Breaking News

महत्वाच्या बातम्या

रसायनमिश्रित फटाक्यांचा साठा जप्त

देवन्हावे येथे छापा; खोपोली पोलिसांची कारवाई खोपोली, खालापूर : प्रतिनिधी पर्यावरणास घातक असणार्‍या विविध रसायनमिश्रित फटाक्यांचा मोठा साठा खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील गोदाममधून छापा घालून जप्त करण्यात आला. रसायनमिश्रीत फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल आहेत. या रसायन मिश्रीत फटाक्यांमुळे विशेषता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व …

Read More »

कर्जतचे विकास त्रिभुवन यांचा बंगळुरूमध्ये सन्मान

कर्जत : बातमीदार शहरातील विकास त्रिभुवन यांना बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी बंगळुरू येथील ए. डी. ए. रंगमंदिर …

Read More »

कर्जतमध्ये साकारला ईरशाळ गड

पाटील आळी मित्र मंडळाची 14 वर्षांची परंपरा कर्जत : प्रतिनिधी शहरातील पाटील आळी मित्र मंडळाने या वर्षी  किल्ले ईरशाळ या गडाची प्रतिकृती साकारली आहे. सध्याच्य युगात किल्ले आणि त्यांच्या इतिहासाचा विसर पडत चालला आहे. मात्र किल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा, त्यांच्या इतिहासाची माहिती मिळावी, यासाठी कर्जतमधील पाटील आळी मित्र मंडळातर्फे …

Read More »

भाजपतर्फे कर्जतमध्ये फराळाचे वाटप

कर्जत : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे कर्जत नगर परिषदच्या सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी  शहरातील कचरा साफ करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने कर्जत भाजपच्या वतीने सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. …

Read More »

सरकारी कर्मचार्यांचे मुरूडमध्ये ठिय्या आंदोलन

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांनी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनही दिले. जुनी …

Read More »

कळंबोलीत विकासकामांचा झंझावात

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या भूमिकेतून अशीच विकासाची कामे करीत राहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) …

Read More »

राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त कल्याण गोविली येथील जीवनदीप शिक्षण संस्थेने सब ज्युनिअर-ज्युनिअर (मुले-मुली) राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमधून सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते. यात रायगडच्या खेळाडूंनी पाच रौप्य व तीन कांस्यपदके जिंकली. रायगड खेळाडूंच्या या यशाबाबत रायगड पॉवरलिफ्टिंग संघटनेचे गिरीष वेद, अरुण पाटकर, …

Read More »

किकबॉक्सिंग स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचे सुयश

पनवेल : वार्ताहर अहमदनगरमधील सुपा येथे झालेल्या ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि जुनिअर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंनी सुयश प्राप्त केलेे आहे. या स्पर्धेत 33 जिल्ह्यांतील सुमारे 930 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात पनवेल शहराचा संघ अध्यक्ष जयेश चोगले व सचिव दिक्षा जैन यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला होता. या 26 खेळाडूंनी म्युसिकल …

Read More »

वसुबारसनिमित्त करंजाडेत विविध कार्यक्रम उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त सीरवी समाज संस्था आणि करंजाडे नागरिक मंच यांच्यातर्फे दीपावलीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त सोमवारी (दि. 1) गोमाता वासरु पूजन आणि संगीत संध्या हा गायनाचा कार्यक्रम सायंकाळी करंजाडे सेक्टर 3 येथील दुर्गा माता मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यासोबतच फक्त महिलांसाठी असणारे नवी मुंबईतील पहिले स्वरदुर्गा ढोल ताशा …

Read More »

‘होपमिरर’तर्फे गरजू मुलांना स्वेटर वाटप

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईस्थित संस्था होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने थंडीसाठी संरक्षण म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने 100 ते 150 गरजू मुलांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. यासोबतच मुलांना खाऊही देण्यात आला. होपमिरर फाउंडेशन ही रमझान शेख यांनी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था आहे, जिचा प्राथमिक उद्देश हा गरिबांना मदत करणे …

Read More »