पेण : प्रतिनिधी दिपावली म्हणजे दिव्यांचा सण, म्हणजे अंधःकारातून उजेडाकडे नेणारा तेजोमय सण. या सणात अंधःकारालाही प्रकाशमय करणार्या पारंपरिक मातीच्या पणत्या पेण बाजारपेठेत दाखल झाल्या असून, यामध्ये चायनीज पणत्यांचेही आक्रमण झालेले दिसत आहे. दीपावली उंबरठ्यावर आली असून पेणच्या कुंभारवाड्यात बनविण्यात येणार्या पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर चायनीज पणत्यांही बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या …
Read More »‘बाहास माला सालंमा धाड’ पथनाट्याद्वारे वाडी-वस्त्यांवर प्रबोधन व जनजागृती
आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प पाली : प्रतिनिधी जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ’बाहास माला सालंमा धाड’ (बाबा मला शाळेत पाठवा) या पथनाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या पेण येथील अधिकारी …
Read More »जिताडा पालनास व्यवसायिकतेची जोड हवी
कुलाबा किल्ला, पांढरा कांदा व जिताडा मासा ही अलिबागची ओळख आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यातील खारेपाट भागात आढळणारा सोनेरी रंगाचा जिताडा मासा इतर माशांपेक्षा चवीला रुचकर असतो. अलिबागला आल्यावर पर्यटक या माश्यावर हमखास ताव मारतात. त्यामुळे त्याला मागणीदेखील भरपूर आहे. अलिबाग व पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील शेतकरी आपल्या घरासमोर छोट्या …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची प्रवासी सुविधा समितीकडून पाहणी
फलाटावर लिफ्ट बसवण्याच्या सूचना पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीने बुधवारी संध्याकाळी पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची पाहणी केली. या वेळी रेल्वेच्या अधिकार्यांना पनवेल रेल्वे स्टेशनवरील लोकलच्या फलाटावर लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याचे काम 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. या लिफ्टमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांची पनवेल रेल्वे स्टेशनवर …
Read More »वाशिवली डोंगराळ भागात गावठी हातभट्टीवर कारवाई
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारूची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा गुरुवारी (दि. 28) उद्ध्वस्त केला. या कारवाईत 200 लिटर क्षमतेचे तीन प्लास्टिक ड्रममध्ये व …
Read More »‘सुधारीत मासेमारी नियमावली मच्छीमारांसाठी अन्यायकारक’
उरण : वार्ताहर राज्य शासनाने तब्बल 40 वर्षांनंतर प्रस्तावित केलेला नवीन मासेमारी कायदा, हा सर्वसामान्य पिढीजात मासेमारी करणार्या मच्छीमारांच्या मुळावर घाव घालणारा आहे. त्यामुळे या बाबतचे तीव्र पडसाद आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमी काही दिवसातच कोकण किनारपट्टी सहित मुंबईमध्ये उमटतांना दिसतील, असे प्रतिपादन करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीचे संचालक हेमंत गौरीकर यांनी …
Read More »नवी मुंबईत महिला अत्याचारांत वाढ
बलात्कार, विनयभंगाच्या घटना चिंताजनक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात महिला अत्याचारांच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. बलात्काराच्या घटना गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट घडल्या असून विनयभंग प्रकरणातही वाढ झाली आहे. महिला आता तक्रार करण्यास पुढे येत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. नवी मुंबईत व्हाइट कॉलर आणि सायबर गुन्हेगारीत …
Read More »प्राची भोईर हिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक
खालापूर : प्रतिनिधी23 वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2021 सातारा येथील स्पर्धेत 65 किलो वजनी गटात प्राची भोईर या रायगडच्या कुस्तीपटूने कांस्य पदक मिळवले. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल, खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राची कुस्तीचा सराव …
Read More »उरण नगर परिषदेच्या वतीने आज सायकल रॅली
उरण : वाराहर उरण नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रायगड-अलिबाग सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला शुक्रवारी (दि. 29) सकाळी 10 वाजता उरण नगर परिषद कार्यालयातून सुरुवात होईल. पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी नागरिकांना, विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ …
Read More »इंग्लंडचा बांगलादेशवर 8 गडी राखून विजय
आबुधाबी : वृत्तसंस्था इंग्लंडने बांगलादेशवर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. इंग्लंडचा सुपर 12 फेरीतील सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे उपांत्य फेरीतील आशा वाढल्या आहेत. तर बांगलादेशचा पुढचा प्रवास बिकट झाला आहे. बांगलादेशनं इंग्लंडसमोर विजयासाठी 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशनं 20 षटकात 9 गडी गमवून 124 धावा केल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper