ती, अवाढव्य व्याप्ती आणि त्यातून मिळालेली अमर्याद शक्ती यामुळे फेसबुक गेल्या काही वर्षांत बलाढ्य होत गेले. त्यातूनच डेटा प्रायव्हसी …
Read More »पनवेलमध्ये रंगणार दिवाळी पहाट; स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुरेल गाण्यांची 5 नोव्हेंबरला मैफल
पनवेल : रामप्रहर वृत्तरसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने शुक्रवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफल ‘दिवाळी …
Read More »‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे आयोजन; विजेत्यांना एकूण 45 हजारांची पारितोषिके
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त ‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा मोर्चाच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper